एक दिवस विचार केला, 'कशासाठी काम करायचं? कशासाठी पैसे मिळवायचे?' आणि काम करण्यातला उत्साहच नाहीसा झाला. मग विचार केला, जे खूप दिवसांपासून करायचंय त्यांची एक लिस्ट करूयात. थोडक्यात आपल्या इच्छांची लिस्ट बनवूयात. आणि काय विचारता, त्या वस्तू मिळविण्यासाठी, मी ताबडतोब कामाला लागले. आपली सगळ्यांचीच एक 'wishlist' असते. काय घ्यायचं? काय शिकायचं? कसं रहायचं? ह्याबद्दलची स्वप्न असतात. हि wishlist थोडी थोडी करत पूर्ण करायला लागलो कि, आनंद आणि उत्साह दोन्हीही निर्माण होतात. कष्ट करून थकलो, वैतागलो कि, हि 'wishlist' आठवावी. पुन्हा कष्ट करण्याची इच्छा निर्माण होते. motivation मिळतं. बरेचदा, आपल्या मुलांची अशी wishlist आपणच बनवतो. मग त्याचं स्वप्न आपलं स्वप्न होऊन जातं. आपण त्याच्या मागे लागतो. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडत नाही म्हणून त्याच्यावर वैतागतो. कित्येकदा, आपणच त्याला सांगून टाकतो. 'तुला गाडी घ्यायाचीये ना, मग आधी इंजिनियर हो.' म्हणजे, 'तुला जे आवडेल ते मी करतो, मला जे आवडेल ते तू कर.' वर आणि "आमची त्...
Posts
Showing posts from September, 2016
- Get link
- X
- Other Apps
माझी मुलगी senior kg मध्ये जाते. वाचन शिकण्याचं तिचं वय. परवा तिचं एक पुस्तक हातात धरून घडाघडा वाचत होती. मला कौतुक वाटलं. मी तिला दुसरा तसाच परिच्छेद लिहून दिला. तर ती गडबडली. नंतर लक्षात आलं कि, शाळेत तो धडा पाठ करून घेतला होता. unit test ला तोच वाचायला सांगणार होते. ज्यांना पाठ नाही झाला त्यांना कमी मार्क्स मिळणार होते. गेल्या काही दिवसांत मी आठवी ते दहावीच्या बऱ्याच मुलांना भेटले. काही जण ९०% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविणारी होती. सहज म्हणून अभ्यासाची चर्चा करताना लक्षात आलं, कि, मुलं पाठ्यपुस्तकं फारशी वाचतच नाहीत. प्रश्नोत्तरे शाळेतून दिली जातात. गाईड्स असतात, ट्युशन मध्ये उत्तरे पाठ करून घेतली जातात. अगदी निबंध सुद्धा रेडीमेड असतात. तेच पाठ करायचं आणि परीक्षेला जायचं. परीक्षा द्यायची आणि मार्क्स मिळवायचे. मार्कांची हि धडपड senior kg पासून किंवा त्याच्याही आधीपासून सुरु होते. मार्क्स मिळतात पण शिक्षण बाजूलाच पडतं. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपाने मार्क्स वाढत असतील पण धड्यातली मजाच जातेय असं वा...