मुलं शाळेत जायला लागतात, तेव्हाच, खरंतर त्याच्याही आधी घरीच त्यांची एक शाळा सुरु झालेली असते. ह्या शाळेत मुलं खूप गोष्टी शिकतात. पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी शिकतात.  स्वावलंबी होणे, वेळ पाळणे, लोकांमध्ये मिसळणे, इतरांच्या भावनांचा आदर करणे, स्वत:च्या हक्कांसाठी भांडणे, तडजोड करणे, ह्या सगळ्या गोष्टी घरच्या  शाळेत शिकविल्या जातात. ह्या शाळेत शिकण्यासाठी मुलांना  प्रोत्साहन देणं आणि स्वत: शिकवणं ह्या शाळेचे शिक्षक म्हणून आई-बाबांची जबाबदारी आहे. आई -बाबा म्हणून  त्यांना भरवणं, आवरून देणं, वेळेत शाळेत पाठवणं, दप्तर भरून देणं, ह्या गोष्टी करता-करता, आपलं ह्या शिक्षकाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना?

Comments

Popular posts from this blog