दुसरी मुलगी

दुसरी मुलगी झाली आणि तिचं नशीब पालटले. त्या दिवसापासून ती कुठेय, काय करतेय हे बघायला तिच्या नवऱ्याला फुरसतच मिळाली नाही. ...

....दुसरी मुलगी झाली आणि सासू-सासऱ्यांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. पूर्वी ज्या गोष्टींसाठी कौतुक व्हायचं त्या गोष्टी आता टोचून बोलल्या जाऊ लागल्या. 

ह्या गोष्टी आजही घडतात. दोन मुली असणं हे आजही कित्येक घरांमध्ये कमीपणाचे मानलं जातं. 
 गेले ३-४ दिवस खूप अस्वस्थ आहे.
काही अशा लोकांना भेटले, ज्यांना दोन मुली आहेत ह्याचं वाईट वाटतं. इतकं कि, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर बायकोशी बोलावसंसुद्धा वाटत नाही.

काही अशाही लोकांना भेटले, ज्यांना मुलगा हवा म्हणून तिसऱ्यांदा चान्स घेतला (आणि ह्या तिसऱ्या चान्ससाठी बायकोला किती त्रास होतोय ह्याची त्यांना पर्वाही नव्हती.

दुसरी मुलगी झाली म्हणून आईही नाराज असते. त्या मुलीच्या वाट्याचे बाकीचे हक्क तर सोडाच पण प्रेमही दिलं जात नाही.
हे लोक सुशिक्षित आणि सो कॉलड सुसंस्कृत (?) असतात.

वाटलं, हे सगळं किती अमानुष आहे....किती त्रासदायक आहे... ह्यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का??

खूप हताश व्हायला होतं कधीकधी.... सगळं बघूनही आणि आपण ह्यावर पोस्ट लिहिण्यापलीकडे काही करू शकत नाही म्हणूनही....
-वसुधा

Comments

Popular posts from this blog