आई-बाबांना कौन्सेलिंगची (parent's counseling)गरज असते का?
बरेचदा, असं लक्षात येतं कि मुलांना वाढवताना आपलीच दमछाक होते. आपण थकतो, चिडतो. आपल्या कल्पनेतल्या आई-बाबांसारखे आपण नसतो. आणि मग अजूनच चिडचिड होऊ लागते. अशावेळी parent's counseling करून घ्यायला हरकत नाही.
आई-बाबा होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आपल्या मुलाला कसं वाढवायचं आहे, हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याचा बरेचदा, अत्यंत ढोबळ पद्धतीने केला जातो. माझ्या मुलाला/मुलीला सगळंच यायला हवं असा अट्टहास मग पुढे दिसू लागतो. मुलं दोन वर्षांची होईपर्यंत ती खूप गोड वाटतात. एकदा का अभ्यास, शाळा, त्यांची स्वत:ची मते आकाराला येऊ लागली कि, मग रागावणे, रडणे, तक्रारी, तुलना ह्या गोष्टी सुरु होतात. मुलांशी आपलं नातं ताणलं जातं.
मुलांनी ऐकलं नाही तर कसं वागायचं. अभ्यासाची गोडी कशी लावायची, मुलाला अभ्यास आवडलाच नाही तर काय करायचं, सवयी कशा मोडायच्या आणि कशा लावायच्या हा विचार आपण फारसा कधी करतच नाही. मग जेव्हा काही कारणाने मुलं आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत, तेव्हा आधी आपणच सैरभैर होतो. आपलं मूल असं वागूच कसं शकतं हा विचार त्रास देऊ लागतो. आपण सगळं frustration मुलांवर काढतो. चिडतो, रागावतो काहीवेळेस मारतो सुद्धा. काहीवेळेस कौन्सेलर्सकडे धाव घेतो, "माझ्या मुलाला थोडं
आपण कसे आहोत, आपली मुलं कशी आहेत, आपण नेमकं कसं वागायला हवं. त्यांना स्वीकारायचं म्हणजे नेमकं काय करायला हवं. हे आई-बाबा म्हणून आपण शिकायला हवं, आत्मपरीक्षण करायला हवं. त्यामुळे, घरी ज्ञानेश्वर निर्माण होईल असं मी म्हणणार नाही ;पण आपल्या मुलाशी असणारं आपलं नातं नक्कीच फुलवता येईल. आई-बाबांशी असणारं विश्वासाचं नातं आपल्या बाळाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतं.ह्यासाठी कौन्सेलर्स मदत करू शकतात.
कधी-कधी हे जाणवतं कि आपलं मुल इतरांपेक्षा वेगळे आहे. त्याच्या गरजा समजावून घेताना, रोज नव्या आव्हानांना सामोरे जाताना, मुलाला आहे तसं स्वीकारताना आपण कमी पडतो. काहीवेळेस मुलाला स्वीकारतो आपण; पण आजूबाजूच्या विचित्र नजरांचा त्रास होत असतो. काहीवेळेस त्या मुलाला आपण एवढं जपतो कि तो स्वत: काही गोष्टी करू शकत असूनही आपण मात्र त्या प्रेमापोटी त्याला करूच देत नाही. आपल्या वेगळ्या मुलाला स्वीकारण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्याला शक्य असेल तेवढं स्वतंत्र बनविण्यासाठी आई-बाबांना समजावणं, शिकवणं (parents' counseling) फायद्याचं ठरू शकतं.
आई-बाबा म्हणून शिकायला भरपूर स्कोप असतो आणि parents' counseling च्या माध्यमातून हा प्रवास सुकर होऊ शकतो.
कधी-कधी हे जाणवतं कि आपलं मुल इतरांपेक्षा वेगळे आहे. त्याच्या गरजा समजावून घेताना, रोज नव्या आव्हानांना सामोरे जाताना, मुलाला आहे तसं स्वीकारताना आपण कमी पडतो. काहीवेळेस मुलाला स्वीकारतो आपण; पण आजूबाजूच्या विचित्र नजरांचा त्रास होत असतो. काहीवेळेस त्या मुलाला आपण एवढं जपतो कि तो स्वत: काही गोष्टी करू शकत असूनही आपण मात्र त्या प्रेमापोटी त्याला करूच देत नाही. आपल्या वेगळ्या मुलाला स्वीकारण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्याला शक्य असेल तेवढं स्वतंत्र बनविण्यासाठी आई-बाबांना समजावणं, शिकवणं (parents' counseling) फायद्याचं ठरू शकतं.
आई-बाबा म्हणून शिकायला भरपूर स्कोप असतो आणि parents' counseling च्या माध्यमातून हा प्रवास सुकर होऊ शकतो.
वसुधा देशपांडे-कोरडे
माइंड मास्टर कौन्सेलर्स,
१०, गणेश कॉर्नर, महेश सोसायटी,
बिबवेवाडी, पुणे
मास लिडरसाठी लेखकांना नम्र आवाहन
ReplyDeleteमागील 14 वर्षांपासून देशाबद्दलच्या वेडेपणापायी ‘मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ या ध्येयाने प्रेरित होऊन ‘पत्रकारिता आणि शिक्षण’ या दोन प्रभावी क्षेत्रात आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व सहकार्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे. मागील दिवाळी अंकापासून ‘मॉडर्न मास लीडर’ संकल्पनेद्वारे मासिक आधुनिक सारथीचे स्वरूप पूर्णतः बदलत आहोत.
मी कोण? माझा जन्म का झाला? मी कशासाठी जगतोय? माझ्या जीवनाचा उद्देश काय? जीवनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मी काय केले पाहिजे आणि मी सध्या काय करतोय? आनंदी जीवन जगण्याची कला कशी विकसित करावी? आत्मविश्वास कसा वाढवावा? वैयक्तिक अंगभूत सामर्थ्य आणि उणिवा लक्षात घेऊन करियर कसे निवडावे? अंगभूत दोष कमी करून चांगले गुण कसे वाढवावेत? अध्यात्म, श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधील भेद कसा ओळखावा? एकाग्रता कशी वाढवावी? सर्जनशीलता कशी विकसित करावी? अहंकारापासून दूर राहून विनयशीलता कशी वाढवावी? अनावश्यक बाऊ न करता मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड आदी भाषांप्रमाणे इंग्रजीसुद्धा केवळ एक भाषाच आहे, हे लक्षात घेऊन त्यावर प्रभुत्व कसे मिळवावे? जीवनातील कठीण प्रसंगांचा अनावश्यक ताण न घेता सकारात्मक विचार करून उत्साहाने जीवन कसे जगावे? हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्कची संस्कृती कशी विकसित करावी? औषधांनी आरोग्य विकत घेता येत नाही तर उत्तम आरोग्यासाठी योग्य जीवनशैली, दिनचर्या आणि योग्य आहारासोबतच योग-प्रणायाम, व्यायाम करून आरोग्य कसे कमावता येईल? मोठे यश मिळविण्यासाठी स्वतःला नेहमी कसे प्रेरित करावे? अंतर्मनाची ताकद ओळखून त्याला कसे प्रशिक्षित करावे? धावपळीच्या युगामध्ये कामात स्वतःला व्यस्त ठेवण्यासोबतच नियमितपणे विरंगुळा मिळविण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना ‘आधुनिक सारथी’च्या माध्यमातून मदत होणार आहे. यातूनच मनुष्य जीवनाचा परमोच्च आनंद प्रत्येकाला प्राप्त व्हावा, हाच आमचा हेतू! यासाठी शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रचलित शिक्षण पूर्ण करून करियरच्या शोधात असलेले युवक-युवती, नोकरदार, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि एकंदरीत अबालवृद्ध या सर्वांना जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त माहिती, प्रेरणादायी लेख रंजकरित्या मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत.
तरी ‘आधुनिक सारथी’साठी आपण उपयुक्त लेख, कथा, प्रसंग, माहिती पाठवावे. सदर मजकूर स्वलिखित किंवा संकलित दोन्ही स्वरूपात चालतील. चांगल्या लेखनास फोटो/नावासह मासिक ‘आधुनिक सारथी’मध्ये प्रसिध्दी दिली जाईल. संबंधित लेख, कथा, प्रसंग, माहिती हे शक्यतो मराठीत पाठवावेत. (अर्थात इंग्रजी व हिंदी भाषेतसुध्दा चालतील.) धन्यवाद!
आपला स्नेहाभिलाषी,
श्रीनिवास ह. बुरा
संपादक - आधुनिक सारथी
लेख व माहिती पाठविण्यासाठी
Mail ID : saratheefoundation@gmail.com
What's App : 9028862815