शिक्षण, शाळा तिथला गलथान कारभार, शिक्षणाच्या नावाखाली होणारी पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक हा आमच्यासारख्या (साधारण ३०-४५ वयोगटातल्या) पालकांचा जिव्हाळ्याचा विषय. कुठेही ह्या वयोगटातल्या चार बायका जमल्या कि, शाळेचा त्रास आणि शिक्षकांची निंदा ह्या विषयांवर गप्पा रंगतातच. ह्या गप्पांसाठी तुमची आणि दुसऱ्या बाईची फार ओळख असावी लागतेच असे नाही. मी तर हल्ली अनोळखी बायकांशी संवाद साधायला सुरुवात करण्यासाठी हाच विषय निवडते. ह्यांतून शाळेत चुकीचं कसं शिकवलं जातं, प्रोजेक्ट्स आई-वडिलांना कसे तापदायक आहेत, मुलांना काहीच कसं येत नाही वगैरे गोष्टींवर बऱ्यापैकी प्रकाश पडतो. माझ्या कार्यक्षेत्रामुळे माझा पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी नेहमी संवाद होतो. ह्या सगळ्या गोष्टींतून मला हल्लीच्या मुलांबाबत काही गोष्टी जाणवल्या, त्या अशा- १) बहुसंख्य मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी कसलीही (शारीरिक अथवा बौद्धिक) मेहनत घेणे नको असते. म्हणजे, मुलाला football खेळायला आवडत असते. तो खूप चांगला खेळत असतो. जेंव्हा त्यांना काही कारणाने त्यांना त्यामध्ये अडचणी येऊ लागतात तेंव्हा त्या अडचणींवर मार्ग शोध...
Posts
Showing posts from January, 2019
- Get link
- X
- Other Apps
"मला खूप भीती वाटते. पण बोलले तर लोक हसतील म्हणून मी बोलतच नाही." "मला खूप राग येतो, पण कंट्रोल करते. " "मला रडावसं वाटतंय, पण त्यामुळे मी किती दुबळा आहे, असं वाटेल." असं अनेकवेळेस होतं. आपल्याला काय वाटतं हे कळत असतं. पण व्यक्त होता येत नाही. कधी लोक काय म्हणतील ह्याची भीती असते, तर कधी स्वत:च्याच व्यक्तिमत्वाबद्दल असणाऱ्या स्वत:च्याच कल्पना आड येतात. आपण साठवत राहतो, वरचेवर. मग कुठेही जाताना हि मोठी अदृश्य bag मनावर अडकवतो आणि चालत राहतो. bag जड होऊ लागते हळूहळू. मग मन थकायला लागतं. bagमधला पसारा सांडू लागतो. आपल्या सगळ्या गोष्टींवर परिणाम करायला लागतो. कपाट उघडल्यावर कपडे पडावेत ना पायाशी, तसा पडू लागतो. त्या ब्यागेत आता जागा करायला हवी असते. "मला समजून घेणारं कुणी आहे का?" असा प्रश्न पडतो. ह्यावेळी आपल्या सगळ्यांनाच कुणीतरी ऐकणारं, आपल्या मताशी सहमत नसलं तरी 'असं वाटू शकतं', हे समजणारं कुणीतरी हवं असतं.जगासमोर घातलेला मुखवटा इथे काढला तरी चालतो. आपल्याला स्वीकारणारं कुणीतरी हवं असतं. आपल्यातल्याच काही चांगल्या गोष्टी ...
आई-बाबांना कौन्सेलिंगची (parent's counseling)गरज असते का?
- Get link
- X
- Other Apps
बरेचदा, असं लक्षात येतं कि मुलांना वाढवताना आपलीच दमछाक होते. आपण थकतो, चिडतो. आपल्या कल्पनेतल्या आई-बाबांसारखे आपण नसतो. आणि मग अजूनच चिडचिड होऊ लागते. अशावेळी parent's counseling करून घ्यायला हरकत नाही. आई-बाबा होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आपल्या मुलाला कसं वाढवायचं आहे, हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याचा बरेचदा, अत्यंत ढोबळ पद्धतीने केला जातो. माझ्या मुलाला/मुलीला सगळंच यायला हवं असा अट्टहास मग पुढे दिसू लागतो. मुलं दोन वर्षांची होईपर्यंत ती खूप गोड वाटतात. एकदा का अभ्यास, शाळा, त्यांची स्वत:ची मते आकाराला येऊ लागली कि, मग रागावणे, रडणे, तक्रारी, तुलना ह्या गोष्टी सुरु होतात. मुलांशी आपलं नातं ताणलं जातं. मुलांनी ऐकलं नाही तर कसं वागायचं. अभ्यासाची गोडी कशी लावायची, मुलाला अभ्यास आवडलाच नाही तर काय करायचं, सवयी कशा मोडायच्या आणि कशा लावायच्या हा विचार आपण फारसा कधी करतच नाही. मग जेव्हा काही कारणाने मुलं आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत, तेव्हा आधी आपणच सैरभैर होतो. आपलं मूल असं वागूच कसं शकतं हा विचार त्रास देऊ लागतो. आपण सगळं frustration मुलांवर काढतो...