Posts

As a kid, I never had the courage to talk in front of my father. I was afraid of him. The moment he came back from work was the moment I used to sit quietly, open my book and start studying. My father was the only authority at home. Today, when my daughter says to her father, "Baba, you  don’t understand anything," I get amazed. ‘How can she talk like this?’ I always wonder. Parenting patterns have changed a lot.  There’s always a question, ‘Which  parenting style is more effective, the one my father used to follow or the one my daughter’s father follows?’ When I think about my growing up pattern, I realize that I have achieved many things. I was always on track. Yes, My confidence was low. I was unable to decide between things, but I was never rude. I can mold myself in any situation. I don’t try to control the situation either.  I always think, that my father should have given me nothing but confidence. When we became parents, my husband and I decided ...

मठ्ठ

तो- एक मठ्ठ मुलगा..आणि त्याची आई मुलाला कसं शिकवावं हे न समजलेली आई...आणि त्याचं भविष्य म्हणजे फक्त अंधार... नुसताच मठ्ठ नाही तर बडबडाही... अर्धा दिवस वर्गाबाहेरच जायचा. गृहपाठ ...
शिक्षण, शाळा तिथला गलथान कारभार, शिक्षणाच्या नावाखाली होणारी पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक हा आमच्यासारख्या (साधारण ३०-४५ वयोगटातल्या) पालकांचा जिव्हाळ्याचा विषय. कुठेही ह्या वयोगटातल्या चार बायका जमल्या कि, शाळेचा त्रास आणि शिक्षकांची निंदा ह्या विषयांवर गप्पा रंगतातच. ह्या गप्पांसाठी तुमची आणि दुसऱ्या बाईची फार ओळख असावी लागतेच असे नाही. मी तर हल्ली अनोळखी बायकांशी संवाद साधायला सुरुवात करण्यासाठी हाच विषय निवडते. ह्यांतून शाळेत चुकीचं कसं शिकवलं जातं, प्रोजेक्ट्स आई-वडिलांना कसे तापदायक आहेत, मुलांना काहीच कसं येत नाही वगैरे गोष्टींवर बऱ्यापैकी प्रकाश पडतो. माझ्या कार्यक्षेत्रामुळे माझा पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी नेहमी संवाद होतो. ह्या सगळ्या गोष्टींतून मला हल्लीच्या मुलांबाबत काही गोष्टी जाणवल्या, त्या अशा- १) बहुसंख्य मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी कसलीही (शारीरिक अथवा बौद्धिक) मेहनत घेणे नको असते. म्हणजे, मुलाला football खेळायला आवडत असते. तो खूप चांगला खेळत असतो. जेंव्हा त्यांना काही कारणाने त्यांना त्यामध्ये अडचणी येऊ लागतात तेंव्हा त्या अडचणींवर मार्ग शोध...
"मला खूप भीती वाटते. पण बोलले तर लोक हसतील म्हणून मी बोलतच नाही." "मला खूप राग येतो, पण कंट्रोल करते. " "मला रडावसं वाटतंय, पण त्यामुळे मी किती दुबळा आहे, असं वाटेल." असं अनेकवेळेस होतं. आपल्याला काय वाटतं हे कळत असतं. पण व्यक्त होता येत नाही. कधी लोक काय म्हणतील ह्याची भीती असते, तर कधी स्वत:च्याच व्यक्तिमत्वाबद्दल असणाऱ्या स्वत:च्याच कल्पना आड येतात. आपण साठवत राहतो, वरचेवर.  मग कुठेही जाताना हि मोठी अदृश्य bag मनावर  अडकवतो आणि चालत राहतो. bag जड होऊ लागते हळूहळू. मग मन थकायला लागतं. bagमधला पसारा सांडू लागतो.  आपल्या सगळ्या गोष्टींवर परिणाम करायला लागतो. कपाट उघडल्यावर कपडे पडावेत ना पायाशी, तसा पडू लागतो. त्या ब्यागेत आता जागा करायला हवी असते. "मला समजून घेणारं कुणी आहे का?" असा प्रश्न पडतो. ह्यावेळी आपल्या सगळ्यांनाच कुणीतरी ऐकणारं, आपल्या मताशी सहमत नसलं तरी 'असं वाटू शकतं', हे समजणारं कुणीतरी हवं असतं.जगासमोर घातलेला मुखवटा इथे काढला तरी चालतो. आपल्याला स्वीकारणारं कुणीतरी हवं असतं. आपल्यातल्याच काही चांगल्या गोष्टी ...

आई-बाबांना कौन्सेलिंगची (parent's counseling)गरज असते का?

बरेचदा, असं लक्षात येतं कि मुलांना वाढवताना आपलीच दमछाक होते. आपण थकतो, चिडतो. आपल्या कल्पनेतल्या आई-बाबांसारखे आपण नसतो. आणि मग अजूनच चिडचिड होऊ लागते. अशावेळी parent's counseling करून घ्यायला हरकत नाही. आई-बाबा होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आपल्या मुलाला कसं वाढवायचं आहे, हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याचा बरेचदा, अत्यंत ढोबळ पद्धतीने केला जातो. माझ्या मुलाला/मुलीला सगळंच यायला हवं असा अट्टहास मग पुढे दिसू  लागतो. मुलं दोन वर्षांची होईपर्यंत ती खूप गोड वाटतात. एकदा का अभ्यास, शाळा, त्यांची स्वत:ची मते आकाराला येऊ लागली कि, मग रागावणे, रडणे, तक्रारी, तुलना ह्या गोष्टी सुरु होतात. मुलांशी आपलं नातं ताणलं जातं.  मुलांनी ऐकलं नाही तर  कसं वागायचं. अभ्यासाची गोडी कशी लावायची, मुलाला अभ्यास आवडलाच नाही तर काय करायचं, सवयी कशा मोडायच्या आणि कशा लावायच्या हा विचार आपण फारसा कधी करतच नाही. मग जेव्हा काही कारणाने मुलं आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत, तेव्हा आधी आपणच सैरभैर होतो. आपलं मूल असं वागूच कसं शकतं हा विचार त्रास देऊ लागतो. आपण सगळं frustration मुलांवर काढतो...
"आई मला हाताने करायचंय, करू दे नं वं.." चार वर्षांचा मुलगा TV पाहत बसलेला असतो. आई एकेक घास करत त्याच्या तोंडात कोंबते. तिला हवं तेवढं त्याने खाल्लं कि मग म्हणते, "मी भरवल्याशिवाय खातंच नाहीस तू."  सहा वर्षांचा मुलगा शाळेसाठी तयार होत असतो. म्हणजे आई त्याला दात घासून देते, बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घालते. कपडे चढवते, सॉक्स-बूट घालून देते आणि नंतर त्याची bag आपल्या पाठीवर घालून त्याला वर्गापर्यंत पोहोचवते. एका जुनियर केजीतल्या मुलाची वही एकदा पहिली. अगदी व्यवस्थित आडव्या- उभ्या रेषा काढलेल्या होत्या (standing lines- sleeping lines). मी म्हटलं, "हुशार हं मुलगा.." तर आई म्हणाली, "अहो कसंच. बसतंच नाही तो. बसला तरी सरळ रेष येतंच नाही त्याला. वेड्या-वाकड्याच जातात. वही  पूर्ण व्हायला नको का? मीच देते काढून त्याला."  एकदा एक आई सांगत होती, "सात वाजता van येते, मी पावणेसातला उठवते तिला. मग अज्जिबात त्रास देत नाही ती. मग पटपट आवरून होतं दहाव्या मिनिटाला. लवकर उठवलं ना तर सगळं तिलाच करायचं असतं. मग खेळत-खेळत उशीर लागतो. बरेचदा मुलं मोठ...

आई- सुरुवातीचं विश्व आणि विश्वासाची सुरुवात

'जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास' ही माणूस म्हणून घडण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट. अगदी तान्ह्या बाळालाही गरजेची असणारी.   'जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास आकाराला येण्यासाठी  बाळाशी त्याच्या आईचं किंवा आईसारख्या कुणाचं तरी नातं फार महत्त्वाचं असतं. 'प्रेम-विश्वास ' ह्या संकल्पनेची सुरुवात ह्याच नात्याने होते. बाळाच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच बाळाला comfort देणं, त्याच्या रडण्याला response देणं, त्याला मायेने जवळ घेणं आणि त्याला कळत नसलं तरीही, 'भूक लागली शोनाला...आत्ता येते हं पिल्लू' असं काहीतरी बोलणं विश्वास संपादन करण्यासाठी  खूप आवश्यक असतं. हे सगळं सातत्याने पुरवणंही गरजेचं असतं.  सुरुवातीचे सहा आठवडे बाळाला काहीच कळत नाही. पण त्याकाळात आजूबाजूच्या परिसराची ओळख मात्र होत असते. आपल्या प्रत्येक हाकेला  कुणीतरी 'ओ' देतंय हे ह्या काळात बाळाला कळते. अर्थात, हीच आपली आई हे कळायला थोडा अवकाश असतो. साधारण तिसऱ्या महिन्यापासून 'हीच ती बाई हं, जी मला मायेने जवळ घेते हे बाळाला कळू लागतं.' मग हुं..हुं करणे, हसणे ह्या गोष्टींना सु...