बरेचदा, असं लक्षात येतं कि मुलांना वाढवताना आपलीच दमछाक होते. आपण थकतो, चिडतो. आपल्या कल्पनेतल्या आई-बाबांसारखे आपण नसतो. आणि मग अजूनच चिडचिड होऊ लागते. अशावेळी parent's counseling करून घ्यायला हरकत नाही. आई-बाबा होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आपल्या मुलाला कसं वाढवायचं आहे, हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याचा बरेचदा, अत्यंत ढोबळ पद्धतीने केला जातो. माझ्या मुलाला/मुलीला सगळंच यायला हवं असा अट्टहास मग पुढे दिसू लागतो. मुलं दोन वर्षांची होईपर्यंत ती खूप गोड वाटतात. एकदा का अभ्यास, शाळा, त्यांची स्वत:ची मते आकाराला येऊ लागली कि, मग रागावणे, रडणे, तक्रारी, तुलना ह्या गोष्टी सुरु होतात. मुलांशी आपलं नातं ताणलं जातं. मुलांनी ऐकलं नाही तर कसं वागायचं. अभ्यासाची गोडी कशी लावायची, मुलाला अभ्यास आवडलाच नाही तर काय करायचं, सवयी कशा मोडायच्या आणि कशा लावायच्या हा विचार आपण फारसा कधी करतच नाही. मग जेव्हा काही कारणाने मुलं आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत, तेव्हा आधी आपणच सैरभैर होतो. आपलं मूल असं वागूच कसं शकतं हा विचार त्रास देऊ लागतो. आपण सगळं frustration मुलांवर काढतो...