"आई मला हाताने करायचंय, करू दे नं वं.." चार वर्षांचा मुलगा TV पाहत बसलेला असतो. आई एकेक घास करत त्याच्या तोंडात कोंबते. तिला हवं तेवढं त्याने खाल्लं कि मग म्हणते, "मी भरवल्याशिवाय खातंच नाहीस तू." सहा वर्षांचा मुलगा शाळेसाठी तयार होत असतो. म्हणजे आई त्याला दात घासून देते, बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घालते. कपडे चढवते, सॉक्स-बूट घालून देते आणि नंतर त्याची bag आपल्या पाठीवर घालून त्याला वर्गापर्यंत पोहोचवते. एका जुनियर केजीतल्या मुलाची वही एकदा पहिली. अगदी व्यवस्थित आडव्या- उभ्या रेषा काढलेल्या होत्या (standing lines- sleeping lines). मी म्हटलं, "हुशार हं मुलगा.." तर आई म्हणाली, "अहो कसंच. बसतंच नाही तो. बसला तरी सरळ रेष येतंच नाही त्याला. वेड्या-वाकड्याच जातात. वही पूर्ण व्हायला नको का? मीच देते काढून त्याला." एकदा एक आई सांगत होती, "सात वाजता van येते, मी पावणेसातला उठवते तिला. मग अज्जिबात त्रास देत नाही ती. मग पटपट आवरून होतं दहाव्या मिनिटाला. लवकर उठवलं ना तर सगळं तिलाच करायचं असतं. मग खेळत-खेळत उशीर लागतो. बरेचदा मुलं मोठ...
Posts
Showing posts from 2018
आई- सुरुवातीचं विश्व आणि विश्वासाची सुरुवात
- Get link
- X
- Other Apps
'जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास' ही माणूस म्हणून घडण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट. अगदी तान्ह्या बाळालाही गरजेची असणारी. 'जगावर आणि स्वत:वर असणारा विश्वास आकाराला येण्यासाठी बाळाशी त्याच्या आईचं किंवा आईसारख्या कुणाचं तरी नातं फार महत्त्वाचं असतं. 'प्रेम-विश्वास ' ह्या संकल्पनेची सुरुवात ह्याच नात्याने होते. बाळाच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच बाळाला comfort देणं, त्याच्या रडण्याला response देणं, त्याला मायेने जवळ घेणं आणि त्याला कळत नसलं तरीही, 'भूक लागली शोनाला...आत्ता येते हं पिल्लू' असं काहीतरी बोलणं विश्वास संपादन करण्यासाठी खूप आवश्यक असतं. हे सगळं सातत्याने पुरवणंही गरजेचं असतं. सुरुवातीचे सहा आठवडे बाळाला काहीच कळत नाही. पण त्याकाळात आजूबाजूच्या परिसराची ओळख मात्र होत असते. आपल्या प्रत्येक हाकेला कुणीतरी 'ओ' देतंय हे ह्या काळात बाळाला कळते. अर्थात, हीच आपली आई हे कळायला थोडा अवकाश असतो. साधारण तिसऱ्या महिन्यापासून 'हीच ती बाई हं, जी मला मायेने जवळ घेते हे बाळाला कळू लागतं.' मग हुं..हुं करणे, हसणे ह्या गोष्टींना सु...
- Get link
- X
- Other Apps
आईच्या निरपेक्ष प्रेमातून, सगळं करून पाहण्यातून, स्वावलंबनातून शिकणाऱ्या मुलाचं जग पाचव्या-सहाव्या वर्षापासून विस्तारू लागतं .आता त्यांत शाळा, शाळेतल्या टीचर्स, मित्र-मैत्रिणी ह्यांची तसेच लिहिणे, वाचणे, गणित सोडवणे ह्यांची भर पडते. म्हणजे मुलांना वाचलेलं समजणं, गणितातल्या संकल्पना समजणे ह्या गोष्टी होऊ लागतात. आई-बाबांचं मत, शाळेतल्या शिक्षकांचं मत, मित्र-मैत्रीणीचं आपल्याबद्दलचं मत ह्यांतून स्वत: बद्दलचं स्वत:चं मत आकाराला येऊ लागतं. ह्या वयांत आपण मुलांना लेबल देऊ लागतो. 'हुशार' किंवा 'खोडकर', 'बडबड्या' अशी अनेक नावे देतो त्याचबरोबर त्यांच्या मनावर 'ते चांगले आहेत किंवा नाही' हेही ठसवतो. जो त्यांच्या स्वत:बद्दलच्या मताचा एक भाग बनतो. हळूहळू मुलांसाठी 'मित्र' सर्वस्व होतात. आता मित्रांचं appreciation मिळवणंही महत्त्वाचं असतं. आई-बाबा म्हणून आपल्याला हे स्वीकारणं काहीवेळेस अवघड जातं. आणि काही बंधनं आपण टाकतो. आपल्या बरोबरीची चार मुलं सायकल वर शाळेत जातात पण आपल्याला आपली आई पाठवत नाही, हि गोष्ट आत्ता फक्त जाणवतच नाही तर त्रासही देऊ ...
- Get link
- X
- Other Apps
सीन-१. (तरुणी (वय- २५-२७ वर्ष. ) (कुडती आणि लेगीन्ग्स.जिना चढताना, पाठमोरी. एका दरवाजासमोर थांबते.) कट-टू दरवाजा- बोर्ड-'माधवी सरपोतदार'. (तरुणी बेल दाबते.) दरवाजा उघडतो. दारात एक जराशी मोठी modern स्त्री.(वय- ३०-३२ च्या आसपास) नाव- माधवी. माधवी: हाय, मानसी! किती दिवसांनी येतेयस! (मानसी गळ्यात पडते.) मानसी: ताई... बोलायचंय गं जरासं. माधवी: अगं आत तर ये आधी. बोलू निवांत. आम्ही फक्त FB वरच पाहतो तुला. (तिचा चेहरा निरखून पाहत) धडपडलीस कि काय कुठे? चेहरा असा का झालाय? (मानसी आत येते. घर बरचसं नवीन पद्धतीचं. छोटसं. किचन आणि hall एकत्रच.) (मानसी कसंतरी हसते, खुर्चीवर बसते.) माधवी: (किचनमध्ये काम करताना) (कट टू मानसी. कसल्यातरी विचारात. background ला माधवीचा आवाज चालू) (मानसी सतत डोळे पुसताना) वाढदिवस छान झाला न परवाचा, येणारच होते मी, पण अगं जमलंच नाही. पण फोटो पहिले तुमचे आणि आर्यनने लिहिलेली पोस्ट वाचली. खूप प्रेम हं त्याचं तुझ्यावर. काहीवर्षांपुर्वीची भांडणं विसर आता तुही. आनंदात राहत जा गं जरा.. एकटीच काय बोलतेय मी, बोल कि काहीतरी. (कप...
दुसरी मुलगी
- Get link
- X
- Other Apps
दुसरी मुलगी झाली आणि तिचं नशीब पालटले. त्या दिवसापासून ती कुठेय, काय करतेय हे बघायला तिच्या नवऱ्याला फुरसतच मिळाली नाही. ... ....दुसरी मुलगी झाली आणि सासू-सासऱ्यांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. पूर्वी ज्या गोष्टींसाठी कौतुक व्हायचं त्या गोष्टी आता टोचून बोलल्या जाऊ लागल्या. ह्या गोष्टी आजही घडतात. दोन मुली असणं हे आजही कित्येक घरांमध्ये कमीपणाचे मानलं जातं. गेले ३-४ दिवस खूप अस्वस्थ आहे. काही अशा लोकांना भेटले, ज्यांना दोन मुली आहेत ह्याचं वाईट वाटतं. इतकं कि, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर बायकोशी बोलावसंसुद्धा वाटत नाही. काही अशाही लोकांना भेटले, ज्यांना मुलगा हवा म्हणून तिसऱ्यांदा चान्स घेतला (आणि ह्या तिसऱ्या चान्ससाठी बायकोला किती त्रास होतोय ह्याची त्यांना पर्वाही नव्हती. दुसरी मुलगी झाली म्हणून आईही नाराज असते. त्या मुलीच्या वाट्याचे बाकीचे हक्क तर सोडाच पण प्रेमही दिलं जात नाही. हे लोक सुशिक्षित आणि सो कॉलड सुसंस्कृत (?) असतात. वाटलं, हे सगळं किती अमानुष आहे....किती त्रासदायक आहे... ह्यातून बाहेर पडण्याचा काहीच ...
- Get link
- X
- Other Apps
माझ्या मुलीला चित्र काढायला, रंगवायला, रंगांशी खेळायला खूप आवडतं. जेंव्हा जेंव्हा मी तिला drawing class लावला तेव्हा तेंव्ह मला एक गोष्ट जाणवली. सुरुवातीला एक चित्र काढून देतात मग गिरवायला लावतात. नंतर एखादे चित्र समोर ठेवतात आणि अगदी जशास तस्से काढायला लावतात. अशीच काहीशी गोष्ट मला शाळांमध्ये निबंधलेखना बाबत जाणवली. परीक्षेला जो निबंध येणार असेल तो वर्गात लिहून देतात. मुलांनी तो पाठ करायचा आणि जाऊन लिहायचा. अचूक, जशास तसे लिहिणाऱ्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. दोन्ही गोष्टींमध्ये मला जाणवतं कि expression ला वावच नाही. आपल्याला काय वाटतं हे सांगायचंच नाही. निमुटपणे फक्त ऐकायचं. आज्ञाधारक व्हायचं. नियम पाळायचे, शिस्तीत राहायचं. लहान होते तेंव्हा मी एक अत्यंत आज्ञाधारक मुलगी होते. घरी आणि शाळेत माझं नेहमी ह्या गुणासाठी कौतुक होत असे. जसजशी मोठी होत गेले मला कळू लागलं, आज्ञाधारक असण्यापेक्षा निर्णयक्षम असणं जास्त गरजेचं आहे. मला शिक्षा झाली कि, मी मुळूमुळू रडायचे. ती होऊ नये ह्या प्रयत्नात असायचे. आपल्याकडे ह्यालाच शहाणी मुलगी म्हटलं जातं ना? नंतर कळलं बंडखोर...
- Get link
- X
- Other Apps
नाच गं घुमा.. कशी मी नाचू? ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला, बांगड्या नाही मला, नाचू मी कशी? काही दिवसांपूर्वी एका मुलीला भेटले होते. तिने सांगितलं, "माझी स्वप्नं खूप मोठी आहेत. पण परिस्थिती अशी आहे कि, मी ती पूर्ण कधीच करू शकणार नाही." तिला विचारलं, "असं काय गं झालंय?" तेंव्हा तिने उत्तर दिलं, "आईला सांगितलं, मला मैत्रिणीने लावलाय तो क्लास लाव, तर आई म्हणते, 'नाही'.. बाबांना सांगितलं मला अभ्यासासाठी ते पुस्तक आणून द्या. ते म्हणतात, 'आज आणू, उद्या आणू.' पण आणतच नाहीत. पाहिजे तो क्लास नाही, पाहिजे ते पुस्तक नाही. मग कशी माझी स्वप्न पूर्ण कशी होणार?" पराभवाची कारणे, परिस्थितीत शोधण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना असते. तक्रारीसाठी अनेक गोष्टी सापडतात. 'नाचू मी कशी?' हा प्रश्न विचारत बसतात. त्या मुलीला विचारलं, 'जगात फक्त त्याच क्लासमधली मुलं पुढे जातात का? आणि जगात फक्त तेवढे एकच पुस्तक आहे का?' तेंव्हा, 'नाही', म्हणाली. म्हटलं, "मग? योग्य काय आहे? काही नाही म्हणून हातावर हात ठेवून बसणे कि, जे आह...
- Get link
- X
- Other Apps
हुशार , अतिहुशार , मठ्ठ अशा विशेषणांनी नेहमीच आपल्या बुद्धिमत्तेचा उद्धार केला जातो . सर्वसामान्यपणे परीक्षेत चांगले मार्क्स मिळविणे म्हणजे बुद्धिमान असणे असा समज आजही रूढ आहे . काहीजण मात्र ह्या परीक्षा पद्धतीतून बाहेर पडू पाहतात , आणि लक्षात ठेवणे , समजून घेणे म्हणजे बुद्धिमत्ता असे समजतात . वेच्स्लेर ह्या मानसशास्त्रज्ञाच्या मते , बुद्धिमत्ता म्हणजे तुमची सारासार विचार करण्याची , त्या नुसार काम करण्याची आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता . थोडक्यात , फक्त ज्ञान संपादन करणे किंवा ते ज्ञान जसे च्या तसे पुन्हा म्हणून किंवा लिहून दाखविणे म्हणजेच बुद्धिमत्ता नव्हे . तो बुद्धिमत्तेचा फक्त एक भाग झाला. एखादी गोष्ट समजून घेणे आणि तिचा वापर करत परिस्थितीशी जुळवून घेणे किंवा मात करणे म्हणजे बुद्धीमत्ता . बुद्धिमत्ता हे मानवजातीला मिळालेले वरदान . त्याच्या बळावरच आपण पूर्ण सृष्टीवर राज्य करीत आहोत . माणूस नेमका किती बुद्धिमान आहे ? ह्या कुतूहलापोटी बुद्धिमत्ता मोजण्यास...
- Get link
- X
- Other Apps
आपल्याकडे बरेचदा, मुलाला म्हातारपणाची काठी समजलं जातं. हल्ली, काही मुलांच्या वागण्यामुळेच, (म्हणजे आई-वडिलांना न सांभाळण्याच्या मुलांच्या निर्णयामुळे) 'मुलापेक्षा मुलगी बरी', असं म्हटलं जातं. 'आई-बाबांच्या उपकाराची परतफेड अशी करतात का?' असं एका आईकडून मी एकदा ऐकलं होतं. 'आई होणं हा job महाकठीण', हे पण एका आईने एकदा सांगितलं होतं. 'माझं त्यांच्याशी कधीच पटलं नाही फक्त मुलाची आबाळ व्हायला नको म्हणून इथे राहिले', पुन्हा एक आई. 'मुलांना स्वत:च्या बाजूने वळवून घेतलं तिने. बाप कसा आहे ते त्यांना कळलचं नाही', एक बाबा. अशाप्रकारची वाक्यं मी कित्येकदा ऐकते. ह्यांतून आपण मुलांपर्यंत नक्की काय पोहोचवतो? मुलं म्हणजे एक अडचण, मुलं म्हणजे एक हत्यार, मुलं म्हणजे एक आधार. मुलांसाठी केले जाणारे काम म्हणजे त्यांच्यावर केली जाणारी दया किंवा उपकार'. मुलाकडे एक काम, एक हत्यार किंवा एक काठी म्हणून पाहणं आणि त्याच्यासाठी आपण करत असणाऱ्या गोष्टीना आपणच उपकाराचे नाव देणं, ह्यांत आपलं काहीच चुकत नाहीये का ? मुलं ,'आम्हाला जन्...
- Get link
- X
- Other Apps
बरेचदा, आपण कुणाशी तरी बोलत असतो, आणि मागून आपले चिरंजीव किंवा सुकन्या 'आई-आई, हे बघ, असं कर मला हे दे, किंवा असंच काहीसं बोलत असतात. ' आपल्या बोलण्यात disturbance आणत राहतात. बरेचदा, आपण कसल्यातरी महत्त्वाच्या कामात असतो, आणि मुलं असं काहीसं करतात कि, ते महत्त्वाचे काम सोडून आपण मुलांना रागवायला जातो. जावंच लागतं. काहीवेळेस, काहीही कारण नसताना, आरडा-ओरडा, रडारड, चिडचिड किंवा काहीतरी व्रात्यपणा मुलं करतात. ह्या सगळ्या गोष्टीमागे, बरेचदा, लक्ष वेधून घेणे हा हेतू असतो. 'कुणीतरी आपल्याकडे लक्ष देणे,' हि एक मानसिक गरज आहे. 'आपल्याकडे लक्ष द्यावं,' असं न वाटणारा माणूस विरळाच. मुलांसाठी तर त्यांच्याकडे कुणीतरी लक्ष देणं हि गोष्ट खूप सुखावणारी असते. कमी-जास्त प्रमाणात सगळ्याच मुलांची हि गरज असते. काही मुलांना मात्र त्यांच्याकडे सतत लक्ष दिलं जावं असं वाटतं. त्यासाठी मुलं काहीही करतात. हे वागणं स्वत:ला इजा करून घेण्यापर्यंत पोहोचू शकतं. जेव्हा मुलं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दामहून वेगळी वागतात, तेव्हा त्यामागे दोन कारणे असू शकतात. १. तुमचं त्यांच्याकड...
- Get link
- X
- Other Apps
समोर चिखलाने भरलेला खड्डा असताना त्यांत उडी मारणे. एखाद्या झाडाच्या फांदीवर चढून बसणे. रात्री उशिरापर्यंत चांदण्या पाहणे आणि उंच उडणारा पतंग पाहत तासंतास थांबणे. एखाद्या पतंगाच्या मागे फिरणे. बांधकामाच्या ठिकाणी येऊन पडलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर चढून बसणे. किती मजा ! ह्यावेळी, ऊन, वारा, पाउस कशाचाच त्रास होत नाही. लागणे, खरचटणे ह्या गोष्टीनी मुलांना काही फरक पडत नाही. फरक पडतो, तो मुलांच्या आई-बाबांना. सर्दी-खोकला, ताप ह्याचा नको तेवढा धसका आपण घेतो आणि हे सुंदर क्षण उपभोग ताना मुलांच्या आनंदाच्या आड येतो. हे सगळ्याच बाबतीत घडतं. चित्र काढताना गुलाबी रंगाचा मोर आणि पिवळ्या रंगाचा कावळा काढला तर असं काय बिघडतं? एक डोळा मोठा आणि एक छोटा आला तर नक्की काय होतं? फुलपाखराचे पंख वेगवेगळे रंगवले तर असा काय फरक पडतो? पण नाही, ते तुम्हाला चांगलं दिसत नाही, म्हणून त्यांच्यावर मनावर बिंबवलं जातं. 'अमुक गोष्ट अशी म्हणजे अशीच व्हायला हवी.' आपण मुलाच्या कल्पनांच्या आड येतो. सिंड्रेलाच्या बहिणी तिच्याशी चांगल्या वागू शकतात,वाईट वागणाऱ्या बहिणीला किंवा आईला परीची आणि राजकुमाराची वाट न पा...
partnership
- Get link
- X
- Other Apps
बरेचदा, आई-बाबा जेंव्हा मुलांना घेऊन येतात तेंव्हा असं जाणवतं कि मुळांत मुलांना कसं वाढवायचं ह्यावर एकमत नाहीये. बरेचदा, मुलं ह्या मतभेदाचा व्यवस्थित गैरफायदा घेतात. पालक म्हणून पिढी घडविण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर असते हे विसरून चालणार नाही. म्हणूनच आपण कसे वागणार आहोत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार करायला हवा. लग्नापूर्वीची आणि लग्नानंतरची एकदोन वर्ष एकमेकांच्या खूप प्रेमात गेलेली असतात. त्याभारांत अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला जातो. आपल्या नवर्याचे किंवा बायकोचे गुण- दुर्गुण कोणते आहेत, आपल्या आणि त्याच्या/ तिच्या घरांमध्ये कोणता फरक आहे? त्याचा तिच्या वागण्यावर काय परिणाम झाला असावा, ह्याचा विचार करणे, तिला/त्याला ओळखणे. खटकणार्या गोष्टी स्पष्टपणे, तक्रार न करता एकमेकांना सांगणे आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. नवरा-बायको म्हणून आपण वेगवेगळ्या घरांत लहानाचे मोठे झालेलो असतो. प्रत्येक घराची वागण्याची पद्धत वेगवेगळी असते. आपण लहानपणापासून ती पद्धत शिकतो. तसाच आपला दृष्टीकोन होत जातो. मग मुलांना शिकवताना आपण त्याच पद्धतीने जाण्याचा प्रयत्न कर...
best friends
- Get link
- X
- Other Apps
" आता dance करायचाय," सात वर्षांची चिमुरडी सांगते आणि तिचे दोन बेस्ट फ्रेंड्स dance साठी तयार होतात. हे बेस्ट फ्रेंड्स अनेक गोष्टी करतात. surprise देतात, भातुकली खेळतात, लपाछपी खेळतात. आवडीचा खाऊ बनवतात. वाट्टेल तिथे बसून खाऊ देतात. तासनतास न कंटाळता गप्पा मारतात, त्यापेक्षा ऐकतात. एकच गोष्ट रोज तशीच चार-चार वेळेस सुद्धा सांगतात. त्यांच्याशी अनेक सिक्रेट्स शेअर केले जातात.ह्या बेस्ट फ्रेंड्सचं वय असत ५८ आणि ६०. आपले आई-बाबा आणि आपल्या मुलांचे आज्जी-आबा हे एकच असले तरीही,'हेच का ते?'असा प्रश्न आपल्याला पडावा एवढं त्यांचं वागणं बदललेलं असतं. आजी-आजोबा आणि नातवंड हे नातं सगळ्यात सुंदर नातं असावं. आपले आई-बाबा म्हणून जे आपल्यावर ओरडलेले असतात, ज्या गोष्टींसाठी ओरडलेले असतात, त्याच गोष्टी ते नातवंडाना अत्यंत प्रेमाने सांगत, समजावत असतात. आपली मुलंही ज्या गोष्टींसाठी आपल्याला पळवतात त्या गोष्टी आजीकडून अगदी शांतपणे करून घेतात. माझा स्वत:चा असा समज आहे कि जगात सगळ्यांत चांगला स्वयंपाक फक्त माझ्या आज्जीला जमतो. गंमत म्हणजे माझ्या मुलीलाही तिच्या आज्जीबद्दल अगदी हेच वाट...
मुलीचा बाबा
- Get link
- X
- Other Apps
आपल्या नवऱ्याचं जेव्हा बापमध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्याच्यात खूप फरक पडतो. जर तो मुलीचा बाप झाला तर मग विचारायलाच नको. आपण ज्याला चांगलं ओळखतो, असं आपल्याला वाटत असतं त्याची वेगळीच प्रेमळ, हळवी बाजू दिसू लागते. मुलींसाठी बाबा म्हणजे काय हे सांगता येणं कठीण आहे. माझी मुलगी ३-४ वर्षांची असताना बाबासाठी पोळी करायची. अर्धीकच्ची पोळी बाबा आवडीने खायचा. म्हणायचा, "तुझ्याइतकी चांगली पोळी कुणालाच जमत नाही." आता पोळीची quality सुधारलीये पण dialogue हेच असतात. त्याचं हे वाक्य झालं कि तिला मनापासून आनंद होतो. तिच्या चेहऱ्यावर न मावण्याइतका. 'मी बऱ्यापैकी लिहिते,' हे अनेक जण मला सांगतात. हे जेंव्हा मी माझ्या पापांकडून ऐकते तेव्हा मला फार छान वाटतं. मग बाकी कुणी चांगलं नाही म्हटलं तरी चालतं. 'माझा बाबा म्हणजे सुपरमॅन आहे, त्याच्याएवढं हुशार दुसरं कुणीच नाही, ' हे असंच प्रत्येक मुलीला वाटत असतं. आपल्या भावी जोडीदाराची निवड करतानाही कितीतरी मुली आपल्या वडिलांशी मिळते-जुळते गुण आहेत का? हा विचार करतात. मुलींसाठी वडिलांचं ...
mobile
- Get link
- X
- Other Apps
"अहो, आमच्याशी संपर्कात राहावी म्हणून आम्हीच तिला स्मार्ट फोन दिला. पण त्यावर हि नकोनको ते मेसेजेस करते. परवा, सहज म्हणून ती नसताना तिचा फोन पहिला आणि ते वाचून मलाच कसंतरी झालं. १६ वर्षं हे काही वय आहे का हो अशा गोष्टींचं? " हल्ली थोड्याफार फरकाने हि वाक्यं अनेक मुलांच्या आईवडिलांकडून ऐकायला मिळतात. आता प्रेमात पडणे ह्या गोष्टींच्या बरोबरीने Sexting चा प्रकारही झोप उडवणारा ठरतो आहे. Sexting म्हणजे सोशल मेडिया, स्मार्ट फोन्स चा वापर करून लैंगिकदृष्ट्या उत्तेजक स्वत:चे फोटो पाठविणे (naked/half naked) किंवा chatting करणे. हे असे फोटो शक्यतो बॉयफ्रेंड्स ना किंवा girlfriends ना, म्हणजेच प्रेमात पडून पाठवले जातात. भारतामध्ये जवळपास २१% मुलींकडून आणि ४२% मुलांकडून अशा फोटोसाठी मागणी केली जाते.(https://timesofindia.indiatimes.com/home/science/Sexting-culture-fast-catching-up-with-Indian-teens/articleshow/14684015.cms) बहुतेक मुली नाराजीनेच फोटो पाठवतात. तेंव्हा ते नातं त्यांच्यासाठी आवश्यक असतं. फ़क्त फोटो पाठवून काय होणार? असा ए...
chal banaye aashiyan
- Get link
- X
- Other Apps
सहज आठवलं, मी लहान होते तेव्हा आम्ही मुंबईच्या GT हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये राहत होतो. दोन खोल्यांचं आमचं घर. माझे पप्पा त्यावेळी MS करत होते. दिवसांतले २०-२२ तास ते अभ्यासात असत. जे दोन-चार तास त्यांना मिळत त्यांत आम्ही तिघं, आई,पापा आणि मी ५-३-२ (पत्त्यांचा खेळ) खेळायचो. कधी पावभाजी आणि कुल्फी खायला जायचो. कधी ते मला गोष्ट सांगायचे. त्या घरांत माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आणि मी मधल्या सुट्टीत डबा खायला घरी यायचो. त्या घरांशी अशा खूप आठवणी जोडलेल्या आहेत. आम्ही तिथे रमलो होतो. सोयी-सुविधा नव्हत्या, काटकसर करावी लागे, पण आनंद मात्र होता. भरभरून जगत होतो आम्ही. तिथून आम्ही नगरला आलो. नगर आमचं गाव नव्हतं. पण आम्ही तिथे रमलो. सुरुवातीला थोडे दिवस civil हॉस्पिटलच्या डॉक्टरस कॉलनीमध्ये गेले. तिथे माझ्या वयाचे खूप मुलं-मुली होते . खेळणं, भांडणं सगळं व्हायचं. गेट-टूगेदर करायचो. अंगणात जेवायचो. धमाल करायचो. मग तिथून आम्ही झेंडीगेटला कोंबडीवाला बिल्डिंग मध्ये राहायला गेलो. तिथे आम्ही पाचजण होतो. आई, पप्पा, माझी एक मावशी (प्रणिता मावशी), माझी मावसबहीण- मिनू आणि मी. ...