Posts

Showing posts from April, 2016

प्रेमाचा ओवरडोस

मुलाला शिकविण्यासाठी त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं गरजेचं असतं.  पण बरेचदा ह्या प्रेमाचा, मुलाबद्दलच्या काळजीचा अतिरेक होऊ लागतो. आपल्या मुलाला हवं ते सगळं देणे, त्याच्यापुढच्या अडचणी दूर करणे, त्याला हर तऱ्हेने जपणे, ह्या गोष्टी हल्ली बरेच पालक करताना दिसतात. मुलगा कुठे जातो, काय करतो ह्यावर त्यांची बारीक नजर असते. मुलांच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न असतो. मुलाचे शाळेत भांडण झाले कि आई-वडील ते मिटविण्यासाठी पुढे सरसावतात.  मुलाची वही अपूर्ण असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आई-वडील घेतात, शाळेत त्याला कुणी ओरडलं कि त्याचं रक्षण करायला आई-वडील तयार असतात. आपल्या मुलाला सर्वोत्तम सगळं द्यायचं ह्या विचाराने त्यांना पछाडलेलं असतं.  कित्येकदा तर आई-वडील मुलाचा resume सुद्धा बनवून देतात.  मुलांच्या यशापयशाची जबाबदारी आई-वडिलांनीच घेतलेली असते. ह्यामागे मुलावरती असणारं प्रेम एवढाच उद्देश असतो.  'माझ्या मुलाचं कसं होणार?' हि काळजी त्यांना सतावत असते. त्यावर उत्तर म्हणून मुलाच्या सतत मागे राहणे हा पर्याय त्यांनी निवडलेला असतो. त्यांच्या प्रेमाचा ओ...

करियर निवडताना

"ह्या एवढ्या मोठ्या जगात माझ्या मुलाचं कसं होणार? माझा मुलगा स्पर्धेत टिकू शकेल का?" सगळ्या आईबाबांना ह्याच गोष्टीची काळजी वाटत असते. ह्या काळजीवर आपापल्या परिने उपाय शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. १०वी  आणि १२वी नंतर तर हा प्रश्न अधिकच सतावू लागतो. करियर निवडताना शक्यतो, कोणत्या क्षेत्रात जास्त नोकरीच्या संधी आहेत हे पाहूनते क्षेत्र निवडण्याकडे आई-बाबा आणि मुलांचा कल असतो. त्यातूनही, एखादी शाखा किंवा एखादे क्षेत्र वाईटच  असा ग्रहही  करून घेतलेला असतो.  त्यामुळे आपले व्यक्तिमत्व, आपली आवड ह्या गोष्टी विचारांत घेतल्याच जात नाहीत.  हल्ली इंजिनियरिंग, मेडीकल, architecture आणि इतर बऱ्याच क्षेत्रांसाठी aptitude tests घेतल्या जातात.  पण ह्या tests चा निकाल काहीही लागो, आम्ही ठरवलं तेच आम्ही करणार अशी काहीशी हटवादी भूमिका घेतली जाते. आणि इच्छा नसताना, विषय समजत नसताना, घासून-घासून करीयरच्या मागे लागलं जातं.  करीयरच्या मागे पळणं त्रासदायक वाटू लागतं ते ह्या मुळेच.  करियर निवडताना विचारात  घ्याव्या लागणाऱ्या काही गोष्टी म्हणजे तुमचं व्यक्...