अभ्यासात येणाऱ्या अडचणी, वाचता न येणे, वाचलेले सांगता येणे पण, लिहिता न येणे, स्पेलिंग्स लक्षात न राहणे, ह्या सगळ्यांच्या मागे learning disability हे कारण असू शकतं. मागील लेखांमध्ये अशा प्रकारच्या समस्यांचा उल्लेख केला होता. पण, learning disability म्हणजे काय? ह्या बाबत माहिती ह्या लेखात पाहूया. learning disability म्हणजे शाळेत शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी इतर मुलांप्रमाणे समजून घेता न येणे. समजलेल्या गोष्टी शब्दांत मांडता न येणे. असे का? learning disability असणारी मुलं कमी हुशार असतात का? आळशी असतात का? हि कधीच शिकू शकणार नाहीत का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. हि मुलं हुशार असतात. आळशी किंवा मूर्ख नसतात. त्यांच्या मेंदूमध्ये असणारा corpus callosum नावाचा भाग जरासा गोंधळलेला असतो. corpus callosum हा भाग मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाला जोडणारा असतो. त्याचा गोंधळ उडाल्यामुळे, वाचताना आलेली माहितीवर व्यवस्थित प्रक्रिया होत नाहीत. म्हणूनच आपण काय वाचतो आहोत हे मुलांना समजतच नाही. मग वाचन हि त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक गोष्ट ठरते. ...
Posts
Showing posts from July, 2015
- Get link
- X
- Other Apps
अवनीश धावता-धावता पडला आणि अवनिशच्या आजीने ओरडायला सुरुवात केली. "मुलाकडे लक्ष ठेवायला काय होतं? डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला हवी त्याची." अवनीश जरासा खोडकर मुलगा. पडणं, लागणं ह्या गोष्टी त्याच्यासाठी नेहमीच्याच. आजीला मात्र त्याला जरासं लागलं तरी चालत नाही. तो पळायला लागला कि, आजी म्हणते, "अरे, हळू पळ." उडी मारली कि, "बास, जागेवरच उडी मार." वरती चढला कि, "अरे एकटा वर चढू नकोस." तुम्ही म्हणाल, "किती प्रेम आहे,आजीचं !" आजीचं प्रेम आहे, ह्या बाबत शंका नाहीच. पण, पडणं, लागणं हा मुलांसाठी एक अनुभव आहे. सारखं सांगून मुलं जे शिकत नाहीत ते अशा अनुभवातून शिकतात. अवनीशच्या आजीसारखी आजीच नाही तर कितीतरी आई-वडीलही अशा प्रकारे मुलांना अनुभव घेण्यापासून अडवताना दिसतात. अर्थात, काहीवेळेस मुलांना अडवणे गरजेचे असते. पण, फक्त आपल्या भीतीपोटी मुलांना अडविणे किती योग्य आहे? काही वर्षांपूर्वी, मराठीच्या कुमारभारतीच्या पुस्तकात एक धडा होता, 'वेड लागलेले घर'. मुलं पडू नयेत, लागू नये म्हणून घरच त्यांची काळजी घेतं. हि काळजीच मुलांसाठी कशी ध...
- Get link
- X
- Other Apps
"आम्ही आमच्या मुलाला सगळं देतो, पण हा त्याचा काहीच उपयोग करून घेत नाही." जवळपास सगळ्या पालकांची आपल्या मुलांबद्दल हीच तक्रार असते. आई-वडील शिकविण्यासाठी, मदतीसाठी तयार असताना मुलं ती मदत नाकारून एका कोषात जाऊ पाहतात. बाबांनी किंवा आईने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी त्यांचा संयम सुटेपर्यंत देण्याचं टाळतात. ह्याचं कारण काय असावं? कोषात जाणारी हि मुलं इतरवेळी अगदी मजेत दिसतात. त्यांना हवं ते करताना, आई-बाबांशी इतर विषयांवर बोलताना ती दडपणाखाली नसतात. इतर मुलांशी, लोकांशी बोलताना ती कधीच अडखळत नाहीत. घाबरत नाहीत. उलट त्यांचे नातेसंबंध खूप चांगल्याप्रकारे जपलेले असतात. पण काही बाबतीत, उदा. अभ्यास, मौन स्वीकारणं पसंत करतात. जेव्हा अशा मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाणवलं कि, मनात खूप भावना आहेत पण त्या व्यक्त करता येत नाहीयेत. कारण, आपण भावना व्यक्त केल्या तर काय प्रतिक्रिया येईल ह्याचा त्यांना अंदाज येत नाही. आपलं चुकलं तर? हि भीती बरेचदा मुलांच्या मनात असते. अशा मुलांच्या आई-बाबांशी जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा जाणवलं, कि, त्यांची आई ...
- Get link
- X
- Other Apps
मुलं शाळेत जायला लागतात, तेव्हाच, खरंतर त्याच्याही आधी घरीच त्यांची एक शाळा सुरु झालेली असते. ह्या शाळेत मुलं खूप गोष्टी शिकतात. पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी शिकतात. स्वावलंबी होणे, वेळ पाळणे, लोकांमध्ये मिसळणे, इतरांच्या भावनांचा आदर करणे, स्वत:च्या हक्कांसाठी भांडणे, तडजोड करणे, ह्या सगळ्या गोष्टी घरच्या शाळेत शिकविल्या जातात. ह्या शाळेत शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणं आणि स्वत: शिकवणं ह्या शाळेचे शिक्षक म्हणून आई-बाबांची जबाबदारी आहे. आई -बाबा म्हणून त्यांना भरवणं, आवरून देणं, वेळेत शाळेत पाठवणं, दप्तर भरून देणं, ह्या गोष्टी करता-करता, आपलं ह्या शिक्षकाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना?
- Get link
- X
- Other Apps
अभ्यास म्हटलं कि, वाचन, लेखन, आकलन आणि स्मरण ह्या क्रिया अपरिहार्य ठरतात. वाचन हा सगळ्या गोष्टींचा पाया. बरेचदा, मुलांना वाचनाचाच कंटाळा येतो. वाचन म्हणजे फक्त अक्षरे आणि शब्द डोळ्यांखालून घालणे नव्हे, तर त्यांचा अर्थ लावणे. अर्थ लावण्याची क्रिया आपोआप होत असते. म्हणूनच त्या कडे फारसे लक्ष जात नाही. शब्द पाहण्याबरोबर त्या गोष्टीबद्दल विचार करणंही गरजेचं असतं. हेच विचार कित्येक वेळा भरकटतात आणि वाचलेले लक्षात राहत नाही. काही वेळेस धडा लवकर संपता संपत नाही, आणि कंटाळा येऊ लागतो . वाचन आणि त्यासंबधीचे विचार दोन्ही एकाच वेळी सुरु असतील तर समजावून घेण्याची क्षमता वाढते. ह्यासाठी अभ्यासकांनी काही पद्धती शोधून काढल्या आहेत. ह्यातील काही पद्धती पुढे देत आहे. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी धड्याची ओळख करून घेणे. जेव्हा धड्यामध्ये दिलेल्या गोष्टींची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते, तेव्हा तो धडा लवकर कळतो. म्हणजे, जर "भारताचे प्राकृतिक विभाग"असा धडा असेल, तर प्राकृतिक म्हणजे काय? हे आधी समजणे गरजेचे आहे. तसेच असे विभाग का करतात हेही समजणे आवश्यक आहे. ह्यानंतर धडा वाचला...