Posts

Showing posts from September, 2015
"खोटं कधी बोलू नये", हि शिकवण लहानपणापासून दिली जाते. तरीही, "पोट दुखतंय, शाळेत जात नाही", "माझा अभ्यास झालाय" किंवा "गृहपाठाची वही विसरलो," असं छोटं-मोठं खोटं सगळीच मुलं बोलतात. हे खोटं बोलण्याचं प्रमाण जेंव्हा मार्कांची अदलाबदल करणे, गृहपाठ दिलाच नाहीये असे सांगणे, निरोप न देणे, चुका लपविणे, न सांगता पैसे घेणं, अशा प्रकारे वाढत जातं तेंव्हा तो एक चिंतेचा विषय बनत जातो. मुलांना खोटं बोलण्याची सवय जडते. आपण नेमकं कुठे कमी पडलो, हे आई-बाबांना कळत नाही. आपल्या मुलाने आपल्याला फसवलं हे दु:ख खूप जास्त वाटतं. बरेचदा, 'खोटं बोलणे', ह्या कारणासाठी अगदी भयंकर शिक्षा केली जाते. त्या शिक्षेमागे आई-वडिलांना खोटेपणामुळे आलेला सात्विक संताप हे कारण असतं.  आम्ही सभ्य आहोत, मग मुलं खोटं का बोलतात ? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना खोटं बोलण्याची कारणं लक्षात घ्यायला हवीत.   खोटं बोलण्याची सवय अगदी लहान वयात जडू लागते. मुलं जसजशी मोठी होतात तसतसे खोटं बोलण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचे सवयीत रुपांतर होते. मग खरं बोलतानाच घाबरल्यासारखे वाटते. काही ...

सजीवं दहते चिंता

आपण सर्वचजण कधी न कधी तरी काळजीत असतो. परीक्षा, अवघड काम, आयुष्यातले महत्त्वाचे  निर्णय ह्या बद्दल सर्वांनाच कधी न कधी काळजी वाटते. आपल्या जवळच्या माणसाचे आरोग्य, पैसे ह्याबाबतही बरेचजण चिंतेत असतात. पण काही जण मात्र असे काही नसले तरीही काळजीत असतात. काळजी करण्यासाठी त्यांना कोणतंही निमित्त पुरतं. आपण उगाच काळजी करतोय, हे त्यांनाही बरेचदा समजत असतं. पण शांत राहणं, relax होणं जमत नाही.  असं काळजी वाटणं अनेक प्रकारचं असू शकतं. एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटणे. एखादी गोष्ट करण्यासाठी हिंमतच न होणे, म्हणजे, नापास होऊ ह्या भीतीने पेपरच न देणे, आजारी पडू ह्या भीतीने अति स्वच्छता करणे किंवा अगदी काहीही दृश्य कारण नसले तरी मागे कधीतरी घडून गेलेल्या गोष्टींसाठी वाईट वाटणे, काळजी वाटणे. ह्या सततच्या काळजीमुळे चिडचिड वाढते, कामात लक्ष लागत नाही, रात्री झोप येत नाही, अनेक शारीरिक आजारही  बळावतात.  ह्या अशा काळजीतून बाहेर पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात, विचार केला जातो, पण काळजी काही पाठ सोडत नाही. 'सजीवं दहते चिंता.. ' ह्या उक्तीप्रमाणे ती आपल्याला जाळतच जाते. ...

buddhimatta: anuvanshik ki vatavaran-nirmit

काही दिवसांपूर्वी, "मुलांमधील बुद्धिमत्ता ओळखा', ह्या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित झाला होता. ह्या लेखाने उपस्थित केलेला एक प्रश्न म्हणजे बुद्धिमत्ता अनुवांशिक असते कि त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होतो? हा प्रश्न जसा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना पडतो तसाच तो संशोधकांनाही पडला आणि कित्येक दशके त्याच्यावरती अभ्यास करण्यात आला.    अभ्यासाचा एक महत्वाचा प्रकार म्हणजे सारखीच अनुवंशिकता असणाऱ्या जुळ्या मुलांचा अभ्यास, ह्या अभ्यासातून पुढे आलेला विचारप्रवाह असे सांगतो कि, जुळ्या मुलांना वेगवेगळ्या वातावरणात वाढवले तरीही त्यांची बौद्धिक क्षमता सारखीच असते. त्यातही जे एकाच बीजातून (monozygotic ) जन्माला आलेले जुळे असतात त्यांच्या  बुद्धीमत्तेमध्ये जास्त साम्य दिसून येते. हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे असले आणि अनुवंशिकतेला आधार देणारे असले तरी दुसरे संशोधनही तेवढेच सतर्क आहे. दुसऱ्या संशोधनामध्ये वातावरण निर्मित घटकांचा बुद्धिमत्तेवर होणारा परिणाम तपासून पाहण्यात आला. ह्या मध्ये असे आढळले कि, जेव्हा जुळी मुले एकाच घरात वाढतात तेव्हा त्यांच्या बौद्धिक क्षमतांमध्ये जास्त साम...