Posts

Showing posts from January, 2017
सकारात्मक किंवा नकारात्मक विचार आणि त्यांचे  आपल्या वागण्यावर होणारे परिणाम  आपण मागील लेखात पहिले.  स्वत:शी नकारात्मक संवाद साधणाऱ्या लोकांना वेळीच अडवायला हवं हेही आपण पहिले.  एखादा माणूस स्वत:शी नकारात्मक संवाद साधतोय हे कसं ओळखायचं? १. माणूस जेंव्हा स्वत:शी नकारात्मक पद्धतीने बोलत असतो, तेंव्हा तो स्वत:च्या चुकांवर  आणि कमतरतेवर जास्त लक्ष देतो.  न येणाऱ्या गोष्टी त्याला पटकन सांगता येतात. २. नकारात्मक विचार करणारा माणूस थोड्याश्या अपयशाने लगेचच खचतो. थोडेसे ओरडलेलेसुद्धा मनाला लागते. ३. कोणत्याही कारणासाठी स्वत:ला दोष द्यायला सुरुवात करतो. ४. हे नेहमीच असंच होतं. माझ्या बाबतीत नेहमी वाईटच घडतं असा विचार करू लागतो. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती जेंव्हा अशाप्रकारे विचार करतात तेंव्हा त्यांना सावरण्यासाठी. त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. बरेचदा बोलणे ऐकण्यापूर्वीच प्रतिक्रिया दिली जाते. त्यामुळे बोलणंच थांबतं.  प्रतिक्रिया दिली नाही आणि लक्षपूर्वक ऐकून घेतलं तर मात्र भावनांना मोकळी वाट करून दिली जाते. ह्यानंतरची पायरी असते ती म्हणजे त्य...