दोन प्रसंग..
एक
engineer मुलगा वडिलांना म्हणाला, " बाबा, मला नोकरी करायची नाही. business करेन." बाबा म्हणाले, " तुला काय जमणार? गुपचूप नोकरी करावी. तू काहीतरी खूळ डोक्यात घेऊन बसलायस. तुझ्या business ला माझी संमती नाही. जे करायचंय ते कर " मुलगा दुखावला. त्याची स्वप्न त्याला शांत बसू देत नव्हती. त्याने निर्णय घेतला. नोकरी सोडली. business सुरु केला. जिद्दीने तो वाढवालाही कारण मी काहीतरी करू शकतो हे त्याला बाबांना दाखवायचं होतं.
दोन
दुसरा घरातही हेच झालं. Engineer मुलगा वडिलांना म्हणाला, " बाबा, मला नोकरी करायची नाही. business करेन." वडील म्हणाले, "business करण्याचं धाडस करतोयस. जरूर कर. पण विचारपूर्वक कर. काही लागलं तर सांग . मी पाठीशी आहेच." मुलाच्या डोळ्यांत खूप स्वप्न होती . त्यानेही business जिद्दीने वाढविला कारण बाबांचा विश्वास त्याला सार्थ ठरवायचा होता.
दोन्हीही प्रसंगात मुलं जिद्दीने उभी राहिली. पहिला अविश्वासामुळे तर दुसरा विश्वासामुळे.
ह्या दोन प्रसंगाना अनेक फाटे फुटू शकतील. आपली कुवत बाबांनी ओळखली नाही ह्याची टोचणी त्याच्या मनात सतत राहिली का? बाबांचं चुकलं का? बाबांनी त्याला ओळखलं नाही का? business नीट चालला नसता तर, मुलगा आरंभशूर असता तर, दुसऱ्या बाबांनी दाखविलेला विश्वास अवास्तव असता तर; आणि कितीतरी. मुद्दा तो नाहीच.
आपल्या मुलाला योग्य प्रकारे ओळखून त्याला योग्य रस्ता दाखविणे , त्याला समजून घेणे आणि समजेल अशा भाषेत समजावून सांगणे म्हणजेच तर त्याचा 'बाप' असणे.
Comments
Post a Comment