आपण आई-बाबा झालो कि, आपल्याला असं वाटतं कि आपण फार मोठे झालो. ह्या मोठं होण्याचा आणि maturity चा संबंध असतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यावर नंतर सविस्तर बोलता येईल.

आई-बाबा झाल्यावर  आपल्याला असं वाटत असतं, कि, आपण आई-बाबा झालो म्हणजे मुलांना शिकविण्याची, प्रसंगी रागावण्याची authority  आपल्याला मिळालीये. आपण सतत शिकवत असतो, असं नाही तसं कर. हे नाही ते म्हण. अमुक नाही तमुक. असं काही ना काहीतरी.  जेव्हा मुलांना एखादी गोष्ट आत्मसात करणं अवघड जातं. तेव्हा आपण वैतागतो. चिडतो.

मिहिका सोबत घालवल्या जाणाऱ्या   वेळेत मीही असंच काहीतरी करत असते. थोडावेळ मात्र माझा आईपणाचा बुरखा बाजूला काढून ठेवते. तेव्हा जाणवतं, तिच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मी तिला जगात कसं वागायचं हे शिकवत असते आणि ती मला कसं जगायचं हे शिकवत असते.

आई-बाबा झालो म्हणून शिकविण्याची ऑथॉरिटी घेण्यापेक्षा नवीन काय शिकता येईल, ह्याचा विचार करायला हवा. स्वतःचंच  परिक्षण करत स्वतःला बदलत शिकायला हवं. आपली मुलं जन्मल्यापासून खूप काही शिकलीयेत. आपल्यासाठी त्यांनी स्वतः:ला खूप बदललंय. पण त्यांच्या जन्मापासून आपण काय शिकलो, स्वत:ला किती बदललं, ह्याचा विचारही व्हायला हवा.   

Comments

Popular posts from this blog