TV pahava ka?
हल्ली मुलांचं आणि टीवीचं खूप घट्ट नातं निर्माण झालंय. काही घरांमध्ये हि एक चिंतेची बाब ठरते आहे. मुलाचं अभ्यासाकडे होणारं दुर्लक्ष, वागण्यात येणारा जास्तीचा शहाणपणा ह्या गोष्टींचं खापर नेहमीच tv वर फोडलं जातं. मुलांसाठी तर छोटा भीम, उगी, मोटू-पतलू, टोम अंड जेर्री हि रोज भेटणाऱ्या सवंगड्याची नावं झाली आहेत; आणि निरनिराळ्या मालिकांचे title songs परीक्षेला असणाऱ्या कवितांसारखे मुखोद्गत झाले आहेत. स्वत:ला जरा वेळ मिळावा, शांतता मिळावी, कामं उरकता यावी, मुलाने जरावेळ तरी शांत बसावे म्हणून थोडक्यात, आपल्याला त्रास नको म्हणून आपणच त्यांना tv लावून देतो. मुलं त्यात रमतात सुद्धा. मग खाताना tv, झोपताना tv हे चक्र सुरु होतं. काही घरांमध्ये tv वरून आजी-आजोबा आणि मुलं ह्यांच्यात वादही रंगतात असं मी ऐकलंय. काही काळानंतर आपला मुलगा/मुलगी जरा जास्तच tv पाहतो ही आई-बाबांसाठी काळजीची गोष्ट होत जाते. मग परीक्षेच्या काळांत tv बंद. किंवा tv कायमचाच बंद अशी भूमिका आई-बाबा घेतात. त्याचा परिणाम किती हो...