माझ्या मुलीला चित्र काढायला, रंगवायला, रंगांशी खेळायला खूप आवडतं. जेंव्हा जेंव्हा मी तिला drawing class लावला तेव्हा तेंव्ह मला एक गोष्ट जाणवली. सुरुवातीला एक चित्र काढून देतात मग गिरवायला लावतात. नंतर एखादे चित्र समोर ठेवतात आणि अगदी जशास तस्से काढायला लावतात. अशीच काहीशी गोष्ट मला शाळांमध्ये निबंधलेखना बाबत जाणवली. परीक्षेला जो निबंध येणार असेल तो वर्गात लिहून देतात. मुलांनी तो पाठ करायचा आणि जाऊन लिहायचा. अचूक, जशास तसे लिहिणाऱ्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. दोन्ही गोष्टींमध्ये मला जाणवतं कि expression ला वावच नाही. आपल्याला काय वाटतं हे सांगायचंच नाही. निमुटपणे फक्त ऐकायचं. आज्ञाधारक व्हायचं. नियम पाळायचे, शिस्तीत राहायचं. लहान होते तेंव्हा मी एक अत्यंत आज्ञाधारक मुलगी होते. घरी आणि शाळेत माझं नेहमी ह्या गुणासाठी कौतुक होत असे. जसजशी मोठी होत गेले मला कळू लागलं, आज्ञाधारक असण्यापेक्षा निर्णयक्षम असणं जास्त गरजेचं आहे. मला शिक्षा झाली कि, मी मुळूमुळू रडायचे. ती होऊ नये ह्या प्रयत्नात असायचे. आपल्याकडे ह्यालाच शहाणी मुलगी म्हटलं जातं ना? नंतर कळलं बंडखोर...
Posts
Showing posts from May, 2018