Posts

Showing posts from August, 2015
प्रत्येक मुल वेगळं असतं. काही वेगळ्या क्षमता घेऊनच जन्माला आलेलं असतं. त्याच्या पहिल्या बसण्याचं, ओळखण्याचं, बोलण्याचं, सगळ्या घराला कौतुक वाटतं.  काही मुलं मात्र बुद्धिमत्तेचा वरदहस्त घेऊनच जन्माला आलेली असतात. हि मुले शारीरिक वयाआधी बौद्धिक वय गाठतात.  अंगात एवढी उर्जा असते कि, हि मुले शांत बसू शकत नाहीत. आपल्या बरोबरीच्या मुलांपासून बरेचदा दुरावली जातात. त्यामुळे स्वत:तच गर्क राहतात. हेकेखोरपणा, चिडणे ह्या गोष्टी वाढीस लागतात. अशा मुलांच्या बुद्धीला सतत खाद्य पुरविण्याची गरज असते. हि मुलं अभ्यासातही पुढे असू शकतात; पण बरेचदा, त्यांची समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने त्यांना लवकरच अभ्यासाचा कंटाळा येतो. शाळेत मार्क्स कमी पडतात. चंचल असणे, स्वत:ची मतं असणे ह्यामुळे बरेचदा, ह्या मुलांना ओरडलं जातं. आणि बुद्धिमत्ता असूनही, हि मुलं समस्या निर्माण करणाऱ्या मुलांच्यात गणली जातात. आपलं मुल अशी निसर्गदत्त बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेलं आहे का, हे ओळखणं गरजेचं आहे ते ह्या मुळेच.  प्रत्येक मूल हे वेगळे असते. मग निसर्गदत्त बुद्धिमत्ता लाभलेली असली त...
"मला माझे आई-बाबा आवडत नाहीत." ती म्हणाली आणि माझ्याच हृदयाचा ठोका चुकला. एव्हाना, हे वाक्य ऐकण्याची सवय व्हायला हवी होती, पण नाही झाली. मुलांकडून जेव्हा हे वाक्य ऐकायला मिळतं तेव्हा खूप वाईट वाटतं. आई-बाबांबद्दल तिरस्कार, राग एवढ्या पुढे गेलेला असतो कि, मुलं आई-बाबांना स्वत:चे शत्रू समजू लागतात. आई-बाबांना ह्याची कल्पना असते. मुलांमध्ये गुंतवणूक असल्यामुळे, मुलांच्या ह्या भावनेचा खूप त्रास त्यांना होतो. आणि मग ह्याला काहीतरी समजवा, असं म्हणत कौन्सेलरकडे धाव घेतली जाते. "आमचं कुठे चुकलं? आम्हाला सांगा." असं म्हणतानाच, मुलांसाठी केलेल्या गोष्टींची उजळणी केली जाते. "जे मागितलं ते सगळं दिलं, त्याच्यासाठी , त्याच्या शाळेसाठी नोकरी सोडली," अशा काही गोष्टी त्यांत असतात. ह्या संदर्भात काही दिवसांपूर्वी एक लेखही लिहिला होता. "मुलांना समजावून घ्या", असा सल्ला पालकांना दिला जातो.   पण, "मुलांना समजावून घ्यायचं म्हणजे काय करायचं? सगळे हट्ट पूर्ण करायचे, म्हणेल तसं वागू द्यायचं कुठेच, कधीच अडवायचं नाही. अशाने कसं होणार? चांगलं-वाईट त्याला कसं...