"मुलांना जास्त लाडावून ठेवायचं नाही", असं म्हणता-म्हणता आई-बाबा त्यांच्यासाठी काही नियम बनवतात. उदा. मुलाने सकाळी ६. ०० वा. उठायला हवे. अभ्यास करायला हवा , खेळणे अगदी मर्यादित असावे, सात वाजता घरात यायलाच हवं, इ. हे नियम खूप कडक असतात. ते पाळले गेले नाहीत तर शिक्षा ठरलेली असते.
नियम म्हणजे नियम आई-बाबा थोडेही वाकायला तयार नसतात. मुलं बिघडू नये हाच त्यांचा एकमेव हेतू असतो. 'आपल्या मुलांना जगात टिकून राहण्यासाठी शिस्तीची गरज आहे', ह्या मतावर ते ठाम असतात. हे काही प्रमाणात बरोबरही असतं. फक्त हि शिस्त आई-बाबांनी त्यांच्यावर लादलेली असते. आपल्यावर जेंव्हा एखादी गोष्ट लादली जाते तेंव्हा ती कितीही positive असली तरी जाचू लागते. मुलांच्या बाबतीत शिस्तीचंही असंच होतं. शिस्त जेंव्हा मुलांवर लादली जाते तेंव्हा मुलं त्यातून पळवाटा शोधू लागतात.
घरात शिस्तीचा अतिरेक होतो, तेंव्हा खोटे बोलणे, लपवा-छपवी ह्या गोष्टी सर्रास घडतात. लक्ष ठेवायला कुणीच नसताना मुलांचं स्वत:वरचं नियंत्रणही सुटतं. भरकटत जाण्याचं प्रमाण वाढतं. मुलांना बिघडू द्यायचं नाही असं म्हणता म्हणता मुलं हातातून कधी निसटतात ते कळतंच नाही. अति शिस्तीमुळे आणखी एक गोष्ट होते, ती म्हणजे मुलं कायम दबलेली राहतात. स्वतंत्रपणे निर्णय घेताना, परिस्थिती हाताळताना कमी पडतात.
मग मुलांना शिस्त लावायचीच नाही का? शिस्त हि यशस्वी होण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. मुळात शिस्त म्हणजे आपण अडचणीत येऊ नये, किंवा सापडलो तरी बाहेर पडता यावं म्हणून केलेली उपाययोजना. म्हणजे accident होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियम पाळणं, वेगावर मर्यादा ठेवणं हि शिस्त. वस्तू हरवू नयेत म्हणून जागेवर ठेवणं ही शिस्त. परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून अभ्यास करणं हि शिस्त. कोणतीही शिस्त लावताना, 'मी सांगेन तसंच वागायला हवं,' हा अट्टहास नको. शिस्त जेव्हा आपणहून पाळली जाते तेव्हा जास्त फायद्याची ठरते.
शिस्त लावताना आवश्यक गोष्ट म्हणजे नियम. नियम बनवताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यांतली पहिली गोष्ट म्हणजे नियम बनवताना मुलांच्या गरजांचा मुलांच्या दृष्टीकोणातून विचार व्हायला हवा. म्हणजे, एखाद्या मुलाची लोकांमध्ये मिसळणं हि गरज असेल, तर त्याच्यासाठी त्याने बाहेर न पडणं हि गोष्ट जाचक ठरू शकते.
नियम बनवताना आपण तो नेमका कशासाठी बनवत आहोत हे आपल्याला माहिती असायला हवं. म्हणजे, वरील उदाहरणामध्ये बाहेर गेल्याने खूप वेळ जातो, असे वाटून जर 'मुलाने बाहेर जाऊ नये' हा नियम बनवला असेल, तर ते कारण मुलापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. हे कारण मुलापर्यंत पोहोचवताना ऑर्डर देण्यापेक्षा मत घेतलं गेलं तर जास्त योग्य. उदा. 'तू बाहेर जाऊ नकोस' असं सांगण्यापेक्षा, 'तुझा वेळ वाया जाऊ नये म्हणून तू काय करू शकतोस?' असं विचारलं जावं.
नियमांच्या बाबतीत मुलाचं मत घेणं, त्याला विश्वासात घेणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे. कदाचित, सतत बाहेर जाणे किंवा अजिबात बाहेर न जाणे ह्यातला मधला मार्ग त्यामुळे निघू शकेल. मुलांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळू शकेल.
घरांत जेव्हा सगळ्यांसाठी एकच नियम असतो तेंव्हा तो आपोआपच पाळला जातो. म्हणून एखाद्या गोष्टीसाठी नियम करताना आपण स्वत: तो कितपत पाळू शकू हा विचार व्हायला हवा.
ह्या नियमांवर ठाम राहणं आवश्यक असतं. ह्याचा अर्थ नियम मोडला कि शिक्षा असा मात्र नाही. एखादा नियम मोडला गेला तर त्यामागे कोणते कारण आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे. कोणतीही नवीन सवय लावायची असेल तर सुरुवातीला चुका होणारच हे गृहीत धरायला हवे. म्हणून चुकलं तरीही पुन्हा-पुन्हा संधी देणं गरजेचं आहे.
नियम मोडण्यासाठी कुणीही शिक्षा करण्यापेक्षा जेव्हा त्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतात तेव्हा नियमांचं महत्व आपोआपच पटतं. अशावेळी परत आधाराची गरज लागतेच. आता आधार द्यायचा म्हणजे चुकांवर पांघरूण घालायचं नाही, तर परिणाम भोगताना फक्त सोबत राहायचं. ह्यावेळी बरेचदा आई-बाबांकडून म्हटलं जातं, "आमचं ऐकलं असतं तर हि वेळ आलीच नसती. " हे बरोबर असतं पण हे मुलांना कळलेलं असतं. त्यामुळे पुन्हा ऐकवण्यापेक्षा त्याच्या चुकांना स्वीकारावं. संधी द्यावी.
शिस्त लावताना दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मुलांना आदर देणं. त्यांच्या भावनांची कदर करणं. जेंव्हा नियम मोडण्यासाठी शिक्षा किंवा बोलणी बसतात तेव्हा हा आदर दिला जात नाही. स्वाभिमान दुखावला गेला तर अढी मनात बसते. बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले नाही तर मुलांमध्ये स्वत:बद्दल अनादराची भावना तयार होते. त्याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होऊ लागतो. त्यामुळे मुलं जर बदलण्यासाठी प्रयत्न करत असतील तर प्रोत्साहन द्यायला हवं. समजून घ्यायला हवं.
शिक्षेपेक्षा आधार महत्त्वाचा. मुलांचा आणि तुमचा एकमेकांवर असणारा विश्वास महत्त्वाचा. हे नेहमी लक्षात असायला हवं.
वसुधा देशपांडे-कोरडे
क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट
माईंड मास्टर कौन्सेलर्स ,
बिबवेवाडी, पुणे
९२२५५०५३६९

Comments
Post a Comment