Posts

Showing posts from December, 2018
"आई मला हाताने करायचंय, करू दे नं वं.." चार वर्षांचा मुलगा TV पाहत बसलेला असतो. आई एकेक घास करत त्याच्या तोंडात कोंबते. तिला हवं तेवढं त्याने खाल्लं कि मग म्हणते, "मी भरवल्याशिवाय खातंच नाहीस तू."  सहा वर्षांचा मुलगा शाळेसाठी तयार होत असतो. म्हणजे आई त्याला दात घासून देते, बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घालते. कपडे चढवते, सॉक्स-बूट घालून देते आणि नंतर त्याची bag आपल्या पाठीवर घालून त्याला वर्गापर्यंत पोहोचवते. एका जुनियर केजीतल्या मुलाची वही एकदा पहिली. अगदी व्यवस्थित आडव्या- उभ्या रेषा काढलेल्या होत्या (standing lines- sleeping lines). मी म्हटलं, "हुशार हं मुलगा.." तर आई म्हणाली, "अहो कसंच. बसतंच नाही तो. बसला तरी सरळ रेष येतंच नाही त्याला. वेड्या-वाकड्याच जातात. वही  पूर्ण व्हायला नको का? मीच देते काढून त्याला."  एकदा एक आई सांगत होती, "सात वाजता van येते, मी पावणेसातला उठवते तिला. मग अज्जिबात त्रास देत नाही ती. मग पटपट आवरून होतं दहाव्या मिनिटाला. लवकर उठवलं ना तर सगळं तिलाच करायचं असतं. मग खेळत-खेळत उशीर लागतो. बरेचदा मुलं मोठ...

आई- सुरुवातीचं विश्व आणि विश्वासाची सुरुवात

'जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास' ही माणूस म्हणून घडण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट. अगदी तान्ह्या बाळालाही गरजेची असणारी.   'जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास आकाराला येण्यासाठी  बाळाशी त्याच्या आईचं किंवा आईसारख्या कुणाचं तरी नातं फार महत्त्वाचं असतं. 'प्रेम-विश्वास ' ह्या संकल्पनेची सुरुवात ह्याच नात्याने होते. बाळाच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच बाळाला comfort देणं, त्याच्या रडण्याला response देणं, त्याला मायेने जवळ घेणं आणि त्याला कळत नसलं तरीही, 'भूक लागली शोनाला...आत्ता येते हं पिल्लू' असं काहीतरी बोलणं विश्वास संपादन करण्यासाठी  खूप आवश्यक असतं. हे सगळं सातत्याने पुरवणंही गरजेचं असतं.  सुरुवातीचे सहा आठवडे बाळाला काहीच कळत नाही. पण त्याकाळात आजूबाजूच्या परिसराची ओळख मात्र होत असते. आपल्या प्रत्येक हाकेला  कुणीतरी 'ओ' देतंय हे ह्या काळात बाळाला कळते. अर्थात, हीच आपली आई हे कळायला थोडा अवकाश असतो. साधारण तिसऱ्या महिन्यापासून 'हीच ती बाई हं, जी मला मायेने जवळ घेते हे बाळाला कळू लागतं.' मग हुं..हुं करणे, हसणे ह्या गोष्टींना सु...
आईच्या निरपेक्ष प्रेमातून, सगळं करून पाहण्यातून, स्वावलंबनातून शिकणाऱ्या मुलाचं जग पाचव्या-सहाव्या वर्षापासून विस्तारू लागतं .आता त्यांत शाळा, शाळेतल्या टीचर्स, मित्र-मैत्रिणी ह्यांची तसेच लिहिणे, वाचणे, गणित सोडवणे ह्यांची भर पडते. म्हणजे मुलांना वाचलेलं समजणं, गणितातल्या संकल्पना समजणे ह्या गोष्टी होऊ लागतात. आई-बाबांचं मत, शाळेतल्या शिक्षकांचं मत, मित्र-मैत्रीणीचं आपल्याबद्दलचं मत  ह्यांतून स्वत: बद्दलचं स्वत:चं मत आकाराला येऊ लागतं. ह्या वयांत आपण मुलांना लेबल देऊ लागतो. 'हुशार' किंवा 'खोडकर', 'बडबड्या' अशी अनेक नावे देतो त्याचबरोबर त्यांच्या मनावर 'ते चांगले आहेत किंवा नाही' हेही ठसवतो. जो त्यांच्या स्वत:बद्दलच्या मताचा एक भाग बनतो.  हळूहळू मुलांसाठी 'मित्र' सर्वस्व होतात. आता मित्रांचं appreciation मिळवणंही महत्त्वाचं असतं. आई-बाबा म्हणून आपल्याला हे  स्वीकारणं काहीवेळेस अवघड जातं. आणि काही बंधनं आपण टाकतो. आपल्या बरोबरीची चार मुलं सायकल वर शाळेत जातात पण आपल्याला आपली आई पाठवत नाही, हि गोष्ट आत्ता फक्त जाणवतच नाही तर त्रासही देऊ ...