Posts

Showing posts from January, 2016

शंभर टक्के

"माझं १००% सगळं बरोबर असावं", "सगळं अगदी परफेक्ट असावं", "माझ्यात नावं ठेवायला जागा नसावी", "माझी मुलं गुणी असावीत", "माझं घर व्यवस्थित असावं" , अशी कितीतरी परिपूर्णतेची स्वप्न आपण सगळेच पाहतो. हि स्वप्न '१००%'  सत्यात उतरावीत ह्यासाठी प्रयत्नही करतो.  जेंव्हा १००% मिळण्याऐवजी ९०% मिळतात तेंव्हा हे नसलेले १०% काहीवेळेस प्रेरणा देतात, तर काही वेळेस निराशा. उरलेल्या १०% साठी उदास झालेले अनेकजण दिसतात. असं होतं तेंव्हा आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल वाटणारं समाधान कमी होतं. आणि दु:ख बोचत राहतं.  असं का होतं? नसलेले १०% मिळविण्याच्या इच्छेचा जेंव्हा अट्टहास होतो, तेंव्हा दु:खाला सुरुवात होते.  ते १०% नाहीत तर काहीच नाही, असा दृष्टीकोण तयार झाला कि,  आपण स्वत:ला त्रास करून घेऊ लागतो आणि ९०% कडे  सरळ-सरळ दुर्लक्ष करतो. स्वत:लाच नको-नको ते बोलू लागतो.  नालायक ठरवू लागतो.    हे १००% आपल्याला अनेक गोष्टींमध्ये हवे असतात. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, घर, मुलं, संसार, नोकरी, परिक्षा सगळ्याच बाबतीत. १००% मिळविणे पूर्णपणे आपल्या हा...