आपण सगळेच नेहमी, ताण ह्या विषयावर भरभरून बोलतो. अनेक कंपन्यांमध्ये ताणाचे व्यवस्थापन ह्या विषयावरचे सेमिनार आयोजित केले जातात. हल्ली, अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये सुद्धा परीक्षेपूर्वी अशा प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. कुणालाही पटकन जमणारा हा विषय नाही. ताण हा येतोच आणि त्याचं व्यवस्थापन करताना अडचणी सुद्धा येतात. ताण म्हणजे काय?
थोडक्यात सांगायचं झालं, तर, शरीरावर किंवा मनावर दबाव आणणारी कोणतीही गोष्ट म्हणजे ताण. थोडक्यात, ताण म्हणजे आपल्याला अस्वस्थ करणारी गोष्ट. लहान मुल जेंव्हा पालथं पडण्याचा प्रयत्न करतं तेंव्हा त्याला सुरुवातीला ते जमत नाही. मग त्याची चिडचीड होऊ लागते. हि चिडचिड म्हणजे ताण. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना, आपला कम्फर्ट झोन सोडून दुसऱ्या झोन मध्ये जाताना आपल्याला नेहमी अस्वस्थता जाणवते. .
काहीजण म्हणतील मग कम्फर्ट झोन सोडायचा कशासाठी? एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, एका गावातून एका राजाने एक गाडी फिरवली. त्यांतून सोनं बाहेर टाकलं जात होतं. गावातले सगळे लोक त्या गाडीच्या मागे पळत सुटले आणि सोनं गोल करू लागले. एक माणूस निवांत पडलेला दिसला. त्याला राजाने विचारलं, तुला सोनं नकोय का? त्याने विचारलं सोनं घेऊन काय करू. राजा म्हणाला आरामात रहा. माणूस म्हणाला आत्ता मी काय करतोय ? त्या माणसाला कम्फर्ट झोन सोडायचा नव्हता. हि गोष्ट इथे संपते. आपल्यातल्या बऱ्याच लोकांचं असंच म्हणणं असतं. आता ह्या गोष्टीचा वास्तविक आयुष्यात विचार करूयात. कल्पना करूया कि कम्फर्ट झोन सोडायचाच नाही. जसं आहे तसंच राहायचं. आपण काही काळ ह्याची कल्पना करूयात. त्यासाठी आधी आपला कम्फर्ट झोन ठरवू या. उदा. मी माझ्या घरात कम्फर्टेबल आहे. जेवण करणे, झोपणे हा माझा कम्फर्ट झोन आहे. मला हा कम्फर्ट झोन सोडायचा नाही. म्हणजे मी ह्यांच्या व्यतिरिक्त इतर काहीच करायचं नाही. मी कुणाकडे जायचं नाही. कुणाला घरी बोलवायचं नाही. थोडावेळ चांगलं वाटतं. पण रोज जर मी हेच करत राहिले तर माझी प्रगती थांबते. माझा विकास थांबतो. आणि माझ्या वृत्तीवर एक प्रकारचं आवरण चढू लागतं. ज्यामुळे मी चिडचिडी होते. कंटाळवाणी होते. एकाकी होते. एवढ्याच साठी मला माझा कम्फर्ट झोन सोडण्याची गरज असते. आपली प्रगती साधण्यासाठी थोड्या-फार प्रमाणातील अस्वस्थता आवश्यक असते.
हि अस्वस्थता जेंव्हा गरजेपेक्षा जास्त वाढते तेंव्हा त्याचा शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. ह्याचं कारण असं असतं कि. त्या अस्वस्थतेमुळे आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. आपल्या गाडीचा स्पीड जरी २००किमी/ तास एवढा जाऊ शकत असला तरी आपण तो तेवढा नेत नाही. कारण मग, गाडी कंट्रोल करणं अवघड होतं. अति-ताण आला कि, माणसाचं हेच होतं. आपण आपली शरीराची आणि मनाची गाडी सर्वात जलद गतीने पळवू लागतो. ती कंट्रोल करणं अवघड होतं. त्याचा विपरीत परिणाम होतो. मनाला आणि शरीराला स्वस्थता मिळविण्यासाठीचे प्रयत्त्न ह्यासाठीच आवश्यक असतात.
थोडीशी अस्वस्थता आवश्यक असते हे आपण पाहिलं, ती मर्यादेबाहेर जाऊ नये हेही आपण पाहिलं. मग ती मर्यादेबाहेर जाऊ नये म्हणून काय करायचं? तर आपली स्वस्थतेची व्यापकता वाढवायची. आपला कम्फर्ट झोन व्यापक करायचा. हा कम्फर्ट झोन व्यापक करणे म्हणजे stress manage करणे.

तणावाचे व्यवस्थापन (stress management) करण्यासाठी आधी आपल्याला येणारा ताण नक्की कोणत्या गोष्टींमुळे येतो ह्याची यादी करावी. बरेचदा कमी वेळामध्ये खूप जास्ती काम करायचे असेल तर आपल्याला तणाव येतो. ह्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे हातात असणारा वेळ आणि काम ह्यांची सांगड घालणे.
बरेचदा, परिस्थिती बदलणे आपल्याच हातात असते. अशावेळी, आत्मविश्वासाने ती बदलण्याचा प्रयत्न करा. काही वेळेस परिस्थिती आहे तशी स्वीकारावीच लागते. ती स्विकारण्यासाठी आपल्याला स्वत:ला काही वेळ द्यावा लागतो. हा वेळ आपण दीर्घ श्वसन, स्वत:ला शांत करणे अशा गोष्टींनी देऊ शकतो.
रोजच स्वत:साठी थोडा वेळ दिल्याने स्वस्थता वाढण्यास मदत होते. छंद जोपासणे, व्यायाम, आराम हा आपल्या दिनचर्येचा भाग असायला हवा. त्यामुळे अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.
बरेचदा, आपण नकारात्मक विचारांनी स्वत:ला अस्वस्थ करून घेतलेले असते. म्हणजे पेपर पूर्वी मला काहीच आले नाही तर? ह्या कल्पनेनेच आपण अस्वस्थ होतो. अशावेळी येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार अतिशय आवश्यक ठरतो. अशावेळी, मनात आलेले नकारात्मक विचार वेळीच दूर सारा. परिस्थितीला सामोरे जा.
वसुधा देशपांडे-कोरडे
क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट
माईंड मास्टर कोन्सेलर्स,
बिबवेवाडी, पुणे
९२२५५०५३६९
बरेचदा, परिस्थिती बदलणे आपल्याच हातात असते. अशावेळी, आत्मविश्वासाने ती बदलण्याचा प्रयत्न करा. काही वेळेस परिस्थिती आहे तशी स्वीकारावीच लागते. ती स्विकारण्यासाठी आपल्याला स्वत:ला काही वेळ द्यावा लागतो. हा वेळ आपण दीर्घ श्वसन, स्वत:ला शांत करणे अशा गोष्टींनी देऊ शकतो.
रोजच स्वत:साठी थोडा वेळ दिल्याने स्वस्थता वाढण्यास मदत होते. छंद जोपासणे, व्यायाम, आराम हा आपल्या दिनचर्येचा भाग असायला हवा. त्यामुळे अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.
वसुधा देशपांडे-कोरडे
क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट
माईंड मास्टर कोन्सेलर्स,
बिबवेवाडी, पुणे
९२२५५०५३६९
Comments
Post a Comment