मुलांची मानसिकता मानसिकता किंवा mentality हा शब्द आपण कैक वेळेस वापरतो. मानसिकता म्हणजे विचार करण्याची ठराविक पद्धत. हि प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्याच्यावर आपल्या श्रद्धा-अंधश्रद्धा,मूल्य, अनुभव, शिक्षण, समाज ह्यांचा पगडा असतो. विचार करण्याची हि पद्धत अर्थात attitude आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक असतो. कारण, ह्या पद्धतीवर आपले विचार, भावना आणि वागणं अवलंबून असतं. कोणत्याही दृष्टिकोनाचे हे तीन महत्वाचे घटक असतात. ह्या दृष्टीकोनाच्या आधारावरच आपण परिस्थितीशी लढा देऊ शकतो किंवा जुळवून घेऊ शकतो किंवा पळही काढू शकतो. एकाच घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो, पेला अर्धा सरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, सरला आहे म्हणायचं कि भरला आहे म्हणायचं? ते तुम्हीच ठरवा. दृष्टीकोनावरच आपली प्रगती अवलंबून असते. Our attitude towards life determines life's attitude towards us. जेव्हा लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करायचा असतो तेव्हा मानसिकता तयार होणे आणि विकसित होणे ह्या बाबी अत्यंत महत्वाच्या ठरतात...
Posts
Showing posts from November, 2016