घटस्फोट किंवा divorceचे प्रमाण वाढतेय. ह्याचं कारण बरेचदा, मुला-मुलींच्या maladjustment मध्ये शोधलं जातं. हि maladjustment का होते?  maladjustment  म्हणजे प्रेमाचा अभाव असतो का? त्या निमित्ताने पुन्हा हा प्रश्न मला बऱ्याच दिवसांपासून पडला होता. एकदा रोबर्ट स्टर्नबर्ग ची थिअरि वाचली.  passion, intimacy आणि commitment हे प्रेमाचे तीन खांब.  सिनेमातल्या प्रेमात आणि प्रत्यक्षातल्या प्रेमात फरक असतो तो हाच. प्रत्यक्ष आयुष्यातले प्रेमविवाह आणि ठरवून केलेली लग्नसुद्धा अनेकदा मोडतात. ह्याचं कारण ह्या तीन गोष्टींचा मेळ बसलेला नसतो.

प्रेमाच्या असंख्य व्याख्या आहेत.  प्रेमामध्ये सगळ्यांत महत्वाची गोष्ट म्हणजे, आकर्षण. एखाद्या व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण, वाटणं प्रेमासाठी आवश्यक असतं. त्या दृष्टीने विचार केला तर हे आकर्षण साधारणपणे १३-१४ वर्षाच्या वयांत वाटू लागतं. ज्याला passion असं म्हणूयात. नॉर्मल असणारा कोणताही माणूस ह्या वयांत भिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होतोच. मेंदूमध्ये स्त्रवणारी काही रसायनं (neurotransmitters)ह्यांत महत्वाची कामगिरी करत असतात. प्रेमामध्ये, तहान-भूक हरपणे, झोप न लागणे, सर्वत्र प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसणे हा सगळा neurotransmitters चा परिणाम. teenage मध्ये हे होतंच. teenageच का, teenage संपल्यावर पण होतं.   जेंव्हा असं होऊ लागतं तेंव्हा आपण प्रेमात पडलोय असं मुलांना आणि मुलींना सुद्धा वाटू लागतं. आपण कुणाकडे आकर्षित होतोय ह्यामागे  कसलेही कारण नसते. काहीजण हे व्यक्त करतात तर काही मनाला आवर घालतात.

ह्या शारीरिक ओढीच्या जोडीला मैत्री असणेही आवश्यक असते. intimacy म्हणजे एखाद्याशी  शरीराने आणि भावनेने जोडले जाणे.  आपल्या मनातले विचार, वेड्या कल्पना सांगता येणे आणि समजावून घेता येणे. जेंव्हा नात्यांत intimacy असते, तेंव्हा भरपूर गप्पा असतात.  निखळ मैत्री असते.  दीर्घकाळ भांडणाला जागा नसते. माफी मागण्यापुर्वीच माफ केलेलं असतं, कारण त्या व्यक्तीला समजून घेतलेलं असतं.  intimacy आणि passion ह्या दोन गोष्टीमुळे एका romantic नात्याला सुरुवात होते. आपल्या हिंदी, मराठी  प्रेमकथांमध्ये ह्या दोन्हीचं छान चित्रण केलेलं असतं. हल्ली बरेचदा, ह्या दोन्हींनी युक्त असं नातं दिसतं. पण त्यांत commitment नसते. आपण commitment करू शकत नाही हे सुद्धा स्वच्छ सांगितलेलं असतं. असं नातं commitment अभावी संपलं तरी कायमचं मनावर कोरलेलं राहतं. intimacy नसलेली अनेक नाती दिसतात. ह्या नात्यांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणे, पझेसिव असणे, छोट्या-छोट्या गोष्टींवरून रुसणे, अबोला ह्या गोष्टी दिसतात.

प्रेमाचं नातं यशस्वी करायचं तर commitment अतिशय आवश्यक आहे. commitment म्हणजे काहीही झालं तरी सोबत राहण्याचा निश्चय. ह्यांत प्रसंगी त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सिनेमातली commitment लग्न झालं कि संपते. पण प्रत्यक्षातली मात्र लग्नानंतर सुरु होते.


खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या ह्या प्रेमाचं चित्रण सिनेमात जनरली नसतं.











Comments

Popular posts from this blog