मुलांचे मार्क्स, बुद्धिमत्ता ह्या बाबत सगळेच आई-वडील चिंतेत असतात. मुलांचा बुद्ध्यंक कसा वाढवायचा? असा प्रश्न बरेच आई-वडील विचारतात. बुद्ध्यंक जास्त असला तर आपलं मूल १०० % यशस्वी होणार, असा त्यांचा विश्वास असतो. प्रत्यक्षात मात्र बुद्ध्यांक चांगला असणारे अनेकजण आयुष्यात मागे पडलेले, हरलेले दिसतात. एवढा हुशार मुलगा हरलेला पाहून सगळेच हळहळतात. बुद्ध्यंक चांगला असूनही अयशस्वी होण्याचं कारण, भावनांकाकडे केलं जाणारं दुर्लक्ष. मुलांनी ध्येयाने प्रेरित न होणे, छोट्याशा कारणावरून अविचारी पाउल उचलणे, लवकर निराश होणे, डोळ्यात चटकन पाणी येणे किंवा भावनांचा उद्रेक होणे ह्या सगळ्यांच्या मुळाशी अविकसित भावनांक हे कारण असतं आताची वाढती स्पर्धा, त्यात टिकून राहण्याची धडपड ह्यामुळे यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकाबरोबरच भावनांक चांगला असण्याची गरज निर्माण झाली आहे. ती आपण ओळखायला हवी. त्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत. यशस्वी होण्याचं हे एक सूत्र आहे म्हणा ना ! आपलं यश हे नेहमी समाजाच्या मोजपट्टीने मोजले जाते. आपण समाजात राहतो आणि आपल्या कितीतरी गोष्टी समाजावर अवलंबून असता...
Posts
Showing posts from October, 2015
- Get link
- X
- Other Apps
काही मुलांना सगळ्याच कामांसाठी वेळ लागतो. लिहिताना, वाचताना, संकल्पना समजावून घेताना त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या मानाने जरा जास्त वेळ घेतात. त्यांना नेहमी 'मंद ' असे म्हणून हिणवले जाते. शाळेत अशा मुलांना 'माठ, मठ्ठ, ढ', अशा निरनिराळ्या विशेषणांनी संबोधले जाते. त्यामुळेच, अशा मुलांचा आत्मविश्वास खूप डळमळीत झालेला असतो. हि मुलं मतीमंद असतात का? शिकूच शकत नाहीत का? इतर मुलांच्या मानाने कमी गतीने शिकणारी मुलं, आई-वडिलांसाठी काळजीचा विषय ठरतात. खरंतर, हळूहळू का होई ना पण ती शिकत असतात हे महत्त्वाचं. ह्या मुलांना 'स्लो-लर्नर' असं म्हणतात. ह्यांचा बुद्ध्यांक सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडा कमी असतो पण मतीमंद मुलांपेक्षा जास्त असतो. सर्वसामान्य शाळांमध्ये हि मुलं शिकू शकतात. फरक एवढाच कि त्यांना शिकायला जरा जास्त वेळ लागतो. एखादी गोष्ट खूप वेळेस वाचावी लागते. खूप वेळेस समजवावी लागते. त्यांना शिकविण्यासाठी संयमाची गरज असते. स्लो लर्नर्स अभ्यास टाळतात कारण इतर मुलांच्या मानाने शिकायला त्यांना वेळ लागतो. रोज नव्या संकल्पना हि मुलं शिकू श...