आत्मविश्वास
आत्मविश्वास (confidence) ही मनाची एक अवस्था आहे. काही कारणाने आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो तसा परत मिळविता सुद्धा येतो. आपला आत्मविश्वास जर डळमळीत झाला असेल तर c onfidence building साठी प्रयत्न करायला हवेत. आत्मविश्वासासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे आत्मभान. स्वत:ची ओळख असणं म्हणजे आत्मभान. मी कसा/कशी आहे, माझ्यातले गुण कोणते, मला काय करायचं आहे, ह्याचं भान असणं म्हणजे आत्मभान असणं. बरेचदा स्वत:च्या गुणदोषाचा विचार करताना आपले दोषच आपल्याला दिसू लागतात. दोष दिसू लागल्यानंतर तीन प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. १. ते दोष आपल्यात आहेत हेच आपण नाकारतो किंवा २. आपल्या दोषांचीच उजळणी करतो. ह्या दोन्ही प्रतिक्रिया आत्मविश्वास डळमळीत करण्याचे काम करतात. तिसरी प्रतिक्रिया असते ते दोष स्वीकारणारी आणि त्या बरोबर स्वत:चे गुणही ओळखणारी. गुणांची उजळणी करत आपण कुणीतरी आहोत असा विश्वास जागृत ठेवणारी. जी माणसं, गुणदोषांची अशी सरमिसळ सहजपणे स्वीकारतात, ते आत्मविश्वासाच्या दिशेने पावलं टाकू लागतात. फक्त स्वत:ला असं ओळखणं म्हणजे आत्मविश्वास नाही, आ...