मुलांचं जेवण हि मुलांच्या आईसाठी सगळ्यात जास्त काळजीची गोष्ट. मुलगा पोट फुटेपर्यंत जेवला तरी, "अजिबातच खात नाही". असंच आईला वाटत असतं. लहान मुलांना भरपूर खाऊ घालणे आणि भरपूर झोपाविणे हा आईचा छंदच असतो. (माझाही होता). आपल्या मुलाने सशक्त असावं असं वाटतं. म्हणून एकवेळ आई जेवत नाही पण मुलाला खाऊ घालते.
मिहिका लहान होती तेव्हा मलाही असंच वाटायचं. तिच्या मागे-मागे फिरत, प्रसंगी त्रागा करत मी तिला खाऊ घालत असे. खरंतर मला स्वयंपाक करण्याची, नवीन पदार्थ करण्याची आणि खाऊ घालण्याची अजिबात हौस नाही. पण तिच्यासाठी मी करायचे. ती जेवत नाही म्हणून नाराज व्हायचे. कधीकधी रडायचे सुद्धा. एकदा, तिच्या बाबाने एक गोष्ट सुचविली. "तिच्या जेवणाकडे लक्षच देऊ नकोस", म्हणाला. सुरुवातीला मला त्याचा जरा रागच आला. पण मग शांत डोक्याने विचार केल्यावर काही गोष्टी पटू लागल्या. मी आणि मिहिका, वेगवेगळ्या आहोत हि पहिली गोष्ट. मला जे वाटतं तेच तसंच तिला आवडायलाच हवं असं नाही. तिला लागणारी भूक आणि मला लागणारी भूक ह्यांत फरक असू शकतो. त्यातून जेवण हि बेसिक गरज आहे. भूक लागल्यावर लहान बाळसुद्धा रडून सांगत मग ती का सांगणार नाही? जेवण तयार ठेवलं कि तिला भूक लागेल तेव्हा ती खाऊ शकते. 'आपल्याला काहीतरी हवंय हे ती नक्कीच सांगू शकते'.
मी तेव्हापासून तिच्या मागे लागणं थांबवलं. फक्त स्वयंपाक करून ठेवायला सुरुवात केली. खाऊचे डबे, healthy खाऊ (लाडू, ३-४ दिवस टिकतील अशा पुऱ्या) भरून तिच्या हातात सहज येतील असे ठेवायला सुरुवात केली. थोड्याच दिवसांत तिला हवं तेवढं आणि हवं तेव्हा, ती तिच्या हाताने खाऊ लागली. ह्यांत तिला कधी खायचं आणि किती खायचं ह्याचा निर्णय घेण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे, जेवणाच्या वेळच आमचं भांडण मिटल्यामुळे तिला वेगवेगळे पदार्थ खाण्यात इंटरेस्ट वाटू लागला. (आता ती मला cooking शिकविते). डबा खाणे, बाहेर कुणाच्या घरी गेल्यानंतर हाताने व्यवस्थित खाणे, हे सगळे प्रश्न मार्गी लागले. आपण independent आहोत ह्याबद्दल तिचा विश्वास वाढला.
मुलानी independent व्हावं, असं सगळ्याच आईबाबांना वाटत असतं, त्याची सुरुवात करायची तर मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये एक रेषा मारणं गरजेचं असतं. हि रेषा मारणं म्हणजे involved नसणं नव्हे, तर मुलांना थोडीशी authority देणं. त्याची सुरुवात अशा बेसिक गोष्टींपासूनच करायला हवी. पटतंय का?

Comments
Post a Comment