Posts

Showing posts from 2016
मुलांची मानसिकता मानसिकता किंवा mentality हा शब्द आपण कैक वेळेस वापरतो. मानसिकता म्हणजे विचार करण्याची ठराविक पद्धत. हि प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्याच्यावर  आपल्या श्रद्धा-अंधश्रद्धा,मूल्य, अनुभव, शिक्षण, समाज ह्यांचा पगडा असतो. विचार करण्याची हि पद्धत अर्थात attitude आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक असतो.  कारण, ह्या पद्धतीवर आपले विचार, भावना आणि वागणं अवलंबून असतं. कोणत्याही दृष्टिकोनाचे हे तीन महत्वाचे घटक असतात. ह्या दृष्टीकोनाच्या आधारावरच आपण परिस्थितीशी लढा देऊ शकतो किंवा जुळवून घेऊ शकतो किंवा पळही काढू शकतो. एकाच घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो, पेला अर्धा सरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, सरला आहे म्हणायचं कि भरला आहे म्हणायचं? ते तुम्हीच ठरवा.  दृष्टीकोनावरच आपली प्रगती अवलंबून असते. Our attitude towards life determines life's attitude towards us.   जेव्हा लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करायचा असतो तेव्हा मानसिकता तयार होणे आणि विकसित होणे ह्या बाबी अत्यंत महत्वाच्या ठरतात...
एक दिवस विचार केला, 'कशासाठी काम करायचं? कशासाठी पैसे मिळवायचे?' आणि काम करण्यातला उत्साहच नाहीसा झाला. मग विचार केला, जे  खूप दिवसांपासून करायचंय त्यांची एक लिस्ट करूयात. थोडक्यात आपल्या  इच्छांची लिस्ट बनवूयात. आणि  काय विचारता, त्या वस्तू मिळविण्यासाठी, मी ताबडतोब कामाला लागले. आपली सगळ्यांचीच  एक 'wishlist' असते. काय घ्यायचं? काय शिकायचं? कसं रहायचं? ह्याबद्दलची स्वप्न असतात. हि wishlist थोडी थोडी करत पूर्ण करायला लागलो कि, आनंद आणि उत्साह दोन्हीही निर्माण होतात.  कष्ट करून थकलो, वैतागलो कि, हि 'wishlist' आठवावी.  पुन्हा कष्ट  करण्याची इच्छा निर्माण होते.  motivation मिळतं. बरेचदा, आपल्या  मुलांची अशी wishlist आपणच बनवतो.  मग त्याचं स्वप्न आपलं स्वप्न होऊन जातं. आपण त्याच्या मागे लागतो. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडत नाही म्हणून त्याच्यावर वैतागतो.  कित्येकदा, आपणच त्याला सांगून टाकतो. 'तुला गाडी घ्यायाचीये ना, मग आधी इंजिनियर हो.'  म्हणजे, 'तुला जे आवडेल ते मी करतो, मला जे आवडेल ते तू कर.'  वर आणि "आमची त्...
माझी मुलगी senior kg  मध्ये जाते. वाचन शिकण्याचं तिचं वय. परवा तिचं एक पुस्तक हातात धरून घडाघडा वाचत होती. मला कौतुक वाटलं. मी तिला दुसरा तसाच परिच्छेद लिहून दिला. तर ती गडबडली. नंतर लक्षात आलं कि, शाळेत तो धडा पाठ करून घेतला होता. unit  test ला तोच वाचायला सांगणार होते. ज्यांना पाठ नाही झाला त्यांना कमी मार्क्स मिळणार होते. गेल्या काही दिवसांत मी आठवी ते दहावीच्या बऱ्याच मुलांना भेटले. काही जण ९०% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविणारी होती. सहज म्हणून अभ्यासाची चर्चा करताना लक्षात आलं, कि, मुलं पाठ्यपुस्तकं  फारशी वाचतच नाहीत. प्रश्नोत्तरे शाळेतून दिली जातात. गाईड्स असतात, ट्युशन मध्ये उत्तरे पाठ करून घेतली जातात. अगदी निबंध सुद्धा रेडीमेड असतात.  तेच पाठ करायचं आणि परीक्षेला जायचं. परीक्षा द्यायची आणि मार्क्स मिळवायचे.  मार्कांची हि धडपड  senior  kg  पासून किंवा त्याच्याही आधीपासून  सुरु होते. मार्क्स मिळतात पण शिक्षण बाजूलाच पडतं.    प्रश्नोत्तरांच्या स्वरूपाने मार्क्स वाढत असतील पण धड्यातली मजाच जातेय असं वा...
हल्ली, आत्महत्येच्या अनेक घटना वाचनात येतात. आत्महत्येचे टोक मुलं का गाठतात? माझा मुलगा/मुलगी असे करणार तर नाही ना? असे प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असतील. मुलांची नकारात्मक विचारसरणी हि एक चिंताजनक गोष्ट आहे. आपलं मूल नकारात्मक विचार करतंय का, हे शोधण्यासाठी पालकांनी काही गोष्टी पडताळून पहाव्यात: १) तुमचं मूल सतत चुकांचाच विचार करतं का? २) थोड्याश्या अपयशाने खचून जातं का? ३) मला काहीच जमत नाही, असा त्याचा समज आहे का? ४) कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी अपयशाचाच विचार मनात येतो का? ५) घडून गेलेल्या चुकांबद्दल अपराधी वाटतं का?  ६) दुसऱ्यांच्या  चुका सहन करणेही त्याच्यासाठी अवघड जाते का ? ७) चिडचिड होते का? ८) मुलांमध्ये मिसळणं टाळतं का? आपलं मूल जर नकारात्मक विचार करत असेल, तर त्याला वेळीच सावरायला हवं.  त्याला सावरण्यासाठी,  वेळ काढून त्याच्याशी बोला. त्याला तुम्ही स्वीकारलंय ह्याची जाणीव करून द्या. त्याला जमणाऱ्या गोष्टींची त्याला जाणीव करून द्या. थोडासा राग येणं, कधीतरी हरणं हे त्याच्यासाठी सवयीचं असू द्या.  चुका होणं हे स्वाभाविक आहे, हे त्याला...
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, माझ्या मुलीला औषध द्यायचं होतं. नेहमीप्रमाणे, औषध देतानाचा गोंधळ, हात-पाय झाडणे, तोंडातून औषध बाहेर टाकणे असे प्रकार चालू होते.  मग तिच्या बाबाने तिच्या हातात औषधाचा पेला दिला आणि म्हणाला, " हे घे, बरं वाटण्यासाठी तुला थोडंसं औषध घ्यावं लागेल. ते फारसं वाईट नाहीये. "  ती पटकन स्वत:च्या हाताने औषध प्याली. त्यानंतर औषध देताना कधीच रडारड झाली नाही.  कित्येकदा, अनेक प्रसंगांचा आपण आधीच बागुलबुवा निर्माण करतो.  मुलांना परिस्थितीची जाणीव करून देणं टाळतो. खरंतर, मुलांना आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त कळत असतं. आमच्या शेजारी दोन बहिणी राहतात. एकाच शाळेत जातात. एके दिवशी काही कारणाने मोठी बहिण शाळेत गेली नाही. हि गोष्ट धाकटीला कळली, कि , ती रडून गोंधळ करणार म्हणून ती लपविण्याचा घरातल्या सगळ्यांनी खूप प्रयत्न केला.  अगदी कुणी विचारलं तर त्यालाही तोंडावर बोट ठेऊन शांत राहायला सांगायचे.  शेवटी तिला कळलंच आणि हे आधी सांगितलं नाही म्हणून तिने गोंधळ केला.  असे प्रसंग थोड्या-फार फरकाने सगळ्यांच्याच घरात होत...
पत्रिका हा खरंच काय प्रकार असतो? लग्न जुळवताना, "पत्रिका जुळली पाहिजे", हि अट मुख्य. पत्रिका जुळली म्हणजे संसार सुखी होतो म्हणे. मला आपलं उगाच वाटायचं, नवऱ्यासाठी वेळ काढावा, जरा गप्पा माराव्यात, त्याला समजून घ्यावं.  (मला अनुभव नाही. आमची पत्रिका न जुळून संसार दु: खाचा झालेला नाही). हल्ली बहुदा, पत्रिका बनविण्याची आणि पाहण्याची fashion असावी.  परवा, एक काका माझ्याकडे आले आणि  त्यांनी त्यांच्या समस्यांची यादी वाचली. सवयीप्रमाणे मी शांतपणे ऐकून घेतले. त्यांना मोकळं वाटण्यासाठी ते आवश्यक होतं. सगळं झाल्यावर त्यांनी जन्मपत्रिका काढून माझ्याकडे दिली. म्हणाले, उपाय सांगा. मी म्हटलं. "मी पत्रिका पाहत नाही". मग त्यांनी हात पुढे केला. मी हातही पाहत नाही हे कळल्यावर त्यांचा चेहरा उतरला. "मग माझ्या प्रोब्लेमचे उत्तर तुमच्याकडे कसं?" त्यांनी विचारलं.  मी म्हटलं, "माझ्याकडे रेडीमेड उत्तर नाहीच. पण तुमचे प्रोब्लेम्स तुम्हाला सोडवता यावेत ह्यासाठी मी मदत करू शकते" "म्हणजे मीच माझे प्रोब्लेम्स सोडवायचे?"  त्यांनी विचारलं.  "अर्थात, तुमच्...

लेखन

काल माझ्यासमोर एक मुलगा विज्ञानाचे पुस्तक वाचत होता. धडा होता 'World of Matter'. धड्यातला पहिला परिच्छेद खूप छान आहे. तो वाचून झाल्यावर मी त्याला विचारलं, "तुला ह्यातलं काय समजलं?" त्याने पुस्तकातली वाक्यं जशीच्या तशी मला ऐकवली. मी पुन्हा विचारलं, "म्हणजे काय?" आता तो गडबडला. धड्यात काय लिहिलंय त्याचा त्याच्या आयुष्याशी संबंध जोडणं त्याला जमत नव्हतं. matter म्हणजे काय हे सांगताना आजूबाजूची उदाहरणं देणं त्याला जमत नव्हतं. ह्याचा अर्थ असा नाही कि, तो मठ्ठ होता. पण पाठ्यपुस्तकातल्या गोष्टी फक्त परीक्षेतच लिहायच्या असतात असा त्याचा समज झाला होता. आणि त्या तो अर्थ न लावता पाठ करत होता. अशी कितीतरी मुलं आज दिसतात. प्रश्नाची उत्तरे पूर्णविराम, स्वल्पविरामासह पाठ करणारी मुलं सुद्धा आहेत. प्रश्नाची उत्तरे जेव्हा लिहिली जातात तेव्हा ती पाठांतराच्या जोरावर असतात, आकलनाच्या नाही. म्हणूनच मग, जेव्हा ते लिहिण्याची वेळ येते तेव्हा मात्र गडबड होते. शब्दच आठवत नाहीत. मुद्दा मागे-पुढे होतो. उत्तर १०० शब्दांत लिहायचं असतं पण  दोन वाक्यांच्या वरती  काय लिहावं हे सुचत नाही. ध...

comprehension

comprehension अर्थात आकलन. अभ्यास करताना विशेषतः वाचताना सगळ्यांत  महत्वाची गोष्ट म्हणजे आकलन. भाषा विषयांमध्ये ह्यासाठी वेगळा परिच्छेद आणि प्रश्नोत्तरे दिली जातात. खरंतर, सगळे विषय त्याच स्वरूपाचे असतात. धडा वाचायचा आणि प्रश्नोत्तरे लिहायची. धड्याचे आकलन म्हणजे समजून घेणे. आताशा बऱ्याच शाळांमध्ये रेडिमेड प्रश्नोत्तरे दिली जातात. त्यामुळे धडा व्यवस्थित वाचण्याचा आणि शब्दांचे अर्थ लावण्याचा फारसा संबंध येत नाही. इथे खरी गाडी अडते. कसलीही समस्या नसताना पाठाचे आकलन करण्यात मुलं कमी पडतात. प्रश्नोत्तरे येत असतात पण धडा समजलेलाच नसतो. मार्क्स पडतात पण पुढे जेव्हा त्याच्याच आधारावर पुढचं शिक्षण घ्यायचं असतं  तेव्हा मुलं गडबडतात. दहावीला ९०% आणि अकरावी-बारावी अवघड जाते असं चित्र बरेचदा दिसतं. आकलन होणे किंवा धडा समजणे म्हणजे त्या धड्याशी संबंधित विचार करता येणे. लेखकाने नेमकं काय आणि कशासाठी लिहिलं असेल ह्याचा अंदाज बांधता येणे. ही गोष्ट वाचन शिकविण्याच्या बरोबरीने शिकविता येते. बरेचदा ही क्रिया आपोआप घडते तर बरेचदा घडवावी लागते. पाठाचे आकलन चांगलं होण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्...
               ख.. खोटे "खोटं कधी बोलू नये" , हि शिकवण लहानपणापासून दिली जाते. तरीही , " पोट दुखतंय , शाळेत जात नाही" , " माझा अभ्यास झालाय" किंवा "गृहपाठाची वही विसरलो ," असं छोटं-मोठं खोटं सगळीच मुलं बोलतात. हे खोटं बोलण्याचं प्रमाण जेंव्हा मार्कांची अदलाबदल करणे , गृहपाठ दिलाच नाहीये असे सांगणे , निरोप न देणे , चुका लपविणे , न सांगता पैसे घेणं , अशा प्रकारे वाढत जातं तेंव्हा ती एक सवय बनून जाते.  खोटं बोलणे एक चिंतेचा विषय बनत जातो. खोटं बोलण्याची सवय अगदी लहान वयात जडू लागते. मुलं जसजशी मोठी होतात तसतसे खोटं बोलण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचे सवयीत रुपांतर होते. मग खरं बोलतानाच घाबरल्यासारखे वाटते. काही मुलं  परिस्थितीतून सुटण्यासाठी खोटं बोलतात तर काही आपल्याला हवी ती गोष्ट मिळविण्यासाठी प्लान करून खोटं  बोलतात. खोटं बोललं जातं ते परिणामांना घाबरून एखाद्या तीन वर्षांच्या मुलाला जर पाणी सांडल्यामुळे , रागावून विचारले , " कुणी सांडलं ?" तर आपोआपच उत्तर येतं , " मी नाही".   तुमच्या आविर्भावावरून मुलांना तुम्ही राग...
मुलांना आई-बाबांचा धाक असणं खरंच आवश्यक आहे का? आई-बाबा मारतील म्हणून किती मुलं वाईट गोष्टींपासून परावृत्त झाली आहेत? मला माझ्या आईवडिलांची ज्या कारणासाठी भीती वाटायची त्या गोष्टी मी त्यांच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करायची. एकदा, आईने मला विश्वासात घेतलं आणि समजावून सांगितलं. माझं म्हणणं तिला पटतंय असं सांगितलं पण दुसरी बाजू समोर ठेवली आणि विचार कर म्हणाली. तिथून पुढे तिने तीच स्ट्रॅटेजि ठेवली. चुकल्यानंतर कडक शिक्षा मला कधीच झाली नाही. पण विचार करण्याची, चूक सुधारण्याची संधी मात्र मिळाली. त्यामुळे मी पर्फेकशनीस्ट झाले नाही, पण इतरांना स्विकारायला आणि माफ करायला शिकले. आईचं म्हणणं पटत गेलं. खोटं बोलणं, लपवाछपवी ह्याला आमच्या नात्यात स्थानच उरलं नाही. आईने मला धाकात ठेवलं नाही म्हणून मी खूप चुका केल्या, पण आईने स्वीकारलं म्हणूनच त्या सुधारू शकले. parenting चा विचार करताना आणि मुलांना कसं घडवावं हे ठरवताना आपल्या वागण्याचा थोडासा विचार करायला हवा. मुलं तुमचा उपदेश ऐकून घडत नाहीत, तुमचं वागणं पाहून घडतात.