Posts

Showing posts from 2015

प्रेरणा: यशाची सुरुवात

"माझ्या मुलामध्ये सगळं आहे फक्त motivation नाही.  स्वत:हून काही करणार नाही." आईवडिलांची मुलांबद्दलची अशी तक्रार आता सगळीकडेच ऐकण्यात येते. कोणतीही गोष्ट सुरु करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी आवश्यक  शक्ती  म्हणजेच motivation किंवा प्रेरणा. मुलांच्या बाबतीत अभ्यासाच्या वेळी आळस येणे, अभ्यासासाठी मागे लागावे लागणे, कोणतीही गोष्ट वेळेत न करणे  ह्या गोष्टी जेव्हा जाणवू लागतात तेव्हा त्याला motivation कमी पडतं ह्या निर्णयावर आई-बाबा पोहोचतात. 'मला आतून वाटणारी उर्मी, इच्छा ह्याला कशी वाटत नाही?' हा प्रश्न त्यांना सतावत असतो. ह्यापुढे जाऊन, motivation नाही म्हणून काही चांगल्या सवयी(लवकर उठणे, आवरणे, अभ्यास करणे) लागत नाहीत हि खंत सतावत असते. म्हणूनच मग सतत मुलांच्या मागे लागायला सुरुवात होते. मागे लागण्याचा उलटाच परिणाम दिसू लागतो आणि आई-वडील अधिकच काळजी करू लागतात. मुलं जेव्हा अभ्यास टाळतात, लवकर आवरणे टाळतात किंवा जबाबदारी घेणे टाळतात तेव्हा ह्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या नाहीयेत का? हा प्रश्न विचारून बघा. मुलांच्या अभ्यास टाळण्यामागे अभ्यासाशी संबधित का...
काही लोक  fault finding technology expert असतात, म्हणजे ह्यांना साफ चादरीवरची एकच सुरकुती डोळ्यात खुपते, लहान मुलांनी काढलेल्या चित्रांमध्ये  मुलांचं भावविश्व दिसत नाही, तर वेड्या-वाकड्या रेषा डोळ्यात खुपतात.  होतकरू  गायकाचा प्रयत्न दिसत नाही, त्याचा कुठेतरी एखादा चुकलेला स्वर तेवढा सापडतो. माणूस काय बोलतोय, त्याचा अर्थ समजून घेण्यापेक्षा त्याच्या व्याकरणातल्या चुका दिसतात.  अशी माणसे हुशार असतात, स्वत: शक्यतो चुकत नाहीत. पण चुका काढण्याच्या सवयीमुळे इतरांपासून दुरावतात. कुणीही चुकलेलं ह्यांना चालत नाही. हि माणसे कायम एका छडी वाल्या कडक शिक्षकाच्या भूमिकेत असतात. म्हणून लोकांना ह्यांच्यासमोर बोलण्याचीच  भिती वाटते. ह्यांना perfectionist असं म्हणतात.     असतं.  आई-वडिलांचं वागणं जर अशा प्रकारचं असेल तर मुलांचा आत्मविश्वास तरी कमी होतो, किंवा मुलं लपवाछपवी करू लागतात.  अशा लोकांनी लहानपणी, तरुणपणी खूप भोगलेलं असतं. कौतुक त्यांनाही मिळालेलं नसतं. इतरांसाठी नाही स्वत:साठी. आपल्या जराशा चांगलं (चांगलं म्हणजे खोटं नव्हे)बोलण्...
मुलांचे मार्क्स, बुद्धिमत्ता ह्या बाबत सगळेच आई-वडील चिंतेत असतात. मुलांचा बुद्ध्यंक कसा वाढवायचा? असा प्रश्न बरेच आई-वडील विचारतात. बुद्ध्यंक जास्त असला तर आपलं मूल १०० % यशस्वी होणार, असा त्यांचा विश्वास असतो. प्रत्यक्षात मात्र बुद्ध्यांक चांगला असणारे अनेकजण आयुष्यात मागे पडलेले, हरलेले दिसतात. एवढा हुशार मुलगा हरलेला पाहून सगळेच हळहळतात. बुद्ध्यंक चांगला असूनही अयशस्वी  होण्याचं कारण, भावनांकाकडे केलं जाणारं दुर्लक्ष. मुलांनी ध्येयाने प्रेरित न होणे, छोट्याशा कारणावरून अविचारी पाउल उचलणे, लवकर निराश होणे, डोळ्यात चटकन पाणी येणे किंवा भावनांचा उद्रेक होणे ह्या सगळ्यांच्या मुळाशी अविकसित भावनांक हे कारण असतं आताची वाढती स्पर्धा, त्यात टिकून राहण्याची धडपड ह्यामुळे यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकाबरोबरच भावनांक चांगला असण्याची गरज निर्माण झाली आहे. ती आपण ओळखायला हवी.  त्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत. यशस्वी होण्याचं हे एक सूत्र आहे म्हणा ना ! आपलं यश हे नेहमी समाजाच्या मोजपट्टीने मोजले जाते. आपण समाजात राहतो आणि आपल्या  कितीतरी गोष्टी समाजावर अवलंबून असता...
काही मुलांना सगळ्याच कामांसाठी वेळ लागतो. लिहिताना, वाचताना, संकल्पना समजावून घेताना त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या मानाने जरा जास्त वेळ घेतात. त्यांना नेहमी  'मंद ' असे म्हणून हिणवले जाते. शाळेत अशा मुलांना 'माठ, मठ्ठ, ढ', अशा निरनिराळ्या विशेषणांनी संबोधले जाते. त्यामुळेच, अशा मुलांचा आत्मविश्वास खूप डळमळीत झालेला असतो. हि मुलं  मतीमंद असतात का? शिकूच शकत नाहीत का?  इतर मुलांच्या मानाने कमी गतीने शिकणारी मुलं, आई-वडिलांसाठी काळजीचा विषय ठरतात. खरंतर, हळूहळू का होई ना पण ती शिकत असतात हे महत्त्वाचं.   ह्या मुलांना 'स्लो-लर्नर' असं म्हणतात. ह्यांचा बुद्ध्यांक सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडा कमी असतो पण मतीमंद मुलांपेक्षा जास्त असतो. सर्वसामान्य शाळांमध्ये हि मुलं शिकू शकतात. फरक एवढाच कि त्यांना शिकायला जरा जास्त वेळ लागतो.  एखादी गोष्ट खूप वेळेस वाचावी लागते. खूप वेळेस समजवावी लागते.  त्यांना शिकविण्यासाठी संयमाची गरज असते.  स्लो लर्नर्स अभ्यास टाळतात  कारण इतर मुलांच्या मानाने शिकायला त्यांना वेळ लागतो. रोज नव्या संकल्पना हि मुलं शिकू श...
"खोटं कधी बोलू नये", हि शिकवण लहानपणापासून दिली जाते. तरीही, "पोट दुखतंय, शाळेत जात नाही", "माझा अभ्यास झालाय" किंवा "गृहपाठाची वही विसरलो," असं छोटं-मोठं खोटं सगळीच मुलं बोलतात. हे खोटं बोलण्याचं प्रमाण जेंव्हा मार्कांची अदलाबदल करणे, गृहपाठ दिलाच नाहीये असे सांगणे, निरोप न देणे, चुका लपविणे, न सांगता पैसे घेणं, अशा प्रकारे वाढत जातं तेंव्हा तो एक चिंतेचा विषय बनत जातो. मुलांना खोटं बोलण्याची सवय जडते. आपण नेमकं कुठे कमी पडलो, हे आई-बाबांना कळत नाही. आपल्या मुलाने आपल्याला फसवलं हे दु:ख खूप जास्त वाटतं. बरेचदा, 'खोटं बोलणे', ह्या कारणासाठी अगदी भयंकर शिक्षा केली जाते. त्या शिक्षेमागे आई-वडिलांना खोटेपणामुळे आलेला सात्विक संताप हे कारण असतं.  आम्ही सभ्य आहोत, मग मुलं खोटं का बोलतात ? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना खोटं बोलण्याची कारणं लक्षात घ्यायला हवीत.   खोटं बोलण्याची सवय अगदी लहान वयात जडू लागते. मुलं जसजशी मोठी होतात तसतसे खोटं बोलण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचे सवयीत रुपांतर होते. मग खरं बोलतानाच घाबरल्यासारखे वाटते. काही ...

सजीवं दहते चिंता

आपण सर्वचजण कधी न कधी तरी काळजीत असतो. परीक्षा, अवघड काम, आयुष्यातले महत्त्वाचे  निर्णय ह्या बद्दल सर्वांनाच कधी न कधी काळजी वाटते. आपल्या जवळच्या माणसाचे आरोग्य, पैसे ह्याबाबतही बरेचजण चिंतेत असतात. पण काही जण मात्र असे काही नसले तरीही काळजीत असतात. काळजी करण्यासाठी त्यांना कोणतंही निमित्त पुरतं. आपण उगाच काळजी करतोय, हे त्यांनाही बरेचदा समजत असतं. पण शांत राहणं, relax होणं जमत नाही.  असं काळजी वाटणं अनेक प्रकारचं असू शकतं. एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटणे. एखादी गोष्ट करण्यासाठी हिंमतच न होणे, म्हणजे, नापास होऊ ह्या भीतीने पेपरच न देणे, आजारी पडू ह्या भीतीने अति स्वच्छता करणे किंवा अगदी काहीही दृश्य कारण नसले तरी मागे कधीतरी घडून गेलेल्या गोष्टींसाठी वाईट वाटणे, काळजी वाटणे. ह्या सततच्या काळजीमुळे चिडचिड वाढते, कामात लक्ष लागत नाही, रात्री झोप येत नाही, अनेक शारीरिक आजारही  बळावतात.  ह्या अशा काळजीतून बाहेर पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात, विचार केला जातो, पण काळजी काही पाठ सोडत नाही. 'सजीवं दहते चिंता.. ' ह्या उक्तीप्रमाणे ती आपल्याला जाळतच जाते. ...

buddhimatta: anuvanshik ki vatavaran-nirmit

काही दिवसांपूर्वी, "मुलांमधील बुद्धिमत्ता ओळखा', ह्या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित झाला होता. ह्या लेखाने उपस्थित केलेला एक प्रश्न म्हणजे बुद्धिमत्ता अनुवांशिक असते कि त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होतो? हा प्रश्न जसा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना पडतो तसाच तो संशोधकांनाही पडला आणि कित्येक दशके त्याच्यावरती अभ्यास करण्यात आला.    अभ्यासाचा एक महत्वाचा प्रकार म्हणजे सारखीच अनुवंशिकता असणाऱ्या जुळ्या मुलांचा अभ्यास, ह्या अभ्यासातून पुढे आलेला विचारप्रवाह असे सांगतो कि, जुळ्या मुलांना वेगवेगळ्या वातावरणात वाढवले तरीही त्यांची बौद्धिक क्षमता सारखीच असते. त्यातही जे एकाच बीजातून (monozygotic ) जन्माला आलेले जुळे असतात त्यांच्या  बुद्धीमत्तेमध्ये जास्त साम्य दिसून येते. हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे असले आणि अनुवंशिकतेला आधार देणारे असले तरी दुसरे संशोधनही तेवढेच सतर्क आहे. दुसऱ्या संशोधनामध्ये वातावरण निर्मित घटकांचा बुद्धिमत्तेवर होणारा परिणाम तपासून पाहण्यात आला. ह्या मध्ये असे आढळले कि, जेव्हा जुळी मुले एकाच घरात वाढतात तेव्हा त्यांच्या बौद्धिक क्षमतांमध्ये जास्त साम...
प्रत्येक मुल वेगळं असतं. काही वेगळ्या क्षमता घेऊनच जन्माला आलेलं असतं. त्याच्या पहिल्या बसण्याचं, ओळखण्याचं, बोलण्याचं, सगळ्या घराला कौतुक वाटतं.  काही मुलं मात्र बुद्धिमत्तेचा वरदहस्त घेऊनच जन्माला आलेली असतात. हि मुले शारीरिक वयाआधी बौद्धिक वय गाठतात.  अंगात एवढी उर्जा असते कि, हि मुले शांत बसू शकत नाहीत. आपल्या बरोबरीच्या मुलांपासून बरेचदा दुरावली जातात. त्यामुळे स्वत:तच गर्क राहतात. हेकेखोरपणा, चिडणे ह्या गोष्टी वाढीस लागतात. अशा मुलांच्या बुद्धीला सतत खाद्य पुरविण्याची गरज असते. हि मुलं अभ्यासातही पुढे असू शकतात; पण बरेचदा, त्यांची समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने त्यांना लवकरच अभ्यासाचा कंटाळा येतो. शाळेत मार्क्स कमी पडतात. चंचल असणे, स्वत:ची मतं असणे ह्यामुळे बरेचदा, ह्या मुलांना ओरडलं जातं. आणि बुद्धिमत्ता असूनही, हि मुलं समस्या निर्माण करणाऱ्या मुलांच्यात गणली जातात. आपलं मुल अशी निसर्गदत्त बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेलं आहे का, हे ओळखणं गरजेचं आहे ते ह्या मुळेच.  प्रत्येक मूल हे वेगळे असते. मग निसर्गदत्त बुद्धिमत्ता लाभलेली असली त...
"मला माझे आई-बाबा आवडत नाहीत." ती म्हणाली आणि माझ्याच हृदयाचा ठोका चुकला. एव्हाना, हे वाक्य ऐकण्याची सवय व्हायला हवी होती, पण नाही झाली. मुलांकडून जेव्हा हे वाक्य ऐकायला मिळतं तेव्हा खूप वाईट वाटतं. आई-बाबांबद्दल तिरस्कार, राग एवढ्या पुढे गेलेला असतो कि, मुलं आई-बाबांना स्वत:चे शत्रू समजू लागतात. आई-बाबांना ह्याची कल्पना असते. मुलांमध्ये गुंतवणूक असल्यामुळे, मुलांच्या ह्या भावनेचा खूप त्रास त्यांना होतो. आणि मग ह्याला काहीतरी समजवा, असं म्हणत कौन्सेलरकडे धाव घेतली जाते. "आमचं कुठे चुकलं? आम्हाला सांगा." असं म्हणतानाच, मुलांसाठी केलेल्या गोष्टींची उजळणी केली जाते. "जे मागितलं ते सगळं दिलं, त्याच्यासाठी , त्याच्या शाळेसाठी नोकरी सोडली," अशा काही गोष्टी त्यांत असतात. ह्या संदर्भात काही दिवसांपूर्वी एक लेखही लिहिला होता. "मुलांना समजावून घ्या", असा सल्ला पालकांना दिला जातो.   पण, "मुलांना समजावून घ्यायचं म्हणजे काय करायचं? सगळे हट्ट पूर्ण करायचे, म्हणेल तसं वागू द्यायचं कुठेच, कधीच अडवायचं नाही. अशाने कसं होणार? चांगलं-वाईट त्याला कसं...
अभ्यासात येणाऱ्या अडचणी, वाचता न येणे, वाचलेले सांगता येणे पण, लिहिता न येणे, स्पेलिंग्स लक्षात न राहणे, ह्या सगळ्यांच्या मागे learning disability हे कारण असू शकतं. मागील लेखांमध्ये अशा प्रकारच्या समस्यांचा उल्लेख केला होता. पण, learning disability म्हणजे काय? ह्या बाबत माहिती ह्या लेखात पाहूया.  learning disability म्हणजे शाळेत शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी इतर मुलांप्रमाणे समजून घेता न येणे. समजलेल्या गोष्टी शब्दांत मांडता न येणे. असे का? learning disability असणारी मुलं कमी हुशार असतात का? आळशी असतात का?  हि कधीच शिकू शकणार नाहीत का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. हि मुलं हुशार असतात. आळशी किंवा मूर्ख नसतात. त्यांच्या  मेंदूमध्ये असणारा corpus callosum नावाचा भाग जरासा गोंधळलेला असतो.   corpus callosum हा भाग मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाला जोडणारा असतो. त्याचा गोंधळ उडाल्यामुळे, वाचताना आलेली माहितीवर व्यवस्थित प्रक्रिया होत नाहीत. म्हणूनच आपण काय वाचतो आहोत हे मुलांना समजतच नाही. मग वाचन हि त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक गोष्ट ठरते. ...
अवनीश धावता-धावता पडला आणि अवनिशच्या आजीने ओरडायला सुरुवात केली. "मुलाकडे लक्ष ठेवायला काय होतं? डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला हवी त्याची." अवनीश जरासा खोडकर मुलगा. पडणं, लागणं ह्या गोष्टी त्याच्यासाठी नेहमीच्याच. आजीला मात्र त्याला जरासं लागलं तरी चालत नाही. तो पळायला लागला कि, आजी म्हणते,  "अरे, हळू पळ." उडी मारली कि, "बास, जागेवरच उडी मार." वरती चढला कि, "अरे एकटा वर चढू नकोस."  तुम्ही म्हणाल, "किती प्रेम आहे,आजीचं !"  आजीचं प्रेम आहे, ह्या बाबत शंका नाहीच. पण, पडणं, लागणं हा मुलांसाठी एक अनुभव आहे.  सारखं सांगून मुलं जे शिकत नाहीत ते अशा अनुभवातून शिकतात. अवनीशच्या आजीसारखी आजीच नाही तर कितीतरी आई-वडीलही अशा प्रकारे मुलांना अनुभव घेण्यापासून अडवताना दिसतात. अर्थात, काहीवेळेस मुलांना अडवणे गरजेचे असते. पण, फक्त आपल्या भीतीपोटी मुलांना अडविणे किती योग्य आहे? काही वर्षांपूर्वी, मराठीच्या कुमारभारतीच्या पुस्तकात एक धडा होता, 'वेड लागलेले घर'. मुलं पडू नयेत, लागू नये म्हणून घरच त्यांची काळजी घेतं.  हि काळजीच मुलांसाठी कशी ध...
"आम्ही आमच्या मुलाला सगळं देतो, पण हा त्याचा काहीच उपयोग करून घेत नाही."  जवळपास सगळ्या पालकांची आपल्या मुलांबद्दल हीच तक्रार असते. आई-वडील शिकविण्यासाठी, मदतीसाठी तयार असताना मुलं ती मदत नाकारून एका कोषात जाऊ पाहतात. बाबांनी किंवा आईने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी त्यांचा संयम सुटेपर्यंत देण्याचं टाळतात. ह्याचं कारण काय असावं? कोषात जाणारी हि मुलं इतरवेळी अगदी मजेत दिसतात. त्यांना हवं ते करताना, आई-बाबांशी इतर विषयांवर बोलताना ती दडपणाखाली नसतात. इतर मुलांशी, लोकांशी बोलताना ती कधीच अडखळत नाहीत. घाबरत नाहीत. उलट त्यांचे नातेसंबंध खूप चांगल्याप्रकारे जपलेले असतात. पण काही बाबतीत, उदा. अभ्यास, मौन स्वीकारणं पसंत करतात. जेव्हा अशा मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाणवलं कि,  मनात खूप भावना आहेत पण त्या व्यक्त करता येत नाहीयेत. कारण, आपण भावना व्यक्त केल्या तर काय प्रतिक्रिया येईल ह्याचा त्यांना अंदाज येत नाही. आपलं चुकलं तर? हि भीती बरेचदा मुलांच्या मनात असते. अशा मुलांच्या आई-बाबांशी जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा जाणवलं, कि, त्यांची आई ...
मुलं शाळेत जायला लागतात, तेव्हाच, खरंतर त्याच्याही आधी घरीच त्यांची एक शाळा सुरु झालेली असते. ह्या शाळेत मुलं खूप गोष्टी शिकतात. पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी शिकतात.  स्वावलंबी होणे, वेळ पाळणे, लोकांमध्ये मिसळणे, इतरांच्या भावनांचा आदर करणे, स्वत:च्या हक्कांसाठी भांडणे, तडजोड करणे, ह्या सगळ्या गोष्टी घरच्या  शाळेत शिकविल्या जातात. ह्या शाळेत शिकण्यासाठी मुलांना  प्रोत्साहन देणं आणि स्वत: शिकवणं ह्या शाळेचे शिक्षक म्हणून आई-बाबांची जबाबदारी आहे. आई -बाबा म्हणून  त्यांना भरवणं, आवरून देणं, वेळेत शाळेत पाठवणं, दप्तर भरून देणं, ह्या गोष्टी करता-करता, आपलं ह्या शिक्षकाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना?
अभ्यास म्हटलं कि, वाचन, लेखन, आकलन आणि स्मरण ह्या क्रिया अपरिहार्य ठरतात.  वाचन हा सगळ्या गोष्टींचा पाया. बरेचदा, मुलांना वाचनाचाच कंटाळा येतो. वाचन म्हणजे फक्त अक्षरे आणि शब्द डोळ्यांखालून घालणे  नव्हे, तर त्यांचा अर्थ लावणे. अर्थ लावण्याची क्रिया आपोआप होत असते. म्हणूनच त्या कडे फारसे लक्ष  जात नाही. शब्द पाहण्याबरोबर त्या गोष्टीबद्दल विचार करणंही गरजेचं असतं. हेच विचार कित्येक वेळा भरकटतात आणि वाचलेले लक्षात राहत नाही. काही वेळेस धडा लवकर संपता संपत नाही, आणि कंटाळा येऊ लागतो . वाचन आणि त्यासंबधीचे विचार दोन्ही एकाच वेळी सुरु असतील तर समजावून घेण्याची क्षमता वाढते. ह्यासाठी अभ्यासकांनी काही पद्धती शोधून काढल्या आहेत. ह्यातील काही पद्धती पुढे देत आहे. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी धड्याची ओळख करून घेणे. जेव्हा धड्यामध्ये दिलेल्या गोष्टींची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते, तेव्हा तो धडा लवकर कळतो.  म्हणजे, जर "भारताचे प्राकृतिक विभाग"असा धडा असेल, तर प्राकृतिक म्हणजे काय? हे आधी समजणे गरजेचे आहे. तसेच असे विभाग का करतात हेही समजणे आवश्यक आहे. ह्यानंतर धडा वाचला...
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वानांच शाळेचे वेध लागतात. कंटाळा येईपर्यंत सुट्टीचा उपभोग घेतलेला असतो. आता नवा वर्ग, नवीन पुस्तके, नव्या वह्या आणि अभ्यास. सुरुवातीला तरी बऱ्याच जणांना अभ्यासाचा खूप उत्साह असतो. दहावीला गेलेल्या मुलांचा अभ्यास आधीच सुरु झालेला असला तरी  शाळेचे  नवे वर्ष आता सुरु होते.  ह्या वर्षी पहिल्यापासूनच खूप अभ्यास करायचा असं खूप जणांनी ठरवले असेल.  हा निर्णय शेवटपर्यंत टिकवणं मात्र फार थोड्या जणांना शक्य होतं. काही जणांना अभ्यासाचा लवकरच कंटाळा येऊ लागतो तर काही जणांना इतर आकर्षणं खुणावत असतात. मग जाऊ दे नं, परीक्षा अजून लांब आहे असं म्हणत आपण कंटाळा करतो आणि बघता-बघता परीक्षेच्या जवळ जाऊन ठेपतो. मग घाई-घाईत अभ्यास, जेवणाकडे दुर्लक्ष, टेन्शन, परीक्षा संपली कि पुन्हा आराम असं चक्र सुरु होतं. अभ्यास करायचा म्हणजे नवीन काहीतरी शिकायचं. आपल्या वागण्यातून ते व्यक्त करायचं. मग स्वयंपाक करायचा म्हटलं तरी अभ्यास लागतो आणि क्रिकेट खेळायचं असलं तरीही. थोडक्यात, आपल्याला आयुष्यात काहीही करायचं असलं तरीही अभ्यास करावाच लागतो. पहिल्या पासू...
दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांचे निकाल आता जाहीर झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन सर्वत्र केले जात आहे. काही जण मात्र कमी मार्क्स मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे नाराज असतील. मार्क्स कमी पडले म्हणजे आपल्या मेहनतीला पाहिजे तसं फळ मिळालं नाही असं वाटत असेल.  बऱ्याच मुलांना आपल्या इच्छेनुसार हव्या त्या कोर्सला admission  घेता येणार नाही ह्याचंही दु:ख होत असेल आणि म्हणूनच  आता कशातच रस नाही असंही वाटत असेल. खरं तर, आपल्या मनासारखं  यश मिळालं नाही म्हणून वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे.   पण, मनासारखं झालं नाही म्हणून  पुढे कधी यश मिळणारच नाही असं तर नाही ना? दहावी-बारावी म्हणजे उच्च शिक्षणाचा पाया हे जरी खरं  असलं तरी दहावी-बारावीत मनासारखं यश मिळालं म्हणजे करियरची दिशा मिळाली किंवा खूप काही मिळालं असं होतं का? आयुष्यात हरलेले लोक कधीच जिंकत नाहीत का? किंवा जिंकणारे कधी हरलेच नाहीत का?  जगातल्या सगळ्याच यशस्वी लोकांच्या आयुष्याकडे नजर टाकली तर लक्षात येईल कि, सर्वजण कधी न कधीतरी अपयशी ठरले आहेत. नापास झाले आहेत....

tumhala kon vhaychay???

"मोठं झाल्यानंतर तुला कोण व्हायचंय?" हा प्रश्न जवळपास सगळ्याच लहान मुलांना विचारला जातो. आणि सुरुवातीला 'आई किंवा बाबा' हे उत्तर हळूहळू  डॉक्टर, इंजिनियर, सीए, आणि अशाच काही वेगवेगळ्या उत्तरात बदलत जाते.  काय व्हायचं हे ठरवताना बरेचदा आई-बाबा किंवा घरातल्या मोठ्या माणसांचा सल्ला घेतला जातो. आई वडिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नाव मिळविले असेल तर तेच कार्यक्षेत्र निवडले जाते. म्हणजे, आई-बाबा डॉक्टर असतील तर मुलंही डॉक्टर होतात, किंवा व्हावं  असं आई-बाबांना वाटत असतं. बिझिनेसमन असतील तर मुलाने बिझिनेस सांभाळावा अशी त्यांची इच्छा असते.  करियर म्हणून कोणतं क्षेत्र निवडायचं, ह्यासाठी अशा इच्छा किंवा सल्ले ह्यांचा आधार बरेचदा घेतला जातो.  त्या जोडीला, हुशार मुलांनी (जास्त मार्क्स  पडलेले हुशार ) सायन्स साईड घ्यायची आणि कमी मार्क्सवाल्यांनी आर्ट्स ला जायचं असा पायंडाच पडलेला आहे. हे  खरंच योग्य आहे  का? करियर म्हणजे फक्त नोकरी करून पैसे कमावणे नाही. त्या बरोबर यश, आनंद आणि कामाचं समाधान ह्या गोष्टीही अभिप्रेत आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्रात क...
तणावावर विजय मिळविण्यासाठी… परीक्षा जवळ आली कि, ताण, नैराश्य, काळजी  असे शब्द सर्रास कानावर पडतात.  ताणाला सामोरे कसे जायचे? वेगवेगळ्या प्रकारच्या ताणांचे व्यवस्थापन कसे करायचे ह्या बद्दल भरपूर प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे. लोक आपला ताण टाळण्यापेक्षा त्याचं व्यवस्थापन करू लागले आहेत.  meditation, शारीरिक व्यायाम, कामाची आखणी, वेळेचं गणित जुळवू लागले आहेत. ह्या प्रयत्नांमुळे ताण स्विकारण्यास आणि व्यवस्थित हाताळण्यात काहीप्रमाणात यश असले तरी मुळापासून आपण बाहेर पडलो आहोत का?  मुळात आपल्याला ताण का जाणवतो, ह्याचा आधी विचार करू या. कोणत्याही  घटनेने आपल्या शरीराकडून किंवा मनाकडून केलेल्या मागणीला शरीराने किंवा मनाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ताण. मग हा ताण कोणत्याही छोट्या-छोट्या गोष्टींमधून जाणवू शकतो. आईला सोडून दोन तास शाळेत बसायचंय इथपासून ते दोन दिवसांत बॉसने दिलेले काम पूर्ण करायचंय इथपर्यंत कोणत्याही गोष्टीचा ताण येऊ शकतो. येतो. अगदी बँकेत जाणे, वीजबिल भरणे, घरकाम करणे ह्या गोष्टीही तणाव निर्माण करणाऱ्या ठरू शकतात.  रोज असंख्य प्रकार...

visayacha thikan

स सा आणि कासव ह्याची एकदा पैज लागली. नेहमी प्रमाणेच ससा दिसेल त्यात रमला आणि कासव मात्र कुठेही न थांबता चालत राहीलं. कासव जिंकलं. ससा हरला. एके दिवशी ससा कासवाला म्हणाला आपल्या शर्यतीच्या रस्त्यावरची नदी किती सुंदर आहे पाहिलीस? आणि त्या हिरवळीवरून पळताना किती मजा येते. कासवाला काहीच आठवेना कारण त्याने नदी पाहिली नव्हती आणि हिरवळही पाहिली नव्हती. शर्यतीत जिंकूनही त्याने खूप काही गमावलं होतं.  हल्ली, बरेचजणांचं असंच होतं.  वेळच मिळत नाही काय करू? अशी तक्रार करणारे खूप लोक हल्ली पाहायला मिळतात. वेळ मिळाला तर असे करेन, तसे करेन असे मनसुबेहि रचले जातात. प्रत्यक्षात वेळ मिळाल्यानंतर मात्र हि मंडळी ते सर्व सपशेल विसरतात. आणि आपल्या मागे आपल्या कामाचे काय होणार ह्या विवंचनेत वेळ काढतात. फोन, इंटरनेट ह्या माध्यमातून कामाच्या सतत संपर्कात राहतात. सुटी म्हणजे अशा लोकांसाठी सक्तीची शिक्षा ठरते .तणावामध्ये च जगण्याची सवय लागते . सतत काम, सतत स्पर्धा ह्यात जगायचंच राहून  जातं. शर्यतीत ते जिंकतात पण ध्येयापर्यंतच्या प्रवासातला आनंद गमावतात.  तुम्ही म्हणाल,...
मुलांना कसं वाढवायचं ? कसं शिकवायचं ? काय शिकवायचं ? ह्याबाबतीत अगदी सहज मार्गदर्शन उपलब्ध आहे. हल्ली नुकत्याच आई झालेल्या किंवा लवकरच आई होणार असणाऱ्या मुलीही ह्या बाबतीत विचार करतात. मुलाला काही कमी पडू नये , आणि मुलंही कुठे कमी पडू नयेत म्हणून तत्पर असतात. पुस्तकांत किंवा लेखांमध्ये दिलेली आदर्श  पालक होण्यासाठीची तत्वे पाळण्याचा पूर्ण  प्रयत्न  होतो. तरीही ,   आपल्याला हवं तसं   ' आदर्श '   आपल्याला वागता येत नाही , अशी बोचणी मनाला लागून राहते.    ' मुलांना स्वत:च्या गोष्टी करू द्याव्या ,' असं मानसशास्त्र सांगते पण किती प्रमाणात हे सांगत नाही. मुलांशी प्रेमाने वागा असंही सांगते पण तरीही चिडचिड होते , हात उचलला जातो. मुलांना निर्णय घेऊ द्या असं सांगितलं जातं , पण नाही म्हटलं  तरी सूचना दिल्या जातातच.  मार्गदर्शक तत्वे अमलात आणणे फार कठीण जातं. आणि आई बाबांना आपण आदर्श  होऊ शकत नाही ह्याचं बरेचदा वाईट वाटतं.   काही पालक जाणीवपूर्वक स्वत:च्या वागण्यात बदल करण्याचा प्रयत्न करतात. पण पूर्णपणे स्वत:ला बदलता येत नाही ह्...
मुल रडायला लागलं कि, आई, बाबा, आजी, आजोबा आणि घरात असतील तेवढे सगळे त्याला शांत करण्याच्या मागे लागतात. त्याचं मन दुसरीकडे रमवणं, त्याला हवी ती गोष्ट आणून देणं असे अनेक प्रयत्न केले जातात. जरा  मोठी म्हणजे भाषा कळू शकणारी मुलं रडू लागली कि त्यांना रागावलं जातं. "आवाज बंद, रडायचं नाही", अशा शब्दात त्यांना गप्प केलं जातं.  मुलांनी रडणं हि गोष्ट बरेचदा आई-बाबांना कमीपणाची वाटते किंवा त्यांच्या रडण्याचा आई-बाबांना त्रास होत असतो. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोळ्यात पाणी येणं फारच मनावर घेतलं जातं. एकंदरीतच मूल रडू नये म्हणून सर्वपरीने प्रयत्न केले जातात. मुलांचं किंवा मोठ्यांचं रडणं खरंच वाईट असतं का? शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर रडणं हे येणारा ताण कमी करण्यासाठी मदत करणारं ठरतं. म्हणूनच, वाईट वाटून घेण्यासारखं रडण्यामध्ये काहीच नाही. उलट, रडणं म्हणजे मोकळं होणं, दु:ख दूर होणं.  लहान मुलांच्या रडण्याची निरनिराळी कारणे असू शकतात. अगदी तान्ही बाळं जेव्हा रडतात तेव्हा ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. भूक लागलीये, दुखतंय, टोचतंय  किंवा असंच काहीतर...
मुलांना वाचनाची सवय कशी लावायची? हे आपण मागील लेखात पहिले. वाचन, लेखन, स्मरण, आकलन ह्या सर्वच गोष्टींसाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे मन एकाग्र करता येणे. लक्ष देऊन केलेली कोणतीही गोष्ट उत्तमरित्या  कळते आणि लक्षातही राहते. ती गोष्ट सातत्याने करणे हेही अभ्यासासाठी आणि खेळासाठीही आवश्यक असते.  बरेचदा मुलांना मन एकाग्र करताना अडचणी येतात. अभ्यासाला बसल्यानंतर बाहेर खेळायला जावेसे वाटते, दुसरेच काहीतरी आठवते.  सतत चुळबुळ सुरु असते, हात-पाय हलत असतात.  वर्गात एका जागेवर बसायला अवघड जाते, शिकवताना थोड्याच वेळात लक्ष विचलित होते, छोट्या-छोट्या गोष्टी, शाळेचा अभ्यास विसरतो, शब्द लिहिताना काना-मात्रा विसरून राहते, गणितामध्ये हमखास कोणत्यातरी आकड्यापुढे  शून्य विसरतो. ह्या सगळ्या  गोष्टी घडतात त्या मन एकाग्र न करता येण्यामुळे. हि मुलं  खूप impulsive  असू शकतात. बरेचदा, अतिचंचल आणि impulsive  असल्यामुळे भांडणं, मारामाऱ्या  ह्या गोष्टीही ठरलेल्या असतात.  अशी चुळबुळ  करणारी मुले ही  आई-बाबांसाठी आणि शिक्...

आत्मविश्वास

Image
आत्मविश्वास (confidence) ही मनाची एक अवस्था आहे. काही कारणाने आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो तसा परत मिळविता सुद्धा येतो. आपला आत्मविश्वास जर डळमळीत झाला असेल तर c onfidence building    साठी प्रयत्न करायला हवेत. आत्मविश्वासासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे आत्मभान. स्वत:ची ओळख असणं म्हणजे आत्मभान. मी कसा/कशी आहे, माझ्यातले गुण कोणते, मला काय करायचं आहे, ह्याचं  भान असणं म्हणजे आत्मभान असणं. बरेचदा स्वत:च्या गुणदोषाचा विचार करताना आपले दोषच आपल्याला दिसू लागतात. दोष दिसू लागल्यानंतर तीन  प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. १. ते दोष आपल्यात आहेत हेच आपण नाकारतो किंवा २. आपल्या दोषांचीच उजळणी करतो. ह्या दोन्ही प्रतिक्रिया आत्मविश्वास डळमळीत करण्याचे काम करतात. तिसरी प्रतिक्रिया असते ते दोष स्वीकारणारी आणि त्या बरोबर स्वत:चे गुणही ओळखणारी. गुणांची उजळणी करत आपण कुणीतरी आहोत असा विश्वास जागृत ठेवणारी. जी माणसं, गुणदोषांची अशी सरमिसळ सहजपणे स्वीकारतात, ते आत्मविश्वासाच्या दिशेने पावलं टाकू लागतात. फक्त  स्वत:ला असं ओळखणं म्हणजे आत्मविश्वास नाही, आ...