मुलांना कसं वाढवायचं ? कसं शिकवायचं ? काय शिकवायचं ? ह्याबाबतीत अगदी सहज मार्गदर्शन उपलब्ध आहे. हल्ली नुकत्याच आई झालेल्या किंवा लवकरच आई होणार असणाऱ्या मुलीही ह्या बाबतीत विचार करतात. मुलाला काही कमी पडू नये , आणि मुलंही कुठे कमी पडू नयेत म्हणून तत्पर असतात. पुस्तकांत किंवा लेखांमध्ये दिलेली आदर्श पालक होण्यासाठीची तत्वे पाळण्याचा पूर्ण प्रयत्न होतो. तरीही , आपल्याला हवं तसं ' आदर्श ' आपल्याला वागता येत नाही , अशी बोचणी मनाला लागून राहते. ' मुलांना स्वत:च्या गोष्टी करू द्याव्या ,' असं मानसशास्त्र सांगते पण किती प्रमाणात हे सांगत नाही. मुलांशी प्रेमाने वागा असंही सांगते पण तरीही चिडचिड होते , हात उचलला जातो. मुलांना निर्णय घेऊ द्या असं सांगितलं जातं , पण नाही म्हटलं तरी सूचना दिल्या जातातच. मार्गदर्शक तत्वे अमलात आणणे फार कठीण जातं. आणि आई बाबांना आपण आदर्श होऊ शकत नाही ह्याचं बरेचदा वाईट वाटतं. काही पालक जाणीवपूर्वक स्वत:च्या वागण्यात बदल करण्याचा प्रयत्न करतात. पण पूर्णपणे स्वत:ला बदलता येत नाही ह्...
Posts
Showing posts from March, 2015
- Get link
- X
- Other Apps
मुल रडायला लागलं कि, आई, बाबा, आजी, आजोबा आणि घरात असतील तेवढे सगळे त्याला शांत करण्याच्या मागे लागतात. त्याचं मन दुसरीकडे रमवणं, त्याला हवी ती गोष्ट आणून देणं असे अनेक प्रयत्न केले जातात. जरा मोठी म्हणजे भाषा कळू शकणारी मुलं रडू लागली कि त्यांना रागावलं जातं. "आवाज बंद, रडायचं नाही", अशा शब्दात त्यांना गप्प केलं जातं. मुलांनी रडणं हि गोष्ट बरेचदा आई-बाबांना कमीपणाची वाटते किंवा त्यांच्या रडण्याचा आई-बाबांना त्रास होत असतो. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोळ्यात पाणी येणं फारच मनावर घेतलं जातं. एकंदरीतच मूल रडू नये म्हणून सर्वपरीने प्रयत्न केले जातात. मुलांचं किंवा मोठ्यांचं रडणं खरंच वाईट असतं का? शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर रडणं हे येणारा ताण कमी करण्यासाठी मदत करणारं ठरतं. म्हणूनच, वाईट वाटून घेण्यासारखं रडण्यामध्ये काहीच नाही. उलट, रडणं म्हणजे मोकळं होणं, दु:ख दूर होणं. लहान मुलांच्या रडण्याची निरनिराळी कारणे असू शकतात. अगदी तान्ही बाळं जेव्हा रडतात तेव्हा ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. भूक लागलीये, दुखतंय, टोचतंय किंवा असंच काहीतर...
- Get link
- X
- Other Apps
मुलांना वाचनाची सवय कशी लावायची? हे आपण मागील लेखात पहिले. वाचन, लेखन, स्मरण, आकलन ह्या सर्वच गोष्टींसाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे मन एकाग्र करता येणे. लक्ष देऊन केलेली कोणतीही गोष्ट उत्तमरित्या कळते आणि लक्षातही राहते. ती गोष्ट सातत्याने करणे हेही अभ्यासासाठी आणि खेळासाठीही आवश्यक असते. बरेचदा मुलांना मन एकाग्र करताना अडचणी येतात. अभ्यासाला बसल्यानंतर बाहेर खेळायला जावेसे वाटते, दुसरेच काहीतरी आठवते. सतत चुळबुळ सुरु असते, हात-पाय हलत असतात. वर्गात एका जागेवर बसायला अवघड जाते, शिकवताना थोड्याच वेळात लक्ष विचलित होते, छोट्या-छोट्या गोष्टी, शाळेचा अभ्यास विसरतो, शब्द लिहिताना काना-मात्रा विसरून राहते, गणितामध्ये हमखास कोणत्यातरी आकड्यापुढे शून्य विसरतो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्या मन एकाग्र न करता येण्यामुळे. हि मुलं खूप impulsive असू शकतात. बरेचदा, अतिचंचल आणि impulsive असल्यामुळे भांडणं, मारामाऱ्या ह्या गोष्टीही ठरलेल्या असतात. अशी चुळबुळ करणारी मुले ही आई-बाबांसाठी आणि शिक्...