'वाट पाहणे', गोष्टीचा मला खूप राग यायचा आणि म्हणूनच 'वेळ न पाळणाऱ्या माणसांचाही'. एक तर मला कुणी अमुक-अमुक वाजता ये, असे सांगितले तर मी त्या वेळेत तिथे हजर असायचे, असते. माझी सगळी कामं उरकून, किंवा पेंडिंग ठेऊन. आणि त्यावेळेत जर तो माणूस तिथे नसेल तर मग माझी तळपायाची आग मस्तकात जायची.
मला सारखं वाटायचं. सगळ्यांना छडी घेऊन सरळ केलं पाहिजे. वेळ पाळायला शिकवलं पाहिजे. ते काही केल्या शक्य होत नव्हतं. म्हणून चिडचिड वाढत होती. एक दिवस मी विचार केला, 'लोकांचं जाऊ देत. माझी चिडचिड होऊ नये म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे.' मग काही उपाय सुचले. मी माझ्याजवळ पुस्तक ठेवायला सुरुवात केली. जिथे आधी पोहोचेन तिथे पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. मला वाचायला आवडतंच. फक्त लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात येत असे. तो अक्षरश: उडवून लावला. जिथे हे शक्य नाही तिथे गाणी ऐकायची असं ठरवलं. आणि वेळ अगदी मजेत जाऊ लागला. उशीर करणाऱ्या लोकांचा राग येणं जरा कमी झालं. राग आला कि मी स्वत:ला सांगू लागले, 'It's ok, होतं असं कधीकधी.'
मला जाणवलं, आपल्या रागाचं, दु:खाचं, वाईट मूडचं किंवा आनंदाचं, सुखाचं कारणही परिस्थितीत नसतं. आपल्या विचारांत असतं.
(The credit goes to Dr. Albert Ellis)

mast
ReplyDelete