जबाबदारीची जाणिव
बाळ जन्माला येतं. आई-बाबांना जणू काही खेळणं मिळतं. मुलांना वाढविताना आईवडील नेहमी काही गोष्टी करतात. त्या अशा, मुलांना खाऊ-पिऊ घालणे, छान छान कपडे घालणे, आजारी पडू नये म्हणून जपणे तसेच त्याला रडू न देणे, काहीच काम करू न देणे, न रागावणे, तोंडातून शब्द येण्यापूर्वी वस्तू समोर तयार ठेवणे, शाळेत बाई किंवा सर ह्यांना मुलाला शाळेत होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार सांगणे. बरेचदा, लहान मुलांची त्यांच्या मित्रांशी भांडणं होतात. आई-वडिलांची 'माझ्या मुलांना त्रास होऊ नये', हि भावना एवढी प्रबळ असते कि ते स्वत: भांडणात उतरतात. ह्या जगात आपली बाजू ठामपणे मांडण्यासाठी स्वत: उभे राहणे मुलांना जमतच नाही. परिस्थितीला सामोरे जाणे जमत नाही, त्यांचं रक्षण करण्यासाठी आई-वडील तत्पर असतात. आई-वडिलांशिवाय लढण्याची वेळ आली कि मुलं घाबरतात. थोडंसं मनाविरुद्ध झालं कि डिप्रेशन मध्ये जाणारे अनेक जण आज दिसतात कारण परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य नसते. त्यांची लढाई त्यांचे आई-वडिलच लढतात. त्याच्यासमोर येणाऱ्या अडचणी दूर करतात. हे करण्यामागे एकच उद्देश असतो, आपलं आप...