"आम्ही आमच्या मुलाला सगळं देतो, पण हा त्याचा काहीच उपयोग करून घेत नाही." जवळपास सगळ्या पालकांची आपल्या मुलांबद्दल हीच तक्रार असते. आई-वडील शिकविण्यासाठी, मदतीसाठी तयार असताना मुलं ती मदत नाकारून एका कोषात जाऊ पाहतात. बाबांनी किंवा आईने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी त्यांचा संयम सुटेपर्यंत देण्याचं टाळतात. ह्याचं कारण काय असावं?
कोषात जाणारी हि मुलं इतरवेळी अगदी मजेत दिसतात. त्यांना हवं ते करताना, आई-बाबांशी इतर विषयांवर बोलताना ती दडपणाखाली नसतात. इतर मुलांशी, लोकांशी बोलताना ती कधीच अडखळत नाहीत. घाबरत नाहीत. उलट त्यांचे नातेसंबंध खूप चांगल्याप्रकारे जपलेले असतात. पण काही बाबतीत, उदा. अभ्यास, मौन स्वीकारणं पसंत करतात.
जेव्हा अशा मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाणवलं कि, मनात खूप भावना आहेत पण त्या व्यक्त करता येत नाहीयेत. कारण, आपण भावना व्यक्त केल्या तर काय प्रतिक्रिया येईल ह्याचा त्यांना अंदाज येत नाही. आपलं चुकलं तर? हि भीती बरेचदा मुलांच्या मनात असते.
अशा मुलांच्या आई-बाबांशी जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा जाणवलं, कि, त्यांची आई किंवा बाबा किंवा दोघेही अतिशय कर्तृत्त्ववान असतात. काही वेळेस भावंडहि हुशार आणि अगदी आईची किंवा वडिलांची प्रतिमाच वाटावी असे असते. कोषात जाणारी हि मुलं घरात,नकळतपणे, एकटी पडलेली मुलं असतात. ह्याचा अर्थ असा नाही कि, घरात त्यांना एकटे पाडले जाते, पण सगळ्याच लोकांचा त्यांना स्वत: सारखं बनविण्याचा नकळतपणे प्रयत्न सुरु असतो, जो ह्या मुलांना वेगळेपणाची जाणीव देत असावा.
तुमची मुलं जर अशाच प्रकारे कोषात जात असतील तर स्वत:लाच एकदा खालील प्रश्नांच्या बाबतीत पडताळून पहा:
१. तुम्ही तुमच्या मुलाच्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करता का?
२. त्याच्या वागण्याचा त्यालाच त्रास होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करता का?
३. तुमच्या लहानपणी तुम्ही कसे होतात, ह्याचा वारंवार उल्लेख करता का?
४. भावंडांशी तुलना करता का?
५. त्याला चांगल्या मार्गाला लावणं हेच तुमच्या आयुष्याचं ध्येय आहे का?
हे सगळं करण्यामागे, पालकांचा उद्देश निश्चितच चांगला असतो. आपल्याला मिळालेलं यश आपल्या ज्या गुणांमुळे आपल्याला मिळालंय, तसंच आपल्या मुलालाही मिळावं एवढीच अपेक्षा असते. त्याला खूप यशस्वी झालेलं जरी पाहता आलं नाही तरी स्वतंत्रपणे जगताना पाहता यावं एवढाच हेतू असतो.
त्यामुळेच, त्याला सतत सल्ले देणं, शिकवणं, बदलणं सुरु होतं. थोडक्यात, तो आहे तसा स्वीकारायचं राहूनच जातं. आपण त्याला दिलेल्या सोयी-सुविधांच्या बदल्यात त्याने स्वत:साठीच थोडंतरी बदलावं हि अपेक्षा आपण ठेवतो, पण तो बदल त्या मुलाला खरंच हवाय का? ह्याचा विचार मात्र मागे पडतो. ज्या सोयी-सुविधा आपण त्याला दिल्यायत त्यातल्या किती त्याने स्वत:हून मागितल्या आहेत?
त्यानं बदलावं, त्याने शिकावं, त्याने यशस्वी व्हावं हि आपली इच्छा आहे. पण, त्याच्या इच्छेचं काय? ती कुठेतरी दाबली तर जात नाही ना? आपल्यासारखंच त्याने बनावं ह्या हट्टापायी, त्याचं मूळ व्यक्तिमत्व नाकारलं तर जात नाही ना? आणि नेहमीच चुकतं ह्या भीतीपोटी तर तो कोषात जात नसेल?ह्याचा खरंच, एकदातरी विचार करावा.
मुलाला न बदलता, तो आहे तसा स्वीकारून पहा. कदाचित, तोच तुमच्याशी बोलायला लागेल. आणि त्याच्यातल्या कितीतरी चांगल्या गुणांचा नव्याने शोध लागेल. आणि मग सगळं स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही.

Comments
Post a Comment