Don't you quit !

नुकताच १२विचा निकाल लागला.१२वीची परीक्षा आणि त्यांतले गुण हे आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक असतात. म्हणूनच,  काहीजण अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले म्हणून आनंदात असतील तर काही अपेक्षेपेक्षा कमी मिळाले म्हणून नाराज असतील. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून नाराज होणं अगदी स्वाभाविक आहे. पण ह्या नाराजीमुळे स्वत:बद्दल कायम मनात राग धरणे, आत्मविश्वास गमावणे, आणि आता माझ्यापुढे काहीच संधी नाहीत असे समजणे मात्र घातक आहे. १२वी करियरचा पाया आहे हे जरी खरं असलं तरी १२वी म्हणजे आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही. हि फक्त एक चाळणी आहे. आपण त्यांतून चाळले गेलो नाही म्हणजे निरुपयोगी आहोत असं अजिबात नाही. 

'अपयश हि यशाची पहिली पायरी आहे', हे वाक्य आपण कैकवेळेस ऐकले असेल. पराभवाच्या आणि विजयाच्या अनेक कथा ऐकल्या असतील. संगीतल्याही असतील. पण ह्या कथा जेंव्हा स्वत:च्या बाबतीत वापरण्याची वेळ येते तेंव्हा ते कठीण जातं. आपलं अपयश आपल्याला जास्त मोठं वाटू लागतं.  त्यामागे, आपण घेतलेल्या मेहनतीची, तणावाची आठवण असते आणि 'एवढं करून मला काहीच मिळालं नाही', असं काहीसं अपेक्षाभंगाचं  दु:ख असतं.  

परीक्षेत कमी मार्क्स हे अपयश नाही, ते न स्विकारणं आणि त्यातून बाहेर न पडणं हे अपयश आहे. ह्यातून बाहेर पडायचं तर आधी आहे ती परिस्थिती स्विकारायला हवी. अपयश स्विकारताना काही गोष्टी आपल्या हातात नाहीत हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं.  'एवढं करून मला काहीच मिळालं नाही', हा विचार आधी सोडायला हवा. आपला निकाल काय लागणार? हे आपल्या हातात कधीच नव्हतं. नसतंच. हे स्विकारायला हवं. बरेचजण हे स्विकारतात  आणि तिथेच थांबतात.  खरंतर हे स्वीकारल्यानंतर पुढे पाउल टाकण्याची गरज असते. 

आपण अपयशी ठरलेले आहोत हे एकदा मोकळ्या मनाने स्वीकारलं कि पुढची वाट पुसटशी का होईना दिसू लागते. पण ह्या वाटेवर जाऊ कि नको हा संभ्रम असतो. ह्यावेळी, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कि,  यश किंवा अपयश दोन्हीही permanent नसतं. तो आपल्या कामाचा एक भाग असतो. म्हणजेच, यश मिळाल्यानंतर परत कधीच अपयश येणार नाही किंवा अपयश आल्यानंतर कधीच यशस्वी होता येणार नाही असं नाही. 

ह्यावेळी आपल्या समोर असणाऱ्या संधींचा आणि आपल्या गुणांचा मेळ घालता यायला हवा. आपल्याला नक्की काय चांगलं जमतं ह्याचा विचार व्हयला हवा. आपल्या कमतरतांचा सुद्धा प्रभावीपणे वापर करून घेता येतो हे लक्षात ठेवायला हवं. 

आपल्याला जे जमत नाही, जमलं नाही त्याबद्दल स्वत:ला माफ करणं फार आवश्यक आहे. अपयश हि आपल्याला विचार करण्यासाठी मिळालेली एक संधी असते. प्रत्येक यशस्वी माणूस कधी न कधीतरी अपयशी ठरलेला असतो. त्या अपयशाला तो संधी समजतो म्हणूनच यशस्वी होऊ शकतो.

 बरेचदा, छोट्या-छोट्या गोष्टींपुढे आपण हार मानतो.  कष्ट थांबवतो. खरं तीच वेळ असते, थोडंसं ताणण्याची. पुढे जाण्याची. तिथून पुढे आपण शिखरावरच पोहोचणार असतो. त्यामुळे, थांबावं, वेळ घ्यावा पण प्रयत्न सोडू नयेत. थोडा वेळ लागतो पण यश तुमचंच असतं.
when things go wrong, as they sometimes will,
when the roads you are trudging seems all uphill,
when the funds are low and the debts are high,
when you want to smile but you have to sigh,
when care is pressing you down a bit,
Rest,if you must but don't you quit!

वसुधा देशपांडे-कोरडे 
माईंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा. लि. 
९२२५५०५३६९





Comments

Popular posts from this blog