आपली मुलं हुशार असावीत, त्यांनी काहीतरी वेगळं करावं, स्वत:च्या पायांवर उभं रहावं, यशस्वी व्हावं, असं सर्वच आई-बाबांना वाटतं. आयुष्यात यशस्वी व्हायचं तर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, ह्याबद्दल दुमत नाहीच. पण त्याच्या जोडीला आत्मसन्मान आणि आत्मभान ह्याचीही तेवढीच गरज असते. आत्मविश्वास म्हणजे, स्वत:वर असणारा विश्वास. मी काहीतरी करू शकतो हा विश्वास. आत्मसन्मान म्हणजे स्वत:चा आदर करणे, स्वत:वर प्रेम करणे; स्वत:ला लय भारी समजणे नव्हे. आत्मभान म्हणजे आपल्या गुणांची तसेच अवगुणांची जाणीव असणे, म्हणजे स्वत:ला ओळखणे. स्वत:ची मतं असणे, आवड असणे. आत्मभान आणि आत्मसन्मान असणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असतोच असे नाही. तर आत्मविश्वास असणाऱ्यांमध्ये आत्मसन्मान असेलच असेही नाही. आत्मविश्वास, आत्मभान आणि आत्मसन्मान एकमेकांबरोबर असतील तर एक प्रभावी व्यक्तिमत्व घडणार ह्यात शंका नाही. आपल्या मुलातला आत्मविश्वास जागृत असावा ह्यासाठी प्रयत्न करणारे आई-बाबाही हल्ली जागोजाग दिसतात. निरनिराळी पुस्तके वाचून, निरनिराळ्या गोष्टी शिकवून, स्वत: मधे बदल घडवत मुलांना घडविण्याच्या प्रयत्नात असतात. मुलाचा आत...
Posts
Showing posts from January, 2015