Posts

Showing posts from 2017

increasing stress

"आम्ही तिच्यावर अजिबात बर्डन  टाकत नाही, पण कमीत कमी एवढं तरी तिने करायला हवं हि अपेक्षा असते." आई -बाबा भेटायला आल्यावर हे वाक्य ठरलेलं असतं. ह्या बरोबर खालावत जाणारी शैक्षणिक प्रगती, मुलांची वाढलेली चिडचिड, अजिबात न ऐकणे, केलेला अभ्यास लक्षातच न राहणे, तसेच परीक्षेच्या वेळी काहीच न आठवणे अशा तक्रारीही असतात. मुलांचे वय असते ८-१० वर्षे. जेव्हा अशा मुलांचा दिवस नेमका कसा असतो, हे पाहिल तेव्हा जाणवले, मुले जवळपास 8 तास शाळेत जातात. २ तास क्लासेस, १  ते १  १/२ तास एक्ष्त्र क्लासेस (ह्यांत द्रविंग, दांचे किंवा फूट बाल, बास्केट बाल ह्यासारखे काही क्लासेस येतात) म्हणजे दिवसातले जवळपास १२ तास गेले. उरलेल्या १२ तासांपैकी २ तास तरी मुलांनी सेल्फ स्टडी  करावा असं आई-वडिलांना वाटत असत. मला राहून-राहून प्रश्न पडतो, ह्याला बर्डन नाही तर काय म्हणायचं? दिवसांतला कुठलाच वेळ फक्त त्यांचा नाही. त्या वेळेत खेळायचं कि वाचायचं कि नुसत्याच मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारायच्या हे ठरविण्याच त्यांना स्वातंत्र्यच नाही.  कधी-कधी काहीच करू नये फक्त लोळावे असं आपल्यालाही वाटतं ...

ती...

आमच्या वर्गात ती फेमस होती. सगळा वर्ग तिच्याच बद्दल बोलत असे. नव्हे तसं बोलल्याशिवाय कुणाला राहवतच नसे. तिच्यावरच्या कमेंट्स, तिला चिडवणं, तिच्याबद्दल तिरस्कारयुक्त बोलणं असं काहीसं कायम चाललेलं. ती होतीही तशीच. कुठला तरी lose पंजाबी ड्रेस घालायची. घोट्याच्या जरा वरच आलेली सलवार आणि must अशी ओढणी. केस कसे तरी बांधलेले, आणि चेहऱ्यावर  पावडर फासलेली. जुनाट bag किंवा कॅरी bag घेऊन फिरायची. सोबत कुठल्यातरी काळातली mineral waterची बाटली आणि एक disposable ग्लास असायचा. आमच्या वर्गातल्या थोड्याश्या high-class वातावरणात आम्ही  तिला कधी मिसळूच दिले नाही.  ती तरीही माझ्याशी बोलायची आणि मी कसलाही ताळमेळ न ठेवता तिचा अपमान करायचे. ती पुस्तक घेऊन काहीतरी विचारण्यासाठी यायची आणि मी तिच्या बुद्धिमत्तेची कीव करत तिला उडवून लावायचे.  course संपला, वर्गातले सगळेच तसे एकमेकांशी close झालेलो. मनातून वाईट वाटत होतं त्याबरोबर नवीन क्षितीज खुणावत होतं. माझ्या आयुष्याला तर नव्या जोडीदाराच्या रूपाने नवे वळण मिळाले होते. माझ्या नवीन आयुष्यात मी सुखात होते. तशातच एकदा पुन्हा कॅम्पस व...

पार्टी

पार्टी सुरु होती. धांगडधिंगा, गप्पा, आवाज, गाणी  असलं बरंच काही चाललं होतं.  मधूनच कोणालातरी नाचण्याची लहर आली.  आणि पाहता-पाहता सगळेजण सामील झाले. फक्त एक सोडून. तो तसाही शांत-शांत असायचा.  हुशार होता, कुणाशी फारसं बोलायचा नाही.  "अरे चल ना, मजा येते नाचायला.." ती म्हणाली.  "मला नाच येत नाही, force करू नकोस", तो भीती वाटावी एवढ्या ठाम आवाजात बोलला.  सगळे पार्टीत मश्गुल असताना तो केव्हातरी तिथून निघाला, कोणालाही न सांगता. घरी येताना, त्याच्या डोक्यात विचार चालले होते, 'काय ते फिदीफिदी हसतात, फालतू जोक्स मारतात आणि नाचतात. मला नाही आवडत, it's of no use...' तो असं म्हणत गेला, ज्याने त्याच्याशिवाय कुणालाही फरक पडला नाही.  तो तुटत गेला, इतरांपासून.  एकटा होत गेला.  पुस्तक, लेखन ह्यांत रमत गेला. व्यासंग वाढवत गेला.  पण कुणालाही easily reachable तो नव्हता म्हणून ती मैत्री, जुनी नाती, sharing आणि मजा मात्र हरवत गेली.  कधीकधी त्याला मित्र आठवतात, जुने दिवस आठवतात आणि आता तसं नाही म्हणून तो हळहळतोह...

मैत्री

खूप वर्षांनी तिचा नंबर मिळाला. वाटलं ओळखणार नाही मला. पण राहवलं नाही आणि मी नंबर dial केला. फोन उचलला गेला. "हेल्लो! मी वसुधा बोलतेय.." म्हणाले तशी ती किंचाळलीच. "अगं, कुठेयस तू ? किती दिवसांनी बोलतेयस?" असं म्हणत ती सुरु झाली आणि आम्ही चक्क १/२ तास बोलून मगच थांबलो. ती माझी जुनी मैत्रीण. काळाबरोबर मैत्रीचे धागे कच्चे होत जातात असं आपलं उगाच वाटत होतं. 'रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही . पण मी तुला विसरणार नाही हि झाली खात्री, आणि तुला ह्याची जाणीव असणं हि झाली मैत्री.' - पु. ल. देशपांडे' काही मित्रांच्या बाबतीत हे अगदी घडतं. वर्षानुवर्ष contact नसतो. मग फोन केला कि, तसाच पूर्वीचा आवाज येतो. "बोलो, कैसी हो?" त्यांत मधली अनेक वर्षं पुसली जातात. इतके दिवस आपण बोललो नाही ह्याची नाराजी नसते आणि आपल्याला आधार देण्यासाठी हात पुढे आलेला असतो. वाटतं, 'यारो, दोस्ती बडीही हसीन है.. ये न हो तो क्या फिर बोलो ये झिन्दगी है......'  पैसा, सत्ता, ऐश-आराम ह्या बरोबर असं कुणीतरी मनातलं बोलणार आणि बोललेलं समजणारं असण...

आहे हुशार तरी...

आहे हुशार तरी... बरेचदा, असं होतं कि, मुलं हुशार आहेत हे लक्षात येत असतं. त्यांचे विचार, वागणं प्रगल्भ असतं. पण जेव्हा परीक्षा, अभ्यास अशा गोष्टी समोर येतात तेव्हा तिथे मुलं मागे पडतात. आई-वडील, शिक्षक ह्यांना वाटत असतं, "हा/हि अजून करू शकते. खूप पुढे जाऊ शकते. "  आई-वडिलांचा जीव ह्यांच्यासाठी तीळ-तीळ तुटत असतो, पण  मुलं मात्र ते ऐकायला तयार नसतात.  जणू काही त्यांना यश नकोच असतं.  हया हुशार मुलांना नेमकं काय होतं?  जेव्हा अशा मुलांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा लक्षात आलं कि, ह्याच्यामागे अनेक गोष्टी दडलेल्या असतात.  १) स्व-प्रतिमा- आपल्या नजरेतली आपलीच प्रतिमा. अभ्यासाबाबत अशी प्रतिमा तयार करण्याचं काम शिक्षक आणि पालक करत असतात. काही मुलं नेहमीच खोडकर, व्रात्य, बडबडी ह्या गटांमध्ये टाकली जातात. त्यांना आपण तसंच लेबल लावून टाकतो.  ती पण स्वत:कडे तशीच पाहू लागतात.  क्षमतेपेक्षा कमी यश मिळवू लागतात.  आईवडील, शिक्षक जेव्हा perfectionist असतात तेव्हा नकारात्मक स्व-प्रतिमा तयार होऊ लागते. मला अमुक-अमुक आईसारखं/ बाबासारखे जमत नाही म...
"माझ्या मुलीला ना, कोणी काही बोललेलं सहनच होत नाही, खूप sensitive आहे ती, लगेच रडते. म्हणून आम्ही तिच्यावर अजिबात ओरडत नाही. आता काल teacherने तिला उगाचच शिक्षा केली. त्यामुळेच मी आज शाळेत आले, म्हटलं, डायरेक्ट Principal लाच भेटावं " माझ्या मुलीच्या मैत्रिणीची आई सांगत होती.  हे ऐकणारी, जवळच बसलेली माझी मुलगी म्हणाली, "अगं सगळ्या क्लासलाच उभं राहण्याची punishment दिली होती. आम्ही सगळेच दंगा करत होतो. मग टीचर क्लासमध्ये नसताना नाही तर कधी दंगा  करायचा? केलं तर केलं punish एवढं काय त्यांत? "  त्या बाईला माझ्या मुलीच्या निगरगट्टपणाची काळजी वाटू लागली आणि मला तिच्या मुलीची.  अशी बरीच मुलं असतात. छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात. खूप रडतात. स्वत:लाच त्रास करून घेतात. आई-वडिलांना अशा मुलांचं खूप कौतुक असतं. हि मुलं शक्यतो, आपणहून दुसऱ्यांच्या वाटेला जात नाहीत. नियम मोडत नाहीत. भांडत नाहीत. दंगा करत नाहीत.  मग कधीतरी ह्यांच्याकडून झालेल्या छोट्याश्या चुकीसाठी शिक्षक ओरडले, किंवा सगळ्या वर्गाबरोबर ह्यांनाही शिक्षा झाली कि मग ती खूप रडतात. मनाला लावून घेत...

शापित मी तगमगतो...

ह्या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले पण माझ्या हातानी घरटे हे निर्मियले जगण्याची ओढ अशी, उडण्याचे वेड असे घरट्याच्या लोभातही, गगनाचे दिव्य पिसे व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे अन उबेत घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते हे विचित्र दु:ख असे घेउनी उरी मी जगतो घरट्यातून, गगनातून शापित मी तगमगतो मंगेश पांडगावकरांची हि कविता वाचली कि, मला नोकरी आणि घर अशी दुहेरी कसरत करणारी आई दिसते.  असंख्य आई अशा तगमगत दिवस काढत असतात. आपला जीव पाळणाघरांत सोडून जाताना, कुठेतरी दु:खी होत काम आवारत असतात. मग मुलाला पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून स्वत:च नाराज होतात. अशातच, जर मुलांच्या अभ्यासातून, वागण्यातून काही चिंताजनक गोष्टी आढळल्या तर अपराधी भावनेने ग्रासल्या जातात. मी चांगली आई नाहीये का? करियरकडे लक्ष देऊन चूक करतीये का? असे प्रश्न मनात डोकावू लागतात. पण मग नोकरी हि गरज असते, आर्थिक आणि काही वेळेस मानसिकसुद्धा.  बरं, फक्त नोकरी करणाऱ्या आईच्या बाबतीत हे होतं असं नाही.  सुशिक्षित आणि पूर्वी नोकरी करणाऱ्या पण आता मुलांसाठी घरी असाणाऱ्याची वेगळीच घुसमट असते. आपलं पूर्वीचे स्...

त्यांचं प्रेम...आमचा मनस्ताप

'पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम' हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, 'हे वय आहे का प्रेम करण्याचं?' ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. 'पुन्हा त्याला भेटलीस तर बघ', अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात. आपली मुलगी किंवा आपला मुलगा चुकीच्या माणसाच्या प्रेमात वाहवत जाऊ नये, ह्याची काळजी वाटणं, ती घेणं पालक म्हणून खूप गरजेचं असतं. पण त्रागा हा त्यावर उपाय नाही. मुलांचं प्रेमात पडणं, कुणीतरी आवडणं हा त्यांच्या वाढीच्या टप्प्यातला एक भाग आहे. तो पालक म्हणून आपण स्विकारायला हवा. 'त्याच्यात आहेच काय आवडण्यासारखं?' असा प्रश्न मुलांना विचारण्यापेक्षा 'त्यांना कुणीही कशासाठीही आवडू शकतं', हे लक्षात घ्यायला हवं.  आई-बाबांच्या म्हणण्यानुसार अशा नात्यांना अर्थ नसतो. हे अगदी बरोबर असतं. पण ते चार पावसाळे जास्त पाहिल्यामुळे तुम्हाला कळत असतं. त्यांच्या वयांत असताना तुम्हालाही ते कळलेलं नव्...
 एकदा, एका चार वर्षांच्या चिमुरडीने शाळेच्या drawingच्या परीक्षेत, गुलाबी रंगाचा मोर आणि निळ्या रंगाचा पेंग्विन काढला.  आईने चित्र पाहिलं आणि ओरडलीच, 'कितीवेळेस सांगायचं तुला, मोराचा रंग कोणता? अजून रंग कसे कळत नाहीत तुला?' त्या छोट्या मुलीने सांगितलं, 'पण आई मला गुलाबी रंग आवडतो, मोर पण आवडतो म्हणून मी दिला. ' ' अगं मार्क्स जातात न त्यांत', आई म्हणाली. असंच एका मुलीसमोर, काही crayons, काही ice cream sticks ठेवल्या, थोडा कापूस, रंगीत कागद, कात्री, डिंक आणि लोकरीचे तुकडेही ठेवले. तिला म्हटलं काय हवं ते बनव. मुलगी खुश. तिने पाच-सहा निरनिराळे प्रकार बनवले. जेव्हा ते तिच्या आईला कौतुकाने दाखवले, तेव्हा आई म्हणाली, 'हे सरळ का नाही कापलं? एकाच रंगाचा कागद का वापरलास? stick सुद्धा कलर करायला हवी होतीस.'  मुलगी हिरमुसली. काही  आई-बाबा  कायम एका छडी वाल्या कडक शिक्षकाच्या भूमिकेत असतात. म्हणून मुलांना  ह्यांच्यासमोर बोलण्याचीच  भिती वाटते. ह्यांना perfectionist असं म्हणतात.   'माझं सगळं कसं perfect, हे त्यांचं सतत सांगणं असतं. ' म्हणजे त्यांना लहान म...
'वाट पाहणे',  गोष्टीचा मला खूप राग यायचा आणि म्हणूनच 'वेळ न पाळणाऱ्या माणसांचाही'. एक तर मला कुणी अमुक-अमुक वाजता ये, असे सांगितले तर मी त्या वेळेत तिथे हजर असायचे, असते.  माझी सगळी कामं उरकून, किंवा पेंडिंग ठेऊन. आणि त्यावेळेत जर तो माणूस तिथे नसेल तर मग माझी तळपायाची आग मस्तकात जायची. मला सारखं वाटायचं. सगळ्यांना छडी घेऊन सरळ केलं पाहिजे. वेळ पाळायला शिकवलं पाहिजे. ते काही केल्या शक्य होत नव्हतं. म्हणून चिडचिड वाढत होती. एक दिवस मी विचार केला, 'लोकांचं जाऊ देत. माझी चिडचिड होऊ नये म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे.' मग काही उपाय सुचले. मी माझ्याजवळ पुस्तक ठेवायला सुरुवात केली.  जिथे आधी पोहोचेन तिथे पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. मला वाचायला आवडतंच. फक्त लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात येत असे. तो अक्षरश: उडवून लावला. जिथे हे शक्य नाही तिथे गाणी ऐकायची असं ठरवलं. आणि वेळ अगदी मजेत जाऊ लागला. उशीर करणाऱ्या लोकांचा राग येणं जरा कमी झालं. राग आला कि मी स्वत:ला सांगू लागले, 'It's ok, होतं असं कधीकधी.' मला जाणवलं, आपल्या रागाचं, दु:खाचं, वाईट मूडच...
uninvolved parents, म्हणजे असे आई-वडील ज्यांचं आपल्या मुलाकडे लक्ष नसतं. हल्ली अशा आई-वडिलांकडे फार लक्ष दिलं जातं. आई आणि वडील उच्चपदस्थ, श्रीमंत असतील तर ते uninvolved आहेत असं गृहीतच धरलं जातं.  Uninvolved असणं म्हणजे नेमकं कसं हे मात्र विचारातच घेतलं जात नाही. univolved असणारे आईवडील मुलांच्या कोणत्याच गरजांकडे लक्ष देत नाहीत. ते मुलांकडून कसल्याच अपेक्षाही करत नाहीत. म्हणजे, मुलगा/मुलगी खूपवेळ उपाशी असेल तर त्याला काहीतरी खायला द्यावं हेही त्यांना सुचत नाही. मुलांचा अभ्यास, परीक्षा, मित्र-मैत्रिणी ह्याबाबतीत ते उदासिन असतात. मुलगा जर दु:खात असेल, उदास असेल तर असे का? हा प्रश्न ह्यांना पडत नाही. शारीरिक, मानसिक, भौतिक सर्वच गरजा मुलं आपल्या आपणच पूर्ण करायला शिकतात. समाजापासून तुटत जातात. नातेसंबंध जपताना कमी पडतात. शैक्षणिक प्रगती मंदावते. आईवडिलांच्या uninvolved असण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यांना यशाची भूक असते, जिद्द असते आणि त्या भरांत ते इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.  मुलांकडे लक्ष द्यायचंय हेच त्यांना माहिती नसतं कारण त्यांच्याकडेही कुणीच लक्ष न देता...
तारुण्यात प्रवेश करतानाच मृत्यूला जवळ केलं गेल्याच्या बातम्या वाचल्या कि हृदयाचा ठोका चुकतो. आई-बाबा झाल्यानंतर तर माझा मुलगा, मुलगी असं करणार नाही ना, ही काळजी सतावत असते. अपेक्षा करण्यामागे किंवा सोयी-सुविधा पुरवताना आई-वडील चुकतात असा एक सूर हल्ली सतत कानावर पडत असतो. विशेषत: आईवडील दोघंही कमावणारे असतील तर ते मुलांकडे दुर्लक्षच करणार असंही हल्ली गृहीत धरलं जातं. तसं पाहिलं तर, अगदी खूप busy असणारे आणि भरपूर कमावणारे लोक नेहमीच स्वत:त मश्गुल नसतात, मुलांच्या इच्छा पूर्ण करताना मुलांना शिकवायचं विसरतातच असं नाही. काही ठिकाणी असं होतं म्हणून सगळीकडे असंच होतं असं नाही. किंवा काहीजण स्पर्धेला तोंड देऊ शकत नाहीत म्हणून स्पर्धाच वाईट असंही नाही. कुठेतरी चुकतंय हे खरंय, पण म्हणून प्रत्येकवेळी कमावत्या आई-वडिलांकडेच बोट दाखवायचं? असं करून आपण मूळ प्रश्नापासून बाजूला जातोय असं मला वाटतं. मुलं जेंव्हा आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचतात तेव्हा एकाकीपणा फक्त ८% वेळेस कारणीभूत ठरू शकतो. तर आईवडिलांचं किंवा शाळेतील इतर मुलांचं त्रास देणं ७% वेळेस कारणीभूत ठरू शकतं. आत्महत्येच्या निर्णय...
आमची आमच्या बाबांपुढे बोलण्याची हिंमत नव्हती. आजही नाही.  बाबांनी सांगितलेलं आम्ही ऐकलं नाही असं कधी झालंच नाही. आम्हाला ते पटलंय का, हा विचार बाबांनी, आईने किंवा आम्ही स्वत:देखील कधीच केला नाही. "अरे बाबा, कितीबोर  करतोस!" वगैरे उद्गार जर आम्ही काढले असते तर, आमची खैर नव्हती. आम्ही त्यांना नेहमीच दचकून असायचो. ते आले कि शांतता. पुस्तक पुढे, मान खाली. एका वयांत त्यांचा रागही यायचा. मग त्यांना त्यांच्या माघारी,' हिटलर, डॉन' वगैरे म्हटलं जायचं. पण वय वाढेल तसतसं राग आणि भीती दोन्हीही कमी झालं. आदर आणि फारसे न बोलण्याची सवय तेवढी राहिली. कडक वागून त्यांनी आणि आम्ही काय कमावलं? आम्ही सुतासारखे सरळ राहिलो.मोठ्यांना, गुरुजनांना आदर द्यायला शिकलो.  कुणाशी वाद न घालता निमुटपणे सहन करायला शिकलो. हे सहन करणं काहीवेळेस खूप फायद्याचं ठरलं. विनातक्रार सगळं स्विकारावं लागतंच न कधीतरी, आम्ही ते शिकलो. लाईनीवर राहिलो. रूढ अर्थाने सगळं मिळवलं आम्ही. पण आत्मविश्वास मिळविताना मात्र खूप झगडावं लागलं. स्वत:च्या मनाप्रमाणे वागताना खूप त्रास होतो आजही.  वाटतं, किती चुकीचं वागले ते आम...
काही दिवसांपूर्वी एक बाबा आले होते. आपल्या २५ वर्षांच्या मुलाची तक्रार घेऊन. त्याने कोर्स अर्धवट सोडला, लग्नाला तयार होत नाही अशा अनेक तक्रारी होत्या. बोलता-बोलता कळलं कि नेमकं काय करायचंय हे त्याला अजून कळतंच नाहीये. बाबा म्हणाले  B.Sc. कर म्हणून त्याने B.Sc  केले. बाबा म्हणाले, 'M.sc ला admission घेऊ म्हणून तेही घेतले.' पण झेपत नाहीये. अभ्यास होत नाहीये. आता बाबा म्हणतात लग्न कर बाकी सगळं मी बघतो. तुला माझ्या ओळखीने नोकरीला चिकटवतो. त्याला नेमकं काय करावं हे कळतंच  नाहीये.असं बरेचदा होतं. दोन सारख्याच पर्यायांमध्ये निवड करायची असेल तर असे होणे नॉर्मल आहे. त्यातही एखाद्या गोष्टीवर पाणी सोडता यायला हवं. परिणाम भोगण्याची तयारी दाखवायला हवी.   आपल्याला नेमकं काय हवंय हेच  कळत नसेल तर मात्र परिस्थिती अवघड आहे. काहीजणांना  आई म्हणेल ते किंवा बाबा म्हणतील तसंच करण्याची सवय असते. इतकी कि, ते लग्न करतानाही आई म्हणेल त्या मुलीशी किंवा बाबा सांगतील त्या मुलीशी/मुलाशी लग्नसुद्धा  करतात.  'आई-बाबांचं ऐकणारी मुलं', म्हणून कौतुक होत असणाऱ्य...
"किती काळी आहेस गं तू? मी बघ कशी गोरी आहे. " एक मुलगी बोलता-बोलता मिहिकाला म्हणाली. मला आठवलं, काही दिवसांपूर्वी मिहिका,"आई मला light स्कीन करायचीये. light स्कीन छान दिसते. " असं म्हणत होती. त्याचा उगम आत्ता कळला. मी ऐकलं म्हणून तिला विचारलं, 'गोरं असल्याने काय होतं?" तर ती छोटी म्हणाली, "माझी आई म्हणते कि मी गोरी आहे नं, म्हणून परीसारखी छान दिसते." "तू पाहिलंयस का गं परीला?" -मी "नाही, पण गोष्टीतली परी नेहमी गोरीच असते नं..." मी विषय बदलला आणि दोघीनाही खेळायला पाठवलं. विच ार सुरू झाले. आपल्याकडे अजूनही एक समज आहे, 'गोरं म्हणजे सुंदर आणि काळे म्हणजे कुरूप.' म्हणून तर, गोष्टीतली, राजकन्या, परी गोऱ्या-गोऱ्या पान असतात. जाहिरातीतली यशस्वी बाईसुद्धा गोरी झाल्यावरच यशस्वी होते. (fair & lovely मधली यामी गौतम नाही का, त्या गोरेपणाशी आत्मविश्वासाला आणि यशाला जोडते?) म्हणजे काळ्या लोकांमध्ये आत्मविश्वास नसतो? त्यांना यश मिळत नाही? यश मिळविण्यासाठी लागणारी मेहनत, हुशारी, चिकाटी हे सगळे गुण गोऱ्या रंगापुढे गौण ठरतात का?...

Over pampering

"माझ्या बाळाला काहीतरी सांगा हो. रोज नवंच काहीतरी हवं  असतं. नाही मिळालं कि त्याचा मूड जातो. तो जेवत नाही. बोलत नाही. आम्हाला फार काळजी वाटते त्याची." आई तिच्या बाळाबद्दल डोळ्यात पाणी आणून सांगत होती. बाळाचं वय १४ वर्षं.  बोलता बोलता कळलं कि, बाळ सगळ्यांचा अत्यंत लाडका होता. हुशार होता. पण एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असायची. लहानपणी तो रडायचा. श्वास रोखून धरायचा. मग पळापळ व्हायची. बाळाला जे हवं ते  मिळायचं. मोठा झाला तसं रडणं कमी झालं. मागण्या मात्र वाढतंच गेल्या. आधी खेळणी, व्हिडीओ गेम्स, मोबाईल आणि बरंच काही.  मिळालं नाही कि अन्नसत्याग्रह, चिडचिड सुरू.  आई अगदी रडकुंडीला आली होती. आता त्याने लेटेस्ट मोबाईल मागितला होता देणं आवाक्याबाहेरचं होतं. नकार देता येत नव्हता कारण बाळाने घर सोडून जाण्याची धमकी दिली होती.  प्रेमाच्या नावाखाली बरेचदा असे लाड होतात. मुलांना नाही म्हणणं आई-वडिलांच्या जिवावर येतं.  'त्याच्या साठीच करतो ना आपण सगळं? मग त्याची इच्छा पूर्ण करायलाच हवी,'  असा विचार असतो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी मेहनत...
मिहिका जेव्हा बाहुलीचा हात तोडते आणि त्या तुटक्या हाताने मला bye-bye करते तेव्हा मला कससंच होतं.  लहान असताना मी खूप भातुकली खेळायचे. माझ्या बाहुल्यांना जपायचे. त्यांचा हात मोडला, डोळा पडला कि मलाच रडू यायचं. मला आता हे बाहुल्यांच्या बाबतीत फारसं होत नाही. पण माणसांच्या बाबतीत मात्र होतं. लहानपणी पण मला मारामारी, अंगाशी येणारी मस्ती, उड्या मारणे फारसं रुचायचं नाही. खूप शांत, सोशिक अशी मुलगी होते.  आजही थोड्या-फार फरकाने मी तशीच आहे. (ह्या आत्मस्तुतीला बऱ्याच जणांची मान्यता मिळेल).   मी शक्यतो, मारणे, भांडणे ह्या गोष्टीच्या विरोधात असते. शक्य तेवढं टाळते.  मिहिकाचं मात्र तसं नाही. ती मुळातच चंचल. आता इथे तर क्षणात दुसरीकडे. वारा वहावा तशी पळत असते. बाहुल्या वगैरेंशी नावालाच खेळते.  त्यांचे हात-पाय तोडते.  ढकलणे, ओढा-ओढी, तिच्या बाबाशी कुस्ती हे तिच्या आवडीचे खेळ. तिला बाहुलीचा हात तुटणे वगैरे गोष्टीनी फारसा फरक पडत नाही.  भांडणं वगैरे मस्त मन लावून करत असते. तिचं आणि शांततेचं वाकडं आहे.  मिहिका आणि मी वेगवेगळ्या स्वभावाच्या  दोन व्यक...
माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा आई-बाबांना असं वाटतं, कि, मुलांनी शहाण्यासारखं वागावं. एका जागेवर स्वस्थ बसावं, रडू नये, हट्ट करू नये, उड्या मारू नयेत, भांडणं, मस्ती, बडबड, जोरात हसणं  तर अजिबातच नको.  वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात, पसारा नको. न सांडता खावं,  न सांडता पाणी प्यावं, कपडे खराब करू नयेत. हे त्यांनी आपणहून करावं किंवा एका सांगण्यात त्यांना समजावं. मला नेहमी प्रश्न पडतो, हे सगळं मुलांच्या बालपणातून वजा केलं तर उरतं तरी काय? वसुधा 
'सगळ्या गोष्टी कशा सरळ, साध्या-सोप्या असायला हव्यात.' हा विचार डोक्यात आला कि, समोर असणाऱ्या अडचणी जास्त प्रमाणात डोळ्यांत येऊ लागतात. लहानपणापासून असा विचार करण्याची सवय जडली, कि, सोप्या नसणाऱ्या गोष्टी सोडून देण्याची मानसिकता तयार होऊ लागते. 'जिद्द, चिकाटी' ह्या शब्दांचा  अर्थ कळतच नाही. 'कशाला करायचे एवढे कष्ट?'' हा प्रश्न जेंव्हा २०-२२ वर्षांची मुलं विचारतात तेव्हा आश्चर्य वाटतं. मुलांची अशी मानसिकता तयार होऊ लागली कि, आई-वडील काळजीत पडतात. आत्ता तर ह्याच्या करीयरची सुरुवात आहे, आता नाही तर कधी मेहनत करणार हा? हा प्रश्न बऱ्याच आई-बाबांच्या डोक्यात घर करून असतो.  जेव्हा मुलांसाठी सगळं सोपं आयुष्य देण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा अशी मानसिकता तयार होण्याची शक्यता  जास्त असते. ह्याची सुरुवात खूप लहानपणापासून होते. मुलाला शाळेत उशीर होऊ नये, म्हणून आई आदल्या दिवशीपासून कामाला लागलेली असते. दप्तर भरणे, आंघोळ घालणे, कपडे घालून देणे, ह्या गोष्टी पटापट उरकत असते. अभ्यासाची वेळ येते, तेव्हा नोट्स तयार ठेवते. मुलाची एक दिवस शाळा बुडली तर वही पूर्ण करणे आईची जबा...
"काहीच कसं येत नाही गं तुला?" मिहिकाने तिसऱ्यांदा बेरीज चुकवली तेंव्हा मी जराशी चिडलेच. मीच ठरवलं होतं जास्तीतजास्त दोनदा समजावल्यावर तिला यायला हवं.  तिचं लक्षच नव्हतं. तिला बाहेरून येणारे  मांजरांचे आवाज जास्त आवडत होते. मांजरी एकमेकीशी काय बोलतायत ह्यांत तिला जास्त इंटरेस्ट होता. माझं काम सोडून मी बसलेय आणि हिचं लक्ष नाही. "तीन वेळेस सांगूनही कळत कसं नाही तुला? काहीच येत नाही." मी वैतागून बोलले. मी वैतागले कि तिला तिच्या बाबाची आठवण येते. ती बाबाकडे गेली. आणि त्याला म्हणाली, "आईला काहीतरी सांग. खोटं बोलतेय. " मी कान देऊन ऐकू लागले. पुढे म्हणाली, " मला खूप गोष्टी करता येतात. चित्र काढता येतं,कागदाचं butterfly बनवता येतं, सायकल चालवता येते, कोशिंबीरसुद्धा करता येते आणि आई म्हणते कि मला काहीच येत नाही. " मी खजील झाले. कित्येकदा, मुलांना काय येत नाही हे पाहण्यात आपण एवढे गुंतलेलो असतो, कि त्यांना काय येतं हे आपण पहातच नाही. सरळ judgment देऊन मोकळे होतो.   असं बरंच काही आपण बोलत असतो. तो त्यांच्या स्वत:बद्दलच्या विचारांचा एक भाग बनतो. आपण मुला...
आपण आई-बाबा झालो कि, आपल्याला असं वाटतं कि आपण फार मोठे झालो. ह्या मोठं होण्याचा आणि maturity चा संबंध असतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यावर नंतर सविस्तर बोलता येईल. आई-बाबा झाल्यावर  आपल्याला असं वाटत असतं, कि, आपण आई-बाबा झालो म्हणजे मुलांना शिकविण्याची, प्रसंगी रागावण्याची authority  आपल्याला मिळालीये. आपण सतत शिकवत असतो, असं नाही तसं कर. हे नाही ते म्हण. अमुक नाही तमुक. असं काही ना काहीतरी.  जेव्हा मुलांना एखादी गोष्ट आत्मसात करणं अवघड जातं. तेव्हा आपण वैतागतो. चिडतो. मिहिका सोबत घालवल्या जाणाऱ्या   वेळेत मीही असंच काहीतरी करत असते. थोडावेळ मात्र माझा आईपणाचा बुरखा बाजूला काढून ठेवते. तेव्हा जाणवतं, तिच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मी तिला जगात कसं वागायचं हे शिकवत असते आणि ती मला कसं जगायचं हे शिकवत असते. आई-बाबा झालो म्हणून शिकविण्याची ऑथॉरिटी घेण्यापेक्षा नवीन काय शिकता येईल, ह्याचा विचार करायला हवा. स्वतःचंच  परिक्षण करत स्वतःला बदलत शिकायला हवं. आपली मुलं जन्मल्यापासून खूप काही शिकलीयेत. आपल्यासाठी त्यांनी स्वत...
'It's always ok'  कुणी चुकलं आणि 'sorry' म्हटलं तर आपण काय करतो? 'it's okay' म्हणतो आणि पुढच्या कामाला लागतो. तोच विचार डोक्यात ठेऊन ओझं सहसा वाढवत नाही. बरेचदा तर sorry नाही म्हटलं तरी, समोरच्याने चुकू नये असं वाटलं तरी माफ करून आपण  सोडून देतो. पुढे चालत राहण्यासाठी 'it's okay' हा मंत्र sorry पेक्षा जास्त महत्त्वाचा ठरतो.   बरेचदा, आपल्याला असं वाटतं, 'आपण  चुकूच नये'. आपल्या अनेक टेन्शन्सच्या मुळाशी हा विचार असतो. हा विचार बरेचदा अपराधीपणाची भावना तयार करतो. आपल्याला अनेक गोष्टींपासून अडवतो.  आपण स्वत:लाच टोचून बोलू लागतो. त्रास देत राहतो. आपण स्वत:ला sorry कधी म्हणतच नाही.   मलाही असंच वाटायचं.  मी माझ्या चुकांचा खूप विचार करायचे. त्या होऊ नयेत म्हणून काटेकोर असायचे. टेंशन मध्ये असायचे. मग  एकदा, मी स्वत:लाच विचारलं, 'का चुकू नये? मी एकटीच काही विशेष शक्ती घेऊन जन्माला आलीये का?' 'नाही असं नक्कीच नाही. सगळे चुकतात तशी मी चुकले तर एवढं काय बिघडणार आहे?'. 'मग महत्त्वाचं काय, कधीच न चुकणे  कि च...
अप्टीटयूड आणि इंटरेस्ट मोठं झाल्यानंतर तुला कोण व्हायचंय ?" हा प्रश्न जवळपास सगळ्याच लहान मुलांना विचारला जातो. आणि सुरुवातीला ' आई किंवा बाबा ' हे उत्तर हळूहळू   डॉक्टर , इंजिनियर , सीए , आणि अशाच काही वेगवेगळ्या उत्तरात बदलत जाते.   काय व्हायचं हे ठरवताना बरेचदा आई-बाबा किंवा घरातल्या मोठ्या माणसांचा सल्ला घेतला जातो. आई वडिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नाव मिळविले असेल तर तेच कार्यक्षेत्र निवडले जाते. म्हणजे , आई-बाबा डॉक्टर असतील तर मुलंही डॉक्टर होतात , किंवा व्हावं   असं आई-बाबांना वाटत असतं. बिझिनेसमन असतील तर मुलाने बिझिनेस सांभाळावा अशी त्यांची इच्छा असते.   करियर म्हणून कोणतं क्षेत्र निवडायचं , ह्यासाठी अशा इच्छा किंवा सल्ले ह्यांचा आधार बरेचदा घेतला जातो.   त्या जोडीला , हुशार मुलांनी (जास्त मार्क्स   पडलेले हुशार ) सायन्स साईड घ्यायची आणि कमी मार्क्सवाल्यांनी कॉमर्स किंवा आर्ट्स ला जायचं असा पायंडाच पडलेला आहे. हे   खरंच योग्य आहे   का ? करियर म्हणजे फक्त नोकरी करून पैसे कमावणे नाही. त्या बरोबर यश , आनंद आणि कामाचं ...
आपल्या भावना इतरांना समजल्या नाहीत तर आपल्याला खूप त्रास होतो. त्या व्यक्तीचा खूप राग येतो. आपल्यांत आणि त्या व्यक्तीमध्ये अंतर पडतं. आपण त्या व्यक्तीला टाळू लागतो. आपल्याबाबतीत कसे गैरसमज करून घेतले हे सांगत राहतो. काहीकाळाने संवाद थांबतो. कित्येकदा, आपण दुसऱ्यांवर काहीतरी टीका करून, त्यांच्याबद्दल judgment देऊन किंवा नाराजी व्यक्त करून मोकळे होतो. समोरचा  माणूस कोणत्या परिस्थितीतून जात असेल हा विचारच डोक्यात येत नाही. माणूस आपल्याला समजत नाही. तोही आपल्यापासून फटकून वागतो. माणूस कोणत्या परिस्थितीतून जात असेल, हा विचार डोक्यात आणला तर मात्र आपल्याला माणूस चांगल्या प्रकारे कळू शकतो. हा विचार करणे म्हणजेच empathy. कुणाशीही मैत्री करण्यासाठी, नातं टिकविण्यासाठी, कामाच्या ठिकाणी खेळीमेळीने राहण्यासाठी empathy  अत्यंत आवश्यक गोष्ट असते.  इंग्रजीत एक वाक्य  आहे, “Always put yourself in others' shoes. If you feel that it hurts you, it probably hurts the other person, too.” दुसऱ्यांच्या बुटात पाय ठेऊन काही काळ चालून बघायला हवं. अगदी शब्दशः जमलं नाही तरी...
"आई ह्या व्यक्तीचा आवाज बंद करणे अजून कुणालाच शक्य झालं नाही," परवा आदित्य बोलून गेला. मला ते अगदी पटलं. आईवर अनेक कवींनी भावुक होऊन कविता रचल्या. मायेची मूर्ती वगैरे वगैरे उपमा दिल्या.  मला मात्र 'आई आणि ओरडणे,' ह्या गोष्टीचा अत्यंत जवळचा संबंध वाटतो.  काल -परवा Whatsapp वर अशा अर्थाची एक कविता आली होती. मनोमन पटली. सकाळी उठवताना पासून ते रात्री झोपेपर्यंत आई फक्त ओरडत असते. "उठ, आवर, पटपट कर, अमुक करू नको, तमुक करू नको, बसू नको नि उठू नको," एक ना हजार सूचना. मला वाटतं, आई झाल्यानंतर ह्या सूचना आपोआप देता येत असाव्यात.  कारण, 'जेंव्हा  तुम्ही आई होता, तेव्हा तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील, अभिनेत्री किंवा कुणीही असलात तरी आधी आई असता'.  आई होतानाच काही गोष्टी आपण स्वत:शी ठरवलेल्या असतात. आपल्या मुलाने/मुलीने कसं असावं, त्याहीपेक्षा आपल्याला त्यांना कसं बनवायचं आहे ह्या गोष्टी आपल्या डोक्यात पक्क्या असतात. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, कि, माझ्या मुलीला tv पाहण्याची सवय लागू नये. त्याला काही सबळ कारणं आहेत, ती गोष्ट वेगळी. त्यामुळे होतं काय कि तिन...
१० वी-१२वी  च्या परिक्षांसोबतच आता सगळ्याच वर्गांच्या परिक्षा  जवळ आल्या आहेत. परिक्षेच्या  काळात मला सगळे आई-बाबा खूप टेन्शनमध्ये दिसतात. मुलांचा syllabus , timetable  तर पाठ असतोच, शिवाय धडे आणि कवितासुद्धा पाठ असतात.  परवा, अशीच एक आई मला विचारत होती, 'मिहीकाचे science चे लेसन्स लर्न झाले का हो?'  मी म्हटलं 'हो, शाळेत teach केलं तेव्हाच तिला लर्न झालं, ' (आमच्या साठी लर्न म्हणजे शिकणे).  'तुम्ही तिला लगेच पेपर काढून देता का?' तिने पुन्हा विचारलं. मला प्रश्न नीटसा कळला नाही. पेपर मी कशाला काढून द्यायला हवा? ती धडा वाचते. त्यांत काय लिहिलंय ते मला सांगते.  त्यांतून तिला नवीन काय समजलंय ते आम्ही पाहतो आणि शिकतो. ह्यांत पेपरचा संबंधच येत नाही.  मी असं सांगितलं तेंव्हा त्या बाईला माझी दया आली. मला म्हणाली, 'अरेरे ! म्हणून मिहिका हुशार असून तिला मार्क्स मिळत नाहीत. मी सांगते, तुम्ही काय करा, टीचर देतात ना, तेवढंच फक्त करून घ्या. ते काही फार नसतं. मुलांना मग भरपूर मार्क्स मिळतात.'   हल्ली, शाळेतून,  जे प्रश्न परिक्षेला ...
एकदा, मिहिका माझ्याशी खोटं बोलली. सगळ्या आईना वाटते तशी काळजी मलाही वाटली. का खोटं बोलली असेल. कोणत्याही गोष्टीसाठी मी टोकाला जात नाही. तिला भीती वाटावी एवढं रागावत नाही. मी स्वत: किंवा तिचा बाबाही,  तिच्याशी आणि एकमेकांशी खोटं बोलत नाहीत. मग हिने खोटं का बोलावं? मग मी तिला नेहमीप्रमाणे गप्पा मारता-मारता सांगितलं, कि, ' खोटं कधीच बोलू नये. आपल्या आई-बाबांशी तर कधीच नाही.  ती वाईट सवय असते, इ.' ह्यांवर पुस्तकांकडे बोट दाखवत तिने विचारलं, 'ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये सगळं खरं-खरं लिहिलंय? सगळी reality आहे?'  घरांतल्या  पुस्तकांमध्ये काही कथासंग्रह, कादंबऱ्याही आहेत. काही तिच्यासाठी आणलेली पुस्तकं आहेत. ज्यात कल्पना रंगविल्या आहेत. reality नाहीये. तिने विचारलेल्या प्रश्नाला खरं उत्तर द्यायचं  म्हणून मी म्हणाले,  'नाही'.  'तरी वाचतेसच ना? मग माझं खोटं वाईट का? मलाही अशा stories बनवायच्या आहेत. पुस्तकं लिहायची आहेत.' नेहमीप्रमाणेच तिने मला निरुत्तर केलं. "तू अशी पुस्तकं लिहिलेली मला आवडेल. पण तू जेव्हा अशा गोष्टी रचतेस तेव्हा मला, 'आई, हि गोष्ट आह...
"I can totally understand your feelings. It's okay  if you want to cry ", माझ्या पुढ्यात tissue पेपर  धरत ती म्हणाली. लंडनमध्ये उतरले त्यादिवशी रात्री मला युनिव्हर्सिटीचं होस्टेल मिळालं नव्हतं . त्यामुळे माझी सोय तिच्याकडे केली होती.  हेलन तिचे नाव. तिच्याकडची रात्र मी जवळपास रडूनच घालवली. खूप प्रवास,  त्यामुळे खूप थकवा.त्यांत मरणाची थंडी.घरातल्यांची आठवण. सगळंच विचित्र. त्यांत माझं इंग्लिश कुणालाच कळत नव्हतं आणि त्यांचं मला. मुळांत माझी मातृभाषा मराठी असल्याने भावनांचा अतिरेक झाला कि मला इंग्रजी सुचत नाही.  त्यामुळे सगळंच अवघड होऊन बसलं होतं.   ''What is bothering you?' माझ्या पुढ्यात चहाचा कप ठेवून तिने विचारलं. माझी ती अवस्था बहुदा तिने ओळखली असावी. माझ्याकडून काहीच उत्तर दिलं गेलं नाही. मला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. मला आईची खूप-खूप आठवण येत होती. मला कधीच न आवडणारे पोहे सुद्धा मला आठवत होते.  तिच्या प्रश्नासरशी डोळ्यांतून सगळ्या नद्या वाहू लागल्या. तसा माझ्यापुढे tissue पेपर धरत ती म्हणाली, 'I can ...