काही दिवसांपूर्वी एक बाबा आले होते. आपल्या २५ वर्षांच्या मुलाची तक्रार घेऊन. त्याने कोर्स अर्धवट सोडला, लग्नाला तयार होत नाही अशा अनेक तक्रारी होत्या. बोलता-बोलता कळलं कि नेमकं काय करायचंय हे त्याला अजून कळतंच नाहीये. बाबा म्हणाले B.Sc. कर म्हणून त्याने B.Sc केले. बाबा म्हणाले, 'M.sc ला admission घेऊ म्हणून तेही घेतले.' पण झेपत नाहीये. अभ्यास होत नाहीये. आता बाबा म्हणतात लग्न कर बाकी सगळं मी बघतो. तुला माझ्या ओळखीने नोकरीला चिकटवतो. त्याला नेमकं काय करावं हे कळतंच नाहीये.असं बरेचदा होतं. दोन सारख्याच पर्यायांमध्ये निवड करायची असेल तर असे होणे नॉर्मल आहे. त्यातही एखाद्या गोष्टीवर पाणी सोडता यायला हवं. परिणाम भोगण्याची तयारी दाखवायला हवी. आपल्याला नेमकं काय हवंय हेच कळत नसेल तर मात्र परिस्थिती अवघड आहे. काहीजणांना आई म्हणेल ते किंवा बाबा म्हणतील तसंच करण्याची सवय असते. इतकी कि, ते लग्न करतानाही आई म्हणेल त्या मुलीशी किंवा बाबा सांगतील त्या मुलीशी/मुलाशी लग्नसुद्धा करतात. 'आई-बाबांचं ऐकणारी मुलं', म्हणून कौतुक होत असणाऱ्य...
Posts
Showing posts from May, 2017
- Get link
- X
- Other Apps
"किती काळी आहेस गं तू? मी बघ कशी गोरी आहे. " एक मुलगी बोलता-बोलता मिहिकाला म्हणाली. मला आठवलं, काही दिवसांपूर्वी मिहिका,"आई मला light स्कीन करायचीये. light स्कीन छान दिसते. " असं म्हणत होती. त्याचा उगम आत्ता कळला. मी ऐकलं म्हणून तिला विचारलं, 'गोरं असल्याने काय होतं?" तर ती छोटी म्हणाली, "माझी आई म्हणते कि मी गोरी आहे नं, म्हणून परीसारखी छान दिसते." "तू पाहिलंयस का गं परीला?" -मी "नाही, पण गोष्टीतली परी नेहमी गोरीच असते नं..." मी विषय बदलला आणि दोघीनाही खेळायला पाठवलं. विच ार सुरू झाले. आपल्याकडे अजूनही एक समज आहे, 'गोरं म्हणजे सुंदर आणि काळे म्हणजे कुरूप.' म्हणून तर, गोष्टीतली, राजकन्या, परी गोऱ्या-गोऱ्या पान असतात. जाहिरातीतली यशस्वी बाईसुद्धा गोरी झाल्यावरच यशस्वी होते. (fair & lovely मधली यामी गौतम नाही का, त्या गोरेपणाशी आत्मविश्वासाला आणि यशाला जोडते?) म्हणजे काळ्या लोकांमध्ये आत्मविश्वास नसतो? त्यांना यश मिळत नाही? यश मिळविण्यासाठी लागणारी मेहनत, हुशारी, चिकाटी हे सगळे गुण गोऱ्या रंगापुढे गौण ठरतात का?...
Over pampering
- Get link
- X
- Other Apps
"माझ्या बाळाला काहीतरी सांगा हो. रोज नवंच काहीतरी हवं असतं. नाही मिळालं कि त्याचा मूड जातो. तो जेवत नाही. बोलत नाही. आम्हाला फार काळजी वाटते त्याची." आई तिच्या बाळाबद्दल डोळ्यात पाणी आणून सांगत होती. बाळाचं वय १४ वर्षं. बोलता बोलता कळलं कि, बाळ सगळ्यांचा अत्यंत लाडका होता. हुशार होता. पण एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असायची. लहानपणी तो रडायचा. श्वास रोखून धरायचा. मग पळापळ व्हायची. बाळाला जे हवं ते मिळायचं. मोठा झाला तसं रडणं कमी झालं. मागण्या मात्र वाढतंच गेल्या. आधी खेळणी, व्हिडीओ गेम्स, मोबाईल आणि बरंच काही. मिळालं नाही कि अन्नसत्याग्रह, चिडचिड सुरू. आई अगदी रडकुंडीला आली होती. आता त्याने लेटेस्ट मोबाईल मागितला होता देणं आवाक्याबाहेरचं होतं. नकार देता येत नव्हता कारण बाळाने घर सोडून जाण्याची धमकी दिली होती. प्रेमाच्या नावाखाली बरेचदा असे लाड होतात. मुलांना नाही म्हणणं आई-वडिलांच्या जिवावर येतं. 'त्याच्या साठीच करतो ना आपण सगळं? मग त्याची इच्छा पूर्ण करायलाच हवी,' असा विचार असतो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी मेहनत...
- Get link
- X
- Other Apps
मिहिका जेव्हा बाहुलीचा हात तोडते आणि त्या तुटक्या हाताने मला bye-bye करते तेव्हा मला कससंच होतं. लहान असताना मी खूप भातुकली खेळायचे. माझ्या बाहुल्यांना जपायचे. त्यांचा हात मोडला, डोळा पडला कि मलाच रडू यायचं. मला आता हे बाहुल्यांच्या बाबतीत फारसं होत नाही. पण माणसांच्या बाबतीत मात्र होतं. लहानपणी पण मला मारामारी, अंगाशी येणारी मस्ती, उड्या मारणे फारसं रुचायचं नाही. खूप शांत, सोशिक अशी मुलगी होते. आजही थोड्या-फार फरकाने मी तशीच आहे. (ह्या आत्मस्तुतीला बऱ्याच जणांची मान्यता मिळेल). मी शक्यतो, मारणे, भांडणे ह्या गोष्टीच्या विरोधात असते. शक्य तेवढं टाळते. मिहिकाचं मात्र तसं नाही. ती मुळातच चंचल. आता इथे तर क्षणात दुसरीकडे. वारा वहावा तशी पळत असते. बाहुल्या वगैरेंशी नावालाच खेळते. त्यांचे हात-पाय तोडते. ढकलणे, ओढा-ओढी, तिच्या बाबाशी कुस्ती हे तिच्या आवडीचे खेळ. तिला बाहुलीचा हात तुटणे वगैरे गोष्टीनी फारसा फरक पडत नाही. भांडणं वगैरे मस्त मन लावून करत असते. तिचं आणि शांततेचं वाकडं आहे. मिहिका आणि मी वेगवेगळ्या स्वभावाच्या दोन व्यक...
- Get link
- X
- Other Apps
माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा आई-बाबांना असं वाटतं, कि, मुलांनी शहाण्यासारखं वागावं. एका जागेवर स्वस्थ बसावं, रडू नये, हट्ट करू नये, उड्या मारू नयेत, भांडणं, मस्ती, बडबड, जोरात हसणं तर अजिबातच नको. वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात, पसारा नको. न सांडता खावं, न सांडता पाणी प्यावं, कपडे खराब करू नयेत. हे त्यांनी आपणहून करावं किंवा एका सांगण्यात त्यांना समजावं. मला नेहमी प्रश्न पडतो, हे सगळं मुलांच्या बालपणातून वजा केलं तर उरतं तरी काय? वसुधा