स..स.. सुट्टी
सुट्टी- मुलांसाठी एक आवडीची गोष्ट. सुट्टी म्हणजे काय? असा प्रश्न मी काहीजणांना विचारला. तेंव्हा उत्तर आलं. काम नाही, अभ्यास नाही म्हणजे सुट्टी. उशिरा उठायचं, भरपूर tv पाहायचा, बाहेर जायचं. एक दिवसाची सुट्टी सामन्यत: अशीच घालविण्याची प्रथा पडली आहे. पण जेंव्हा खूप दिवस सुट्ट्या असतात तेंव्हा काय? तेंव्हाचं planning आई-बाबांनी केलेलं असतं. समर कॅम्प, छंद वर्ग, स्विमिंग, tv, विडीओ गेम्स, इ. पूर्वी, सुट्टी लागली कि घरी मित्रांचा, भावंडांचा मेळावा असायचा. एकत्र खाणे, गप्पा, खेळ ह्यांत ती संपायची. आता सगळेच बिझी असल्यामुळे अशी सुट्टी फार कमी जणांच्या वाट्याला येते. सुट्टी सुरु असतानाचा मे महिना सामान्यपणे जरासा कंटाळवाणा जातो.
ह्या महिन्यांत सगळं करून झालेलं असतं. सर्वसामान्यपणे 'मला खूप बोर होतंय', असं म्हणण्यातच जाते. ह्या सुट्टीचा उपयोग करून घ्यायला हवा. मुळात सुट्टी म्हणजे आराम हि कल्पना आधी बदलायला हवी. सुट्टी म्हणजे बदल, रोजच्या रुटीनमध्ये केलेला बदल. म्हणजे अभ्यास नाही, काम नाही असे नाही तर त्यांत केला गेलेला बदल म्हणजे सुट्टी. हि सुट्टी घालवताना मुलांच्या आवडीनिवडीचा विचार व्हायलाच हवा. हल्ली, मुलांना काय आवडतं असं विचारल्यानंतर मोबाईल गेम्स हे एकच उत्तर ऐकण्यात येतं. मुलं काल्पनिक जगात स्वत:ला विसरू पाहतात. म्हणूनच, मोबाईल गेम्स ऐवजी एखादा छंद जोपासण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. बरीच मुलं टाकावू वस्तूंमधून काही कलात्मक गोष्टी बनवत असतात. ह्या गोष्टी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ठरतात. मुलांनीच जर स्वत:चा असा छोटासा ग्रुप केला आणि आपल्याला येणारी कला दुसऱ्यांना शिकवली तर सगळीच मुलं त्याचा आनंद घेऊ लागतील.
एखादे छोटेसे नाटुकले बसविणे, नाच बसविणे ह्या गोष्टीही मुलं स्वत: किंवा मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करू शकतात. मुलांना पाठ्यपुस्तकांत काही प्रकल्प दिलेले असतात. हे प्रकल्प करून पाहण्यासाठी हि चांगली वेळ असते.
बरेचदा, आई-वडील मुलांना सुट्टीमध्ये अभ्यासाला बसवतात. अभ्यास मुलांना नको असतो. सुट्टी मध्ये ह्याचं कारण वर्षभर त्यांना तेच करायचं असतं. ह्यावर पर्याय म्हणून सुट्टीमध्ये स्मरणशक्तीला चालना देणारे खेळ खेळू शकतो. शब्दांच्या भेंड्या लावणे, गणिताशी संबधित खेळ खेळणे ( उदा. नवा व्यापार, सापशिडी) ह्या गोष्टी आपण करू शकतो. ज्यामुळे मुलं खेळत-खेळत शिकतील.
उरलेल्या छोट्या काळाच्या सुट्टीत बोर होण्यापेक्षा, सतत tv किंवा मोबाईलमध्ये रमण्यापेक्षा असे काही खेळ मुलांना खेळायला मदत करा. मुलांना काहीच आवडत नाही असं नसतं. आपण वेळ काढून त्यांत रुची निर्माण करण्याची गरज असते.
वसुधा देशपांडे-कोरडे
माईंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा.लि.
९२२५५०५३६९
उरलेल्या छोट्या काळाच्या सुट्टीत बोर होण्यापेक्षा, सतत tv किंवा मोबाईलमध्ये रमण्यापेक्षा असे काही खेळ मुलांना खेळायला मदत करा. मुलांना काहीच आवडत नाही असं नसतं. आपण वेळ काढून त्यांत रुची निर्माण करण्याची गरज असते.
वसुधा देशपांडे-कोरडे
माईंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा.लि.
९२२५५०५३६९
Comments
Post a Comment