"एवढी मोठी मुलगी झाली अजून कळत नाही तिला", मावशीने हे उद्गार शेजारच्या उमा बद्दल काढले. उमा हि आमच्या शेजारी राहणारी मुलगी. काही कारणाने बौद्धिक विकासात मागे असलेली. उमाला लवकर समजत नाही, म्हणून उमाच्या आई नेहमीच काळजीत असतात. मावशी सारख्या बायकांचं बोलणं त्यांच्या मनाला लागतं.
मुलांना जाणवणाऱ्या समस्यांचं खापर नेहमीच आई-वडिलांवर फोडलं जातं. प्रत्येक वेळी ते बरोबर असतंच असं नाही. काही समस्या आई-वडिलांच्या हातात नसतात. मतिमंदत्व, स्वमग्नता, learning disabilities ह्या त्यापैकी काही समस्या.
मुलांना जेव्हा ह्या समस्या असतात, तेव्हा खरंतर आई-वडिलांचा काहीही दोष नसतो. पण तरीही, आपलं काही चुकलंय कि काय हा प्रश्न त्यांना छळत असतो. ज्या मुलांना अशा समस्या नाहीत, ते आई-वडील स्वत:ला नशीबवान समजतात आणि त्याहीपेक्षा, मुलांना समस्या नाहीत ह्यात स्वत:चा पराक्रम मानतात. असं समजण्याचं खरंतर काहीही कारण नाही. मुलांना समस्या आहेत म्हणून अपराधी वाटून घेण्याचंही कारण नाही. जेंव्हा समस्या जाणवतात तेंव्हा त्यांना सामोरे जाणे जास्त आवश्यक आहे.
मुलांना समस्या आहे हे स्वीकारणं हि पहिली पायरी. एकदा समस्या स्वीकारली कि, हे माझ्याच बाबतीत का? हा प्रश्न मात्र टाळायला हवा. हा प्रश्न जास्त त्रासदायक असतो. समस्या आणि मुलांना विनातक्रार स्वीकारणं ह्या साठी खूप धैर्य लागतं. एकदा हा स्वीकार झाला कि, मग काय करता येऊ शकेल, ह्या दृष्टीने विचार करणं गरजेचं असतं. सगळ्याच मुलांना नेहमीच प्रेमाची, समजून घेण्याची गरज असते. त्यांची हि गरज आपण नक्कीच पूर्ण करू शकतो.
मुलांना शिकवताना, काही उपाय करताना, adjust करताना खूप जास्त संयम ठेवण्याची गरज असते. आजुबाजुचेच काही लोक विचित्र दृष्टीने आपल्याकडे पाहतात असं वाटू लागतं. काहीवेळेस खूप जास्त काम करावं लागतं म्हणून चिडचिड होते. अशावेळी, स्वत:ला थोडा वेळ देणंसुद्धा आवश्यक आहे. आपल्या मुलांमध्ये समस्या आहेत म्हणून कमीपणा वाटून घेण्याचं काहीच कारण नाही, मुलांमधल्या क्षमतांचा अशावेळी शोध घ्यायला हवा. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कि, मुलांमध्ये काही वैकासिक समस्या आहेत ह्याचा अर्थ मुलं वेडी आहेत, त्रासदायक आहेत असा नाही. फक्त ती इतरांपेक्षा जास्त प्रमाणात वेगळी आहेत एवढंच.
वसुधा देशपांडे- कोरडे
clinical psychologist
Mind master counsellors,
Bibvewadi, Pune
9225505369

Comments
Post a Comment