काही लोक  fault finding technology expert असतात, म्हणजे ह्यांना साफ चादरीवरची एकच सुरकुती डोळ्यात खुपते, लहान मुलांनी काढलेल्या चित्रांमध्ये  मुलांचं भावविश्व दिसत नाही, तर वेड्या-वाकड्या रेषा डोळ्यात खुपतात.  होतकरू  गायकाचा प्रयत्न दिसत नाही, त्याचा कुठेतरी एखादा चुकलेला स्वर तेवढा सापडतो. माणूस काय बोलतोय, त्याचा अर्थ समजून घेण्यापेक्षा त्याच्या व्याकरणातल्या चुका दिसतात.  अशी माणसे हुशार असतात, स्वत: शक्यतो चुकत नाहीत. पण चुका काढण्याच्या सवयीमुळे इतरांपासून दुरावतात. कुणीही चुकलेलं ह्यांना चालत नाही. हि माणसे कायम एका छडी वाल्या कडक शिक्षकाच्या भूमिकेत असतात. म्हणून लोकांना ह्यांच्यासमोर बोलण्याचीच  भिती वाटते. ह्यांना perfectionist असं म्हणतात.     असतं.  आई-वडिलांचं वागणं जर अशा प्रकारचं असेल तर मुलांचा आत्मविश्वास तरी कमी होतो, किंवा मुलं लपवाछपवी करू लागतात. 

अशा लोकांनी लहानपणी, तरुणपणी खूप भोगलेलं असतं. कौतुक त्यांनाही मिळालेलं नसतं. इतरांसाठी नाही स्वत:साठी. आपल्या जराशा चांगलं (चांगलं म्हणजे खोटं नव्हे)बोलण्याने कुणाला तरी बरं वाटणार असेल तर तसं बोलायला काय हरकत आहे? आपल्या कौतुक करण्याने प्रोत्साहन मिळत असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे?  मुळात, चांगल्या गोष्टीतली वाईट गोष्ट हेरण्यापेक्षा, वाईटातलं चांगलं शोधलं तर आपला दृष्टीकोण सकारात्मक होतो, मग असं का करू नये? पण

 त्यांनी असं का करू नये? हा प्रश्न त्यांच्या व्यतिरिक्त  इतरांना पडतो.   हि एका चक्राची सुरुवात असते, हे लक्षात घ्यायला हवं. वेळीच बदलायला हवं; असं सगळ्यांनाच वाटतं. प्रश्न हा आहे कि, हे त्यांनाही वाटतं का?  माणसाला बदलणं हे फक्त त्याच्या स्वत:च्या हातात असतं. त्यामुळे अशा लोकांचा जर आपल्याला त्रास होत असेल तर त्यांना बदलण्याच्या भानगडीत न पडता. त्यांच्याशी संवाद साधणं शिकायला हवं.

ह्या लोकांना सगळ्यात जास्त गरज असते ती त्यांना कुणीतरी स्विकारण्याची. त्यांच्याबाबतीत कुणीतरी  'non-judgmental' राहण्याची. त्यांच्या गुणांचं कौतुक करण्याची. आजूबाजूच्या लोकांनी अशाप्रकारे स्विकारलं तर हि माणसे सुखावतात, आणि लोकांपासून तुटण्याची शक्यता कमी होते. 

त्यांनी केलेली टीका फार मनावर घेऊ नये.अशी माणसे आजूबाजूला असणे ही स्वत:ला शिस्त लावण्याची संधी समजायला हरकत नाही. मग खटकणाऱ्या गोष्टी  बोलायच्याच नाहीत का? गरज असेल तेव्हा जरूर बोलायच्या, पण त्याही शांतपणे, न दुखावता, अपमान न करता सांगता येतात  आणि ते फार अवघड नसतं. मुळात त्यांनीही असंच करावं असं आपल्याला वाटतं ना?त्यांची बंधनं जाचक होऊ लागतात, तेंव्हा न चिडता, न भांडता त्यांच्यापर्यंत हे पोहोचवायला हवं, कारण ती वाईट नसतात. तुम्ही शांतपणे सांगितलेले त्यांना कळते.
"पाण्याची सतत पडणारी धार दगडसुद्धा झिजवू शकते, फक्त थोडा वेळ लागतो". 


Comments

Popular posts from this blog