अभ्यास म्हटलं कि, वाचन, लेखन, आकलन आणि स्मरण ह्या क्रिया अपरिहार्य ठरतात. वाचन हा सगळ्या गोष्टींचा पाया. बरेचदा, मुलांना वाचनाचाच कंटाळा येतो. वाचन म्हणजे फक्त अक्षरे आणि शब्द डोळ्यांखालून घालणे नव्हे, तर त्यांचा अर्थ लावणे. अर्थ लावण्याची क्रिया आपोआप होत असते. म्हणूनच त्या कडे फारसे लक्ष जात नाही. शब्द पाहण्याबरोबर त्या गोष्टीबद्दल विचार करणंही गरजेचं असतं. हेच विचार कित्येक वेळा भरकटतात आणि वाचलेले लक्षात राहत नाही. काही वेळेस धडा लवकर संपता संपत नाही, आणि कंटाळा येऊ लागतो . वाचन आणि त्यासंबधीचे विचार दोन्ही एकाच वेळी सुरु असतील तर समजावून घेण्याची क्षमता वाढते. ह्यासाठी अभ्यासकांनी काही पद्धती शोधून काढल्या आहेत. ह्यातील काही पद्धती पुढे देत आहे.
वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी धड्याची ओळख करून घेणे. जेव्हा धड्यामध्ये दिलेल्या गोष्टींची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते, तेव्हा तो धडा लवकर कळतो. म्हणजे, जर "भारताचे प्राकृतिक विभाग"असा धडा असेल, तर प्राकृतिक म्हणजे काय? हे आधी समजणे गरजेचे आहे. तसेच असे विभाग का करतात हेही समजणे आवश्यक आहे. ह्यानंतर धडा वाचला गेला तर धड्यामध्ये नेमकं काय सांगितलंय हे मुलांना लवकर कळू शकेल.
हि पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी धड्याचे नाव आणि धड्याच्या पहिल्या परिच्छेदाचा उपयोग होऊ शकतो. सारांश वाचाल्यानेही धड्यामध्ये काय दिले आहे हे समजू शकते. शिक्षकांनी किंवा पालकांनी त्याबद्दलची माहिती मुलाला आहे का, ह्याची पडताळणी एकदा घ्यायला हवी.
ह्यानंतरची पायरी असते ती पडणाऱ्या प्रश्नांची. प्रश्न पडणं, कुतूहल वाटणं. हि ज्ञान मिळविण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. दुर्दैवाने मुलांची प्रश्न विचारण्याची सवय नेहमीच दडपली जाते. एखाद्या परिच्छेदावर स्वत:ला जास्तीत जास्त प्रश्न विचारणे, म्हणजे त्या परीच्छेदाबद्दल जास्त विचार करणे. जेवढा जास्त विचार आपण करू, तेवढी ती गोष्ट डोक्यात पक्की बसते. अगदीच प्रश्न पडत नसतील तर, धड्याखालचे प्रश्न, व्यवसाय, जुन्या प्रश्नपत्रिका ह्यांचा आधार आपण घेऊ शकतो.
धडा पूर्ण वाचायला सुरुवात करायची ती प्रश्न पाहिल्यानंतर. म्हणजे, धडा वाचायचा तो प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी. धडा वाचतानाही धड्यातील माहितीचा आपल्या आयुष्याशी संबंध लावणे, त्याच्याशी निगडीत रोजच्या वापरातील उदाहरणे शोधणे ह्या गोष्टींनी आपण सतर्कपणे वाचन करू शकतो. वाचून झाल्यानंतर, कोणता भाग कळलाय, कोणता नाही, ह्याचा आढावा घेणं गरजेचं आहे.आपण वाचलेल्या, पाठ केलेल्या गोष्टी पुन्हा-पुन्हा आठवून पाहणे हेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. रोज काय आणि किती अभ्यास झालाय ह्याची उजळणी केल्याने अभ्यास पक्का होतो. काही गोष्टी पाठ करणं गरजेचं असतं. सुत्रे, व्याख्या, पाढे, कविता, इ. पण त्या पाठ करताना डोळसपणे केल्या गेल्या तर लक्षात राहतात. समजतात.
सगळ्यात महत्त्वाचं, चुकांना घाबरू नका. प्रत्येक चूक हि शिकण्याची एक संधी आहे. आपल्या चुका आपणच शोधून दुरुस्त करणे गरजेचे आहे. चुका सांगण्यासाठी आणि शिकविण्यासाठी शिक्षक, पालक आहेतच.
वसुधा देशपांडे-कोरडे
clinical psychologist,
माइंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा. लि.
९२२५५०५३६९

Comments
Post a Comment