Posts

Showing posts from March, 2016

संवाद आपलाच आपल्याशी

सकारात्मक किंवा नकारात्मक विचार म्हणजे आपण स्वत:शीच साधलेला संवाद. बरेचदा हा संवाद आपल्या पुढच्या समस्या सोडवतो तर बरेचदा आपल्यापुढे नवीन समस्या निर्माण करतो.  ह्या संवादाला आपणच दिशा देत असतो , आपल्याही नकळत. आपल्याला दु:खातून सावर ण्यासाठी ,  अपयश पच वण्यासाठी मदत करतात ते आपले विचार , तर आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्या पासून , यशस्वी होण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यापासून अडवतात तेही आपले विचारच.   उदा. दुसऱ्या दिवशी अवघड पेपर असताना तुमचे   मन तुम्हाला सांगते , ' उद्याचा पेपर जरा अवघड आहे , पण मी बऱ्यापैकी अभ्यास केलाय.  माझ्या हातात आताही वेळ आहे. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ?' ,   हे सकारात्मक विचार तुम्हाला प्रयत्न करायला भाग पाडतात. ह्या उलट , नकारात्मक विचार तुमच्यापुढे असंख्य तक्रारींची मालिकाच घेऊन उभे असतात. उदा. दुसऱ्या दिवशी अवघड पेपर असताना तुमचे   मन तुम्हाला सांगते ,  ' बापरे! कसं होणार ?  मी अभ्यास केलाय पण मी केलेलं आलंच नाही तर ? हा विषयच नको होता. माझं चुकलंच विषय निवडताना. आता उद्या पेपर अवघ...