एकदा, एका चार वर्षांच्या चिमुरडीने शाळेच्या drawingच्या परीक्षेत, गुलाबी रंगाचा मोर आणि निळ्या रंगाचा पेंग्विन काढला. आईने चित्र पाहिलं आणि ओरडलीच, 'कितीवेळेस सांगायचं तुला, मोराचा रंग कोणता? अजून रंग कसे कळत नाहीत तुला?' त्या छोट्या मुलीने सांगितलं, 'पण आई मला गुलाबी रंग आवडतो, मोर पण आवडतो म्हणून मी दिला. ' ' अगं मार्क्स जातात न त्यांत', आई म्हणाली.
असंच एका मुलीसमोर, काही crayons, काही ice cream sticks ठेवल्या, थोडा कापूस, रंगीत कागद, कात्री, डिंक आणि लोकरीचे तुकडेही ठेवले. तिला म्हटलं काय हवं ते बनव. मुलगी खुश. तिने पाच-सहा निरनिराळे प्रकार बनवले. जेव्हा ते तिच्या आईला कौतुकाने दाखवले, तेव्हा आई म्हणाली, 'हे सरळ का नाही कापलं? एकाच रंगाचा कागद का वापरलास? stick सुद्धा कलर करायला हवी होतीस.' मुलगी हिरमुसली.
काही आई-बाबा कायम एका छडी वाल्या कडक शिक्षकाच्या भूमिकेत असतात. म्हणून मुलांना ह्यांच्यासमोर बोलण्याचीच भिती वाटते. ह्यांना perfectionist असं म्हणतात. 'माझं सगळं कसं perfect, हे त्यांचं सतत सांगणं असतं. ' म्हणजे त्यांना लहान मुलांनी काढलेल्या चित्रांमध्ये मुलांचं भावविश्व दिसत नाही, तर वेड्या-वाकड्या रेषा डोळ्यात खुपतात. मुलांनी सांगितलेल्या, स्वत: बनवलेल्या गोष्टींमध्ये मुलांनी वापरलेला चुकीचा शब्द तेवढा ऐकू येतो. मुलांच्या हाताने खाण्याच्या प्रयत्न न दिसता, खाली सांडलेली भाताची शिते दिसतात.
चुका शोधायच्याच म्हटलं तर प्रत्येक गोष्टीत सापडतातच. प्रश्न हा आहे कि, मुलांच्या अशा छोट्या-छोट्या गोष्टींबाबत आपण critical होण्याची खरंच गरज आहे का ? मुलं जेव्हा काही चित्र काढतात, वस्तू बनवतात, हाताने काही करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या कृतीमधून आनंद घेत असतात. मोर गुलाबी कि मोरपंखी ह्यापेक्षा त्यांना तो रंगवल्यानंतर मिळणारं समाधान जास्त महत्त्वाचं असतं. सरळ कापलं कि वाकडं ह्यापेक्षा कापता आलं, आपल्याला काहीतरी नवीन सुचलं, हे जास्त महत्त्वाचं असतं. ते perfect आलंच पाहिजे ह्यापेक्षा त्यांना त्यांतून मिळणारा अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. तुमच्या कौतुकातून ती गोष्ट त्यांना परत-परत करावीशी वाटते, नंतर आपोआपच जमू लागते. तुम्ही चुका काढता तेव्हा ती खट्टू होतात, काहीवेळेस प्रयत्नच थांबवतात. नाराज राहू लागतात. काही गोष्टी वयानुसार आपोआप जमणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. मुलांना criticize न करता शिकविता यायला हवं.

Comments
Post a Comment