uninvolved parents, म्हणजे असे आई-वडील ज्यांचं आपल्या मुलाकडे लक्ष नसतं. हल्ली अशा आई-वडिलांकडे फार लक्ष दिलं जातं. आई आणि वडील उच्चपदस्थ, श्रीमंत असतील तर ते uninvolved आहेत असं गृहीतच धरलं जातं. Uninvolved असणं म्हणजे नेमकं कसं हे मात्र विचारातच घेतलं जात नाही.
univolved असणारे आईवडील मुलांच्या कोणत्याच गरजांकडे लक्ष देत नाहीत. ते मुलांकडून कसल्याच अपेक्षाही करत नाहीत. म्हणजे, मुलगा/मुलगी खूपवेळ उपाशी असेल तर त्याला काहीतरी खायला द्यावं हेही त्यांना सुचत नाही. मुलांचा अभ्यास, परीक्षा, मित्र-मैत्रिणी ह्याबाबतीत ते उदासिन असतात. मुलगा जर दु:खात असेल, उदास असेल तर असे का? हा प्रश्न ह्यांना पडत नाही. शारीरिक, मानसिक, भौतिक सर्वच गरजा मुलं आपल्या आपणच पूर्ण करायला शिकतात. समाजापासून तुटत जातात. नातेसंबंध जपताना कमी पडतात. शैक्षणिक प्रगती मंदावते.
आईवडिलांच्या uninvolved असण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यांना यशाची भूक असते, जिद्द असते आणि त्या भरांत ते इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. मुलांकडे लक्ष द्यायचंय हेच त्यांना माहिती नसतं कारण त्यांच्याकडेही कुणीच लक्ष न देता ती मोठी झालेली असतात. कोणत्यातरी विवंचनेतून जात असतात. बरेचदा, आईवडिलांची जीवनशैलीच अशी असते कि मुलांकडे लक्ष देणे जमत नाही. आई-वडिलांमध्ये परीपक्वता नसते.
हे सगळं फक्त श्रीमंताच्या, उच्च पदास्थांच्या घरातच असतं का? असं नाही. अत्यंत गरीब, अशिक्षित, मध्यमवर्गीय घरांमध्येही अशा प्रकारचे आई-वडील असतात. मुलांची कोणतीही इच्छा हे पूर्ण करत नाहीत.
ह्या उलट काही ठिकाणी, मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातात. मुलं हट्टी, दुराग्रही, स्वार्थी होत जातात. मग ते आईवडिलांना धमकावू लागतात. आई-वडील मुलाच्या हातातलं बाहूलं बनतात. मुलांना खूप जास्त प्रमाणात प्रेमाची उब मिळते पण कंट्रोल नसतो. मुलं काहीशी फाजील आत्मविश्वास बाळगू लागतात. स्वत:च्या हातात सत्ता असल्याप्रमाणे वागू लागतात. रागीट होतात. ह्याला अतिलाड करणारे आईवडील म्हणतात.
मग काहीवेळेस मुलांच्या वागण्यावर सतत देखरेख ठेवण्याचा प्रयत्न होतो. मुलाच्या वागण्यावर सतत कंट्रोल ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न मुलांना चांगल्या मार्गावर न्यायचं सोडून तो मार्ग सोडायला भाग पाडू शकतो.
मुळात मुलांना प्रेमाची, सुरक्षित वातावरणाची, समजून घेण्याची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ती पूर्ण झाली कि, मुलं एक जबाबदार व्यक्ती होतात. univolved parenting मध्ये नेमकी हीच गोष्ट नसते. जेव्हा मुलं depressionकडे वळतात, तेव्हा ते ह्या आईवडिलांच्या लक्षातच येत नाही. त्यावर उपचार करावेत हे त्यांना कळतच नाही. पण जसं हे uninvolved parents ना कळत नाही तसंच अतिशिस्तप्रिय आईवडीलानाही कळत नाही. हे असंच जेव्हा आई-वडिलांकडून खूप जास्त प्रमाणात ऊब मिळते तेव्हाही होतं. मुलांना फक्त प्रेम मिळणं किंवा फक्त धाकात ठेवणं दोन्हीही सारखंच त्रासदायक ठरू शकतं. दोन्हीही न मिळणंसुद्धा त्रासदायकच आहे. पुरेशा प्रमाणात दोन्ही गोष्टी असणं त्यासाठी महत्त्वाचं आहे.
ह्या दोन्ही गोष्टी मुलांना मिळण्यासाठी आईवडिलांकडे पुरेशी maturity असायला हवी. स्वत:बरोबर इतरांचा विचार करण्याची मानसिकता असायला हवी. त्यांच्या मानसिक गरजांची पूर्तता व्हायला हवी. त्यानाही प्रेम मिळायला हवं. संवाद साधता यायला हवा. त्यांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव असायला हवी.
बरेचदा ही जाणीव आपोआप येते.
मुलं जेव्हा काही कारणाने अभ्यासात मागे पडतात, नैराश्याकडे जातात किंवा चुकीच्या मार्गाने जातात तेव्हा नेहमीच आईवडिलांना जबाबदार मानलं जातं. आईवडीलसुद्धा स्वत:ला अपराधी समजू लागतात. पण मुलांचे नैराश्य, चुकीचे मार्ग, अभ्यासातील अधोगती ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यावर मार्ग शोधणाऱ्या आईवडिलांना आरोपांची नाही तर मार्गदर्शनाची गरज असते. मुलांना वाढविताना आईवडिलांच्या चुका होतात पण त्यांतल्या किती जाणीवपूर्वक केलेल्या असतात? त्या चुका सुधरण्याचा प्रयत्न जर त्यांच्याकडून होत असेल तर का स्वीकारू नये? बरेचदा, हे प्रयत्न आईवडिलांकडून होतात पण त्यांना यश मिळत नाही. अशावेळी, त्यांना पण समजून घेण्याची गरज असते.
मुलाने आत्महत्या केली किंवा चुकीच्या मार्गाने गेला कि,
त्यांत आईवडिलांचं कुठे चुकत हे सांगणारे शंभर आवाज ऐकू येतात, पण त्या आईवडिलांनी मुलासाठी खरंच प्रयत्न केले कि नाही, हे ऐकणारा एकही कान पुढे येत नाही आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नसेल कदाचित, असा विचार कोणाच्याच मनात येत नाही ह्याचं वाईट वाटतं.
वसुधा देशपांडे-कोरडे

Comments
Post a Comment