Posts

Showing posts from October, 2018
सीन-१. (तरुणी (वय- २५-२७ वर्ष. ) (कुडती आणि लेगीन्ग्स.जिना चढताना, पाठमोरी.  एका दरवाजासमोर थांबते.) कट-टू दरवाजा- बोर्ड-'माधवी सरपोतदार'. (तरुणी बेल दाबते.) दरवाजा उघडतो. दारात एक जराशी मोठी  modern स्त्री.(वय- ३०-३२ च्या आसपास) नाव-  माधवी. माधवी:  हाय, मानसी! किती दिवसांनी येतेयस! (मानसी गळ्यात पडते.) मानसी: ताई... बोलायचंय गं जरासं. माधवी: अगं आत तर ये आधी. बोलू निवांत. आम्ही फक्त FB वरच पाहतो तुला. (तिचा चेहरा निरखून पाहत)  धडपडलीस कि काय कुठे? चेहरा असा का झालाय? (मानसी आत येते. घर बरचसं नवीन पद्धतीचं. छोटसं. किचन आणि hall एकत्रच.) (मानसी कसंतरी हसते, खुर्चीवर बसते.) माधवी: (किचनमध्ये काम करताना) (कट टू मानसी. कसल्यातरी विचारात. background ला माधवीचा आवाज चालू) (मानसी सतत डोळे पुसताना) वाढदिवस छान झाला न परवाचा, येणारच  होते मी, पण अगं जमलंच नाही. पण फोटो पहिले तुमचे आणि आर्यनने लिहिलेली पोस्ट वाचली. खूप प्रेम हं त्याचं तुझ्यावर. काहीवर्षांपुर्वीची भांडणं विसर आता तुही. आनंदात राहत जा गं जरा.. एकटीच काय बोलतेय मी, बोल कि काहीतरी. (कप...