दहावी-बारावी ह्या आपल्या आयुष्याला वळण देणाऱ्या परीक्षा समजल्या जातात. दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजे मुलांसाठी, आई -बाबांसाठी एक तणाव वाढविणारी गोष्ट.  एकीकडे सगळा अभ्यास झालाय असं वाटत असतानाच दुसरीकडे पोटात भीतीने गोळा येतो. आपण जे केलंय तेच येईल ना? हा विचार आपलं टेन्शन वाढवत असतो. 

ह्याच विचारांत जेव्हा आपण अभ्यासाला बसतो, तेव्हा खूप वेळेस वाचलेले एखादे उत्तर अचानक आठवतच नाही. असं झालं कि मग अजूनच भीती वाटू लागते. कित्येकदा, पेपर लिहितानासुद्धा अशी वेळ येते. उत्तर येत असतं, आठवत असतं पण लिहिताच येत नाही. मग कल्पनेतच आपण स्वतः ला अपयशी ठरवतो. अपयश आल्यानंतरच्या इतरांच्या प्रतिक्रिया कल्पनेतच पाहतो, ऐकतो आणि जास्तच घाबरतो.

असं होईल तेव्हा स्वतः ला एक गोष्ट सांगायला हवी, 'परीक्षेत जे होईल त्याला सामोरं जायलाच हवं.  माझ्या हातात फक्त अभ्यास करणं आहे. जो मी आत्ता करायला हवा. परीक्षेतले मार्क्स म्हणजे मी नाही, म्हणूनच अपयशाला घाबरायचं नाही.' अपयशाला घाबरायचं नाही हे ठरवतानाच यशासाठी १००% प्रयत्न करायचा हे मात्र लक्षात ठेवायला हवं. 





Comments

Popular posts from this blog