"माझ्या मुलीला ना, कोणी काही बोललेलं सहनच होत नाही, खूप sensitive आहे ती, लगेच रडते. म्हणून आम्ही तिच्यावर अजिबात ओरडत नाही. आता काल teacherने तिला उगाचच शिक्षा केली. त्यामुळेच मी आज शाळेत आले, म्हटलं, डायरेक्ट Principal लाच भेटावं " माझ्या मुलीच्या मैत्रिणीची आई सांगत होती. हे ऐकणारी, जवळच बसलेली माझी मुलगी म्हणाली, "अगं सगळ्या क्लासलाच उभं राहण्याची punishment दिली होती. आम्ही सगळेच दंगा करत होतो. मग टीचर क्लासमध्ये नसताना नाही तर कधी दंगा करायचा? केलं तर केलं punish एवढं काय त्यांत? " त्या बाईला माझ्या मुलीच्या निगरगट्टपणाची काळजी वाटू लागली आणि मला तिच्या मुलीची. अशी बरीच मुलं असतात. छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात. खूप रडतात. स्वत:लाच त्रास करून घेतात. आई-वडिलांना अशा मुलांचं खूप कौतुक असतं. हि मुलं शक्यतो, आपणहून दुसऱ्यांच्या वाटेला जात नाहीत. नियम मोडत नाहीत. भांडत नाहीत. दंगा करत नाहीत. मग कधीतरी ह्यांच्याकडून झालेल्या छोट्याश्या चुकीसाठी शिक्षक ओरडले, किंवा सगळ्या वर्गाबरोबर ह्यांनाही शिक्षा झाली कि मग ती खूप रडतात. मनाला लावून घेत...
Posts
Showing posts from September, 2017
शापित मी तगमगतो...
- Get link
- X
- Other Apps
ह्या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले पण माझ्या हातानी घरटे हे निर्मियले जगण्याची ओढ अशी, उडण्याचे वेड असे घरट्याच्या लोभातही, गगनाचे दिव्य पिसे व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे अन उबेत घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते हे विचित्र दु:ख असे घेउनी उरी मी जगतो घरट्यातून, गगनातून शापित मी तगमगतो मंगेश पांडगावकरांची हि कविता वाचली कि, मला नोकरी आणि घर अशी दुहेरी कसरत करणारी आई दिसते. असंख्य आई अशा तगमगत दिवस काढत असतात. आपला जीव पाळणाघरांत सोडून जाताना, कुठेतरी दु:खी होत काम आवारत असतात. मग मुलाला पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून स्वत:च नाराज होतात. अशातच, जर मुलांच्या अभ्यासातून, वागण्यातून काही चिंताजनक गोष्टी आढळल्या तर अपराधी भावनेने ग्रासल्या जातात. मी चांगली आई नाहीये का? करियरकडे लक्ष देऊन चूक करतीये का? असे प्रश्न मनात डोकावू लागतात. पण मग नोकरी हि गरज असते, आर्थिक आणि काही वेळेस मानसिकसुद्धा. बरं, फक्त नोकरी करणाऱ्या आईच्या बाबतीत हे होतं असं नाही. सुशिक्षित आणि पूर्वी नोकरी करणाऱ्या पण आता मुलांसाठी घरी असाणाऱ्याची वेगळीच घुसमट असते. आपलं पूर्वीचे स्...